OTT releases this week : ‘मुंबईकर’पासून ते ‘असुर 2’ पर्यंत रिलीज होणार जबरदस्त चित्रपट आणि सिरीज

HIGHLIGHTS

नेटफ्लिक्सवर हंसल मेहताची नवी सिरीज येणार

या आठवड्यात JioCinema वर नवे चित्रपट आणि सिरीज रिलीज होणार

Disney+Hotstar ने अलीकडेच त्याची आगामी सस्पेन्स-थ्रिलर सिरीज जाहीर केली.

OTT releases this week :  ‘मुंबईकर’पासून ते ‘असुर 2’ पर्यंत रिलीज होणार जबरदस्त चित्रपट आणि सिरीज

दर आठ्वड्याप्रमाणे हा आठवडा देखील OTT वर काहीतरी नवीन घेऊन येणार आहे. बहुप्रतिक्षित वेब सिरीज 'असुर'चा दुसरा सीझन या आठवड्यात रिलीज होणार आहे. याशिवाय हंसल मेहताचा खऱ्या आयुष्यावर आधारित 'स्कूप' हा चित्रपटही या आठवड्यात नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. बघुयात या आठवड्यात रिलीज होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरीजची यादी – 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

असुर 2 

ASUR चा पहिला सीझन 2020 मध्ये रिलीज झाला होता. आता 3 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर या सिरीजचा दुसरा सीझन जाहीर झाला आहे. वेब सिरीज या वर्षी 1 जून रोजी JioCinema वर स्ट्रीम केली जाईल. या मालिकेत अर्शद वारसी, बरुण सोबती, अमेय वाघ आणि रिद्धी डोगरा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

School of Lies

Disney+Hotstar ने अलीकडेच त्याची आगामी सस्पेन्स-थ्रिलर सिरीज 'स्कूल ऑफ लाईज' जाहीर केली. ही सिरीज 2 जून रोजी प्रसारित होईल. या शोची कथा एका 12 वर्षांच्या मुलावर आधारित आहे, जो त्याच्या बोर्डिंग स्कूलमधून अचानक बेपत्ता होतो. शोमध्ये निम्रत कौर मुख्य भूमिकेत दिसणार आहे

Scoop

SCOOP ही Netflix ची आगामी सिरीज आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता ही सिरीज बनवत आहेत. 'स्कूप' ही खऱ्या आयुष्यावर आधारित असणार आहे. ही सिरीज नेटफ्लिक्सवर 2 जून 2023 रोजी प्रसारित होईल. यामध्ये एका पत्रकाराची कहाणी दाखवण्यात आली आहे.

मुंबईकर 

विक्रांत मॅसी आणि विजय सेतुपती अभिनित 'मुंबईकर' चित्रपट 2 जून रोजी JioCinema वर रिलीज होणार आहे. हा एक डार्क कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये विजय सेतुपती एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo