WhatsApp वर आले ChatGPT अपडेट, 'अशा'प्रकारे करा वापर
OpenAI ने गेल्या वर्षी त्यांचे लोकप्रिय AI चॅटबॉट ChatGPT WhatsApp वर उपलब्ध करून दिले. WhatsApp वर उपलब्ध असलेले ChatGPT आता अपडेट केले आहे.
नवीन अपडेटसह हे चॅटबॉट आणखी उपयुक्त झाले आहे. या अपडेटमुळे, WhatsApp वापरकर्ते आता ChatGPT ला फोटो आणि व्हॉइस मेसेजद्वारे देखील प्रश्न विचारू शकतील.
WhatsApp वर ChatGPT चे 'अशा'प्रकारे करा वापर
WhatsApp वर ChatGPT वापरण्यासाठी, तुम्हाला प्रथम तुमच्या फोनवर ChatGPT चा अधिकृत नंबर +1-800-242-8478 सेव्ह करावा लागेल.
सर्वप्रथम WhatsApp ओपन करा आणि काँटॅक्ट्समध्ये जाऊन ChatGPT सर्च करा.
आता ChatGPT ओपन करून आपले प्रश्न विचारा. मजकुरात प्रश्न विचारण्यासाठी, तुम्ही तुमचा प्रश्न टाइप करू शकता. याशिवाय, तुम्ही तुमचा प्रश्न चॅटमध्ये व्हॉइस मेसेजद्वारे देखील पाठवू शकता.
तुम्ही ChatGPT द्वारे एक फोटो पाठवू शकता आणि त्यासंबंधित प्रश्न विचारू शकता.
OnePlus च्या लेटेस्ट 5G स्मार्टफोनवर भारी डिस्काउंट उपलब्ध