फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलचा दुसरा दिवस: काय आहेत नवीन ऑफर्स

ने Digit NewsDesk | वर प्रकाशित 14 Oct 2015
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलचा दुसरा दिवस: काय आहेत नवीन ऑफर्स
HIGHLIGHTS

जर तुम्हाला अजूनपर्यंत फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलबद्दल माहिती नसेल तर, आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आज ह्या सेलचा दुसरा दिवस आहे. आणि तुमच्यासाठी बरेच काही खास आहे…

फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलवर चाललेल्या ऑफर्सबद्दल माहित करुन घेण्याआधी आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नेमका हा बिग बिलियन डेज सेल आहे तरी काय? प्रत्येक सणासुदीच्या हंगामात प्रत्येक रिटेल कंपनी जसे की अॅमेझॉन, स्नॅपडील आणि फ्लिपकार्ट ज्या देशातील सर्वात मोठ्या ऑनलाईन रिटेल कंपन्या आहेत, त्या अशा प्रकारच्या सेलचे आयोजन करतात. ह्यामागे प्रत्येक कंपनीचा हेतू जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणे आणि जास्तीत जास्त पैसे कमवणे हा आहे. आणि ह्यावेळी फ्लिपकार्टवर हा सेल पाच दिवसांसाठी आयोजित करण्यात आला आहे. ह्या पाच दिवसांविषयी आपण खाली सविस्तर वाचू शकता.

 

फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलचा शुभारंभ झाला आहे आणि तो उत्कृष्ट पद्धतीने सुरु आहे. जर आपण पहिल्या दिवशी दिल्या गेलेल्या ऑफर्स चुकवल्या असतील तर आम्ही आपल्यासाठी दुस-या दिवसाची सर्वोत्कृष्ट ऑफर्स घेऊन आलो आहोत. जसे की आपल्याला माहित आहे की, पहिल्या दिवसाचा सेल हा फॅशनसंबंधी होता. मात्र आपण घाबरु नका अजूून काही दिवस बाकी आहेत आणि दरदिवशी खूप सा-या ऑफर्स आपल्याला मिळणार आहे, जोपर्यंत हा सेल संपत नाही तोपर्यंत. फ्लिपकार्टसोबत स्नॅपडील, अॅमेझॉननेसुद्धा ह्या प्रकारचा धमाल सेल आयोजित केला आहे.

 

आपल्याला आज फ्लिपकार्टवर चालू असलेल्या बिग बिलियन डेज सेलमध्ये घरासंबंधी लागणारी साधने चांगल्या सौद्यात मिळत आहे. मात्र लक्षात ठेवा की, ह्या सर्व डिल्सचा फायदा आपल्याला फ्लिपकार्ट अॅप वापरुनच मिळू शकतो.  

 

आज आपल्याला VUचा ४० इंचाचा FHD TV फक्त १९,९९० रुपयांत मिळत आहे, त्याचबरोबर नोबलचा ३२ इंचाचा LED TV १०,९९० रुपयांत, सॅनसुईचा ४० इंचाचा FHD TV २४,९९० रुपयांत, LG चा ३२ इंचाचा LED TV १८,४९० आणि मायक्रोमॅक्सचा ४२ इंचाचा अल्ट्रा HD स्मार्ट टीव्ही ३३,४९० रुपयांत मिळत आहे.

 

त्याचबरोबर ह्या सेलमध्ये आपल्याला केल्विनेटरची ६ किलोची वॉशिंग मशिन ७,९९० मध्ये, IFB ५.५किलो पुर्ण ऑटोमॅटिक फ्रंट लोड २०,९९० मध्ये, केल्विनेटर २४५L डबल डोर फ्रिज १३,९९० मध्ये आणि व्हर्लपूलचा १९०L सिंगल डोर फ्रिज १०,४९० रुपयांत मिळत आहे.

 

जर आपण इतर प्रोडक्ट घेत असाल, तर आपल्याला ह्या सेलमध्ये सॅनसुईचा १.५ टनचा ५ स्टार एसी २३,४९० रुपयांत मिळत आहे.(फ्री इन्स्टॉलेशनसह). तसेच बजाज सोलो १७L मायक्रोवेव ओवन निव्वळ २,८९९ रुपयांत तर पेलोनिसचा २८L कंवेक्शन मायक्रोवेव ८,४९९ रुपयांत मिळत आहे.

जर आपण अशाच काही उत्कृष्ट आणि आकर्षक डिल्सच्या शोधात असाल तर आपल्याला दुस-या दिवसाची वाट पाहावी लागेल. आम्ही उद्या परत फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलच्या काही चांगल्या ऑपर्स घेऊन येऊ. जर आपल्याला माहिती करुन घ्यायचे आहे की, कोणत्या दिवशी कोणते प्रोडक्ट्स मिळतील ,तर आपण खाली दिलेले वाचा-

 

१३ ते १७ ऑक्टोबर: फॅशन

१४ ते १७ ऑक्टोबर: घरगुती सामान

१५ ते १७ ऑक्टोबर: मोबाईल आणि साधने (हे तर आपण नक्कीच जाणून घ्याल)

१६ ते १७ ऑक्टोबर: इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोटिव्ह

१७ ऑक्टोबर: पुस्तके आणि इतर

logo
Digit NewsDesk

The guy who answered the question 'What are you doing?' with 'Nothing'.

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status