Tecno Camen 20 सिरीज नवीनतम फीचर्ससह लाँच, तुमच्या बजेटमध्ये आहेत का लेटेस्ट स्मार्टफोन्स ?

Tecno Camen 20 सिरीज नवीनतम फीचर्ससह लाँच, तुमच्या बजेटमध्ये आहेत का लेटेस्ट स्मार्टफोन्स ?
HIGHLIGHTS

Tecnoची नवीन स्मार्टफोन सीरीज Tecno Camon 20 लाँच

नव्या स्मार्टफोन सिरीजची सुरुवातीची किमंत 14,999 रुपये

सिरीज MediaTek Helio G85 प्रोसेसर आणि VC लिक्विड कूलिंग तसेच हाय पॉलिमर जेलने सुसज्ज

Tecno ची नवीन स्मार्टफोन सीरीज Tecno Camon 20 भारतात लाँच झाली आहे. या सिरीजअंतर्गत 3 स्मार्टफोन Camon 20, Camon 20 Pro 5G आणि Camon 20 5G Premier सादर केले गेले आहेत. आता हे नवीनतम स्मार्टफोन नवीन फीचर्ससह तुमच्या बजेटमध्ये येतात का? बघा सविस्तर – 

Tecno Camon 20 सिरीजची किंमत

TECNO ने आपल्या बजेट स्मार्टफोन Camon 20 ची भारतात किंमत 14,999 रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजसह येतो, ज्यामध्ये एक्सपांडेबल रॅम सपोर्ट आहे. फोन प्रीडॉन ब्लॅक, सेरेनिटी ब्लू आणि ग्लेशियर ग्लो कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. 

Camon 20 Pro 5G दोन 8GB RAM, 128GB स्टोरेज आणि 8GB RAM, 256GB स्टोरेज ऑप्शनमध्ये येतो. दोन्ही व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 19,999 रुपये आणि 21,999 रुपये आहे. हा सेरेनिटी ब्लू आणि डार्क वेल्किन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. Tecno Camon 20 29 मे पासून Amazon India वर खरेदीसाठी उपलब्ध होईल. 

 

 

स्पेसिफिकेशन्स 

स्पेक्स बद्दल बोलायचे झाल्यास, Tecno Camon 20 Series 6.67 इंच AMOLED डिस्प्ले समर्थित आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. ही सिरीज MediaTek Helio G85 प्रोसेसर आणि VC लिक्विड कूलिंग तसेच हाय पॉलिमर जेलने सुसज्ज आहे. महत्त्वाचे म्हणजे, या सिरीजमधील सर्व स्मार्टफोन्स 8GB च्या रॅम पर्यायासह येतात, ज्याचा व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह 8GB पर्यंत वाढवता येईल.

कॅमेरा 

Tecno Camon 20 आणि Camon 20 Pro मध्ये 64MPचा प्रायमरी कॅमेरा, 2-मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा आणि मॅक्रो कॅमेरासह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. सिरीजसह, 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

बॅटरी 

Tecno Camon 20 आणि Camon 20 5G मध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. Tecno Camon 20 Premier 5G मध्ये 5000mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. त्याबोरबरच, वॉटर रेझिस्टन्ससाठी सीरिजला IP53 रेटिंग देण्यात आली आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo