फ्लिपकार्ट ‘बिग बिलियन डे’ सेलचा आज चौथा दिवस: जाणून घ्या आज काय आहे खास

Updated on 16-Oct-2015
HIGHLIGHTS

जर अजूनपर्यंत तुम्हाला फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलविषयी माहिती नसेल तर, तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आज चौथा दिवस आहे आणि आजही तुमच्यासाठी खूपकाही खास आहे.

फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलवर चाललेल्या ऑफर्सबद्दल माहित करुन घेण्याआधी आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नेमका हा बिग बिलियन डेज सेल आहे तरी काय? प्रत्येक सणासुदीच्या हंगामात प्रत्येक रिटेल कंपनी जसे की अॅमेझॉन, स्नॅपडील आणि फ्लिपकार्ट ज्या देशातील सर्वात मोठ्या ऑनलाईन रिटेल कंपन्या आहेत, त्या अशा प्रकारच्या सेलचे आयोजन करतात. ह्यामागे प्रत्येक कंपनीचा हेतू जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणे आणि जास्तीत जास्त पैसे कमवणे हा आहे. आणि ह्यावेळी फ्लिपकार्टवर हा सेल पाच दिवसांसाठी आयोजित करण्यात आला आहे. ह्या पाच दिवसांविषयी आपण खाली सविस्तर वाचू शकता.

फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलचा शुभारंभ झाला आहे आणि तो उत्कृष्ट पद्धतीने सुरु आहे. जर आपण पहिल्या दिवशी दिल्या गेलेल्या ऑफर्स चुकवल्या असतील तर आम्ही आपल्यासाठी दुस-या दिवसाची सर्वोत्कृष्ट ऑफर्स घेऊन आलो आहोत. जसे की आपल्याला माहित आहे की, पहिल्या दिवसाचा सेल हा फॅशनसंबंधी होता. मात्र आपण घाबरु नका अजूून काही दिवस बाकी आहेत आणि दरदिवशी खूप सा-या ऑफर्स आपल्याला मिळणार आहे, जोपर्यंत हा सेल संपत नाही तोपर्यंत. फ्लिपकार्टसोबत स्नॅपडील, अॅमेझॉननेसुद्धा ह्या प्रकारचा धमाल सेल आयोजित केला आहे.

आज फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलवर आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोटिव्हवर अनेक आकर्षक ऑफर्स मिळत आहे. मात्र लक्षात ठेवा की, ह्या सर्व डिल्सचा फायदा आपल्याला फ्लिपकार्ट अॅप वापरुनच मिळू शकतो.  

 

Mi पॅड १६जीबी

हे प्रोडक्टसुद्धा फ्लिपकार्टच्या सेलवर मिळत आहे. तशी ह्याची किंमत १२,९९९ रुपये आहे, मात्र ह्या सेलमध्ये ९,९९९ रुपयांत आपण हे खरेदी करु शकता. ह्यात ७.९ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे.

फ्लिपकार्ट ऑफर: ९,९९९ रुपये.

 

एलियनवेअर १३ इंचाचा लॅपटॉप

जर तुम्ही एक गेमिंग लॅपटॉप घ्यायच्या विचारात असाल तर हा सेल आपल्यासाठी फायदेशीर आहे. मुळात तुम्ही ह्या गेमिंग लॅपटॉपला ह्या सेलमध्ये खरेदी करु शकता. तशी ह्याची किंमत १,०४,९९१ आहे. मात्र ह्या सेलमध्ये ९६,९९१ रुपयांत आपण हा खरेदी करु शकता.

फ्लिपकार्ट ऑफर: ९६,९९१ रुपये.

 

हर्मन कार्डो ओनिक्स वायरलेस स्पीकर

हे प्रोडक्टसुद्धा तुम्हाला फ्लिपकार्टसेलमध्ये मिळत आहे. ज्याची मूळ किंमत ३९,९९० रुपये आहे. मात्र ह्या सेलमध्ये आपण १९,९८९ किंमतीत खरेदी करु शकता.

फ्लिपकार्ट ऑफर: १९,९८९ रुपये.

 

HP १५ इंचाचा लॅपटॉप

जर आपण लॅपटॉप घ्यायच्या विचारात असाल तर फ्लिपकार्टवर आज आपण ह्या लॅपटॉपला केवळ २६,४९० रुपयातं खरेदी करु शकता. ह्या लॅपटॉपमध्ये आपल्याला ४जीबीची रॅम आणि AMD A8 क्वाड-कोर प्रोसेसर मिळतो. ह्याच्या डिस्प्लेचा आकार १५ इंच आहे. ह्यात 1 TB ची हार्ड ड्राईव्ह आणि २जीबीचे ग्राफिक्स कार्डसुद्धा मिळत आहे. मात्र ह्यात आपल्याला कोणते नवीन ऑपरेटिंग सिस्टम दिले गेले नाही. तुम्ही तुमच्या पसंतीने कोणताही ऑपरेटिंग सिस्टम ह्यात टाकू शकता.

फ्लिपकार्ट ऑफर: २६, ४९० रुपये.

हर्मन कार्डो ऑरा वायरलेस स्पीकर

जर आपण एक प्रीमियम स्पीकर घ्यायच्या विचारात असाल आणि तेही कमी किंमतीत. तर आपल्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. ह्या सेलद्वारा आपण हा १७,९९० रुपयांत खरेदी करु शकता तशी ह्याची किंमत २९,९८४ आहे.

फ्लिपकार्ट ऑफर: १७,९९० रुपये.

 

जर आपण अशाच काही उत्कृष्ट आणि आकर्षक डिल्सच्या शोधात असाल तर आपल्याला दुस-या दिवसाची वाट पाहावी लागेल. आम्ही उद्या परत फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलच्या काही चांगल्या ऑपर्स घेऊन येऊ. जर आपल्याला माहिती करुन घ्यायचे आहे की, कोणत्या दिवशी कोणते प्रोडक्ट्स मिळतील ,तर आपण खाली दिलेले वाचा-

१३ ते १७ ऑक्टोबर: फॅशन

१४ ते १७ ऑक्टोबर: घरगुती सामान

१५ ते १७ ऑक्टोबर: मोबाईल आणि साधने (हे तर आपण नक्कीच जाणून घ्याल)

१६ ते १७ ऑक्टोबर: इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोटिव्ह

१७ ऑक्टोबर: पुस्तके आणि इतर

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Ashvani Kumar

Ashvani Kumar is Tech, Politics, and Sports lover.

Connect On :