Xiaomi India ने Xiaomi Fan Festival 2023 चे सेलिब्रेशन सुरु केली आहे. हा इव्हेंट 6 एप्रिलपासून सुरु होणार आहे. हा शॉपिंग इव्हेंट सहा दिवसांचा आहे. ज्यामध्ये ग्राहक भारी सवलती, एक्सचेंज ऑफर आणि बऱ्याच सुविधांचा लाभ घेऊ शकतात. Xiaomi आणि रेडमीच्या स्मार्टफोन्स, स्मार्ट TV, स्मार्ट होम आणि AIoT इकोसिस्टम इ. उपकरणांवर डील्स मिळणार आहेत. Xiaomi इंडियाचा वार्षिक सेल 6 ते 11 एप्रिल दरम्यान Mi.com वर चालेल.
Survey
✅ Thank you for completing the survey!
Xiaomi India सेलदरम्यान स्वस्त किमतीत उत्तम टेक्नॉलॉजी देण्याचा पर्यंत करत आहे. यामध्ये कंपनीची उपकरणे अतिशय स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. अलीकडेच, लाँच झालेले नवे फोन म्हणजेच Redmi 12C आणि REDMI NOTE 12 सुद्धा खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile