Reliance Jio ने सादर केला पहिला VR हेडसेट, कसा करेल काम ?

Reliance Jio ने सादर केला पहिला VR हेडसेट, कसा करेल काम ?
HIGHLIGHTS

Jio च्या VR हेडसेटचे नाव JioDive

JioDive VR ची किंमत 1299 रुपये आहे.

नवीन VR हेडसेट तीन महिन्यांच्या वॉरंटीसह येतो.

Reliance Jio ने JioDive नावाने देशात पहिला व्हर्च्युअल रियालिटी म्हणजेच VR हेडसेट लाँच केला आहे. याद्वारे क्रिकेट लव्हर्स व्हर्च्युअल 100 इंच स्क्रीनमध्ये 360 डिग्री व्ह्यूसह IPL पाहू शकतात.

किंमत : 

JioDive VR ची किंमत 1299 रुपये आहे. हे उपकरण JioMart वर उपलब्ध आहे. हेडसेट ब्लॅक कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत. 

 JioDive VR बद्दल काही खास 

नवीन VR हेडसेट तीन महिन्यांच्या वॉरंटीसह येतात. ऑफरमध्ये 500 रुपयांचा कॅशबॅक समाविष्ट आहे, जो पेटीएम वॉलेटसह रिडीम करता येईल. हे डिवाइस केवळ जिओ युजर्ससाठी आहे. हे Android आणि iOS दोन्ही डिवाइससह वापरले जाऊ शकते. डिव्हाइस ऍडजस्टेबल लेन्ससह येते आणि यात सेंटर आणि साईड व्हील्स आहेत. यात वापरकर्त्यांना शार्प इमेज आणि ऑप्टिकल कंफर्ट मिळेल.

JioDive VR हेडसेट कसे काम करेल? 

JioDive VR हेडसेट फोनच्या स्क्रीनवर दोन लेन्स ठेवेल, जे 3D व्ह्यू ऑफर करतील. स्मार्टफोनचे जायरोस्कोप आणि एक्सेलेरोमीटर सेन्सर वापरकर्त्याची हालचाली निर्धारित करतात आणि इमेज आणि व्हिडिओचे वेगवेगळे भाग दर्शवतात.

 JioDive वापरण्यासाठी तुम्हाला JioImmerse ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. हेडसेटच्या रिटेल बॉक्सवर दिलेला QR कोड स्कॅन करून तुम्ही ऍप इन्स्टॉल करू शकता.

याशिवाय, JioImmerse ऍप वापरण्यासाठी वापरकर्त्यांनी Jio 4G, 5G किंवा JioFiber वरील Jio नेटवर्कशी कनेक्ट असणे गरजेचे आहे. त्यानंतर JioImmerse ऍप लॉगिन करा. JioDive निवडून 'वॉच ऑन JioDive' पर्याय निवडा. त्यानंतर हेडसेटचे पुढचे कव्हर उघडा आणि स्मार्टफोनला सपोर्ट क्लिप आणि लेन्स दरम्यान ठेवा. डिव्हाइस वापरण्यापूर्वी, आपण स्ट्रॅप आणि पिक्चर कॉलिटी ऍडजस्ट करू शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo