Android Tips: कॉल दरम्यान बॅकग्राउंड नॉइज असेल बंद, 'ही' सेटिंग ऑन करा
जर तुम्हालाही कॉल दरम्यान बॅकग्राउंड नॉइजचा त्रास होत असेल तर, आम्ही तुम्हाला बॅकग्राउंड नॉइज काढून टाकण्याचा एक सोपा मार्ग सांगणार आहोत.
Android स्मार्टफोनमध्ये कॉल दरम्यान बॅकग्राउंड नॉइज काढून टाकण्यासाठी एक इन-बिल्ट प्रक्रिया असते. यासाठी तुम्हाला स्वतंत्रपणे कोणत्याही थर्ड पार्टी ऍपची मदत घ्यावी लागणार नाही.
लेटेस्ट अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये 'Clear Call' नावाची सुविधा उपलब्ध आहे. या फिचरद्वारे, तुम्ही कॉल दरम्यान पार्श्वभूमी आवाज काढून टाकण्यासाठी टॉगल ऑन करू शकता.
- कॉल दरम्यान बॅकग्राउंड नॉइज काढून टाकण्यासाठी, तुम्हाला प्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेटिंग्ज उघडावी लागतील.
अँड्रॉइड फोनमध्ये हे फीचर कसे ऑन करावे?
- यानंतर, खाली स्क्रोल करा आणि 'Sound And Vibration' वर क्लिक करा.- साउंड्स अँड व्हायब्रेशन पर्यायामध्ये तुम्हाला क्लिअर व्हॉइसचा पर्याय मिळेल.
- तुम्हाला फक्त क्लिअर व्हॉइससाठी टॉगल ऑन करायचा आहे. हे फिचर ऑन केल्यानंतर, तुम्ही लग्न आणि पार्ट्यांमध्ये क्लियर कॉलचा आनंद घेऊ शकता.