4GB RAM सह 4 उत्कृष्ट स्मार्टफोन, किंमत 9000 रुपयांपेक्षा कमी, पहा यादी

4GB RAM सह 4 उत्कृष्ट स्मार्टफोन, किंमत 9000 रुपयांपेक्षा कमी, पहा यादी
HIGHLIGHTS

4 GB रॅमसह 4 उत्कृष्ट स्मार्टफोन्सची यादी.

Infinix Hot 12 Play, POCO C31, Redmi 9i स्पोर्ट, realme narzo 50i यांमध्ये मिळतील कमी किमतीत जबरदस्त फीचर्स.

उत्तम प्रतीच्या या दर्जेदार स्मार्टफोनची किंमत 9,000 रुपयांपेक्षाही कमी.

 सध्या वाढत्या महागाईच्या काळात उत्तम कॉलिटीचे आणि जबरदस्त स्मार्टफोन हवे असल्यास आपल्याला सहजपणे 25 ते 30 हजार रुपये मोजावे लागतात. अशातच बऱ्याच टेक कंपन्या आता उत्तम कॉलिटीचे आणि जबरदस्त स्मार्टफोन ग्राहकाला परवडणाऱ्या किमतीत लाँच करताना दिसत आहेत. Infinix ने अलीकडेच आपला Infinix Hot 12 Play स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोन तुम्हाला 9,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत 4GB रॅम आणि 6000mAh बॅटरी सारखे फीचर्स मिळतील. जर तुम्हीसुद्धा या किमतीत चांगले स्मार्टफोन घेण्याची योजना आखत असाल तर ही यादी तुमच्यासाठी आहे. या लेखात आम्ही तुम्हाला 9000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 4 GB रॅमसह येणार्‍या 4 उत्कृष्ट स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत.

Infinix Hot 12 Play

या नवीन स्मार्टफोनपासूनच सुरुवात करूयात. यात 4 GB रॅम सह 64 GB स्टोरेज मिळेल आणि फोनची किंमत केवळ 8,499 रुपये आहे. यात 6.82-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याबरोबर, यामध्ये 13MP+ डेप्थ लेन्स रिअर कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी आहे.

POCO C31

4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज असलेल्या Poco C31 स्मार्टफोनची किंमत 8,499 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये 6.53-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याबरोबरच, यात 13MP + 2MP + 2MP रिअर कॅमेरा, 5MP फ्रंट कॅमेरा आणि MediaTek Helio G35 प्रोसेसर आहे.

Redmi 9i स्पोर्ट

Redmi च्या या 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज स्मार्टफोनची किंमत देखील 8,799 रुपये आहे. या फोनमध्ये तुम्हाला आवश्यक असलेले  सर्व बेसिक फीचर्स आहेत. यामध्ये 6.53-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, यात 13MP रिअर कॅमेरा, 5MP फ्रंट कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि MediaTek Helio G25 प्रोसेसर आहे.

realme narzo 50i

realme च्या या स्मार्टफोनची किंमत देखील केवळ 8,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 4 GB रॅमसह 64 GB  स्टोरेज आहे. याशिवाय, 6.5-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याबरोबरच, यात 8MP प्राथमिक कॅमेरा, 5MP फ्रंट कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि ऑक्टा-कोर प्रोसेसर देखील आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo