XIAOMI POCO F1: 10 बेस्ट अल्टरनेटिव, तुम्हाला माहिती आहे का यांच्या बद्दल

ने Siddhesh Jadhav | अपडेट Aug 28 2018
Slide 1 - XIAOMI POCO F1: 10 बेस्ट अल्टरनेटिव, तुम्हाला माहिती आहे का यांच्या बद्दल

तुम्हा सर्वांना माहितीच आहे की Xiaomi ने आपल्या नवीन सब-ब्रँड म्हणजे POCO अंतर्गत आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा डिवाइस कंपनी ने स्नॅपड्रॅगन 845 सह लॉन्च केला आहे आणि या लेटेस्ट प्रोसेसर सोबत येणारा हा पहिला स्मार्टफोन आहे. जो खुप कमी किंमतीत लॉन्च झाला आहे, या डिवाइस ची बेस किंमत Rs 20,999 आहे. विशेष म्हणजे या डिवाइस मध्ये अधिकतम रॅम 8GB आहे आणि स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर ती 256GB पर्यंत जाते. कंपनी ने डिवाइस चा बेस वेरिएंट Rs 20,999 मध्ये लॉन्च केला आहे. तसेच याचा मिड-रेंज वेरिएंट कंपनी ने Rs 23,999 मध्ये लॉन्च केला आहे. त्याचबरोबर याचा टॉप-एंड वेरिएंट कंपनी ने Rs 28,999 मध्ये लॉन्च करण्यात आला आहे, सोबत कंपनी ने एक स्पेशल अर्मोरेड एडिशन ची घोषणा पण केली आहे, जो Kevlar बॅक पॅनल सह येतो. हा डिवाइस 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह सादर करण्यात आला आहे, या वेरिएंट ची किंमत Rs 29,999 आहे. पण आज आम्ही तुम्हाला काही अशा स्मार्टफोंस बद्दल सांगणार आहोत, जे या डिवाइस साठी बेस्ट अल्टरनेटिव ठरू शकतात. पण याविषयी बोलण्याआधी एक नजर POCO F1 च्या स्पेसिफिकेशन्स वर टाकू...

Slide 2 - XIAOMI POCO F1: 10 बेस्ट अल्टरनेटिव, तुम्हाला माहिती आहे का यांच्या बद्दल

या डिवाइस मधील एका हाई-एंड चिपसेट व्यतिरिक्त इतर स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला एक 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सल चा ड्यूल कॅमेरा सेटअप मिळत आहे, या कॅमेरा मध्ये AI क्षमता पण आहे. सोबतच फोन मध्ये एक 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण देण्यात आला आहे. फोन मध्ये एक 4,000mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. जी क्वालकॉम च्या क्विक चार्ज 3.0 ला सपोर्ट करते.

Slide 3 - XIAOMI POCO F1: 10 बेस्ट अल्टरनेटिव, तुम्हाला माहिती आहे का यांच्या बद्दल

फोन मध्ये एक 6.18-इंचाची एक FHD+ 18.7:9 आस्पेक्ट रेश्यो वाली स्क्रीन मिळत आहे, त्याचबरोबर यात एक नॉच पण देण्यात आली आहे. फोन मध्ये तुम्हाला एक हाइब्रिड ड्यूल सिम स्लॉट पण मिळेल. त्याचबरोबर या डिवाइस मध्ये ड्यूल-VoLTE सपोर्ट पण आहे.

Slide 4 - XIAOMI POCO F1: 10 बेस्ट अल्टरनेटिव, तुम्हाला माहिती आहे का यांच्या बद्दल

Xiaomi Mi A2

Xiaomi Mi A2 बद्दल बोलायचे झाले तर हा 5.99-इंचाच्या एका FHD+ डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे, तसेच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 सह आला आहे. फोन मध्ये 4GB च्या रॅम सोबत 64GB ची स्टोरेज देण्यात आली आहे, जी तुम्ही माइक्रोएसडी कार्ड च्या मदतीने वाढवू शकता.

या डिवाइस मध्ये तुम्हाला एक 12-मेगापिक्सल आणि 20-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा मिळत आहे, तसेच फ्रंटला पण तुम्हाला एक 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. फोन स्टॉक एंड्राइड 8.1 Oreo वर लॉन्च करण्यात आला आहे, तसेच यात तुम्हाला एक 3,000mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे, जी क्विक चार्ज 4+ च्या सपोर्ट सह येते.

Slide 5 - XIAOMI POCO F1: 10 बेस्ट अल्टरनेटिव, तुम्हाला माहिती आहे का यांच्या बद्दल

Asus Zenfone 5Z

फीचर्स आणि स्पेक्स पाहता हा डिवाइस एका 6.2-इंचाच्या FHD+ एज-टू-एज नॉच स्क्रीन सह लॉन्च करण्यात आला आहे, जी 1080x2246 पिक्सल रेजोल्यूशन सह येते. फोनच्या या डिस्प्ले च्या आस्पेक्ट रेश्यो बद्दल बोलायचे झाले तर तो 19:9 आहे. फोन मध्ये क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच हा 8GB च्या अधिकतम रॅम आणि 256GB च्या अधिकतम स्टोरेज सह लॉन्च करण्यात आला आहे. फोन मध्ये तुम्हाला हाइब्रिड ड्यूल सिम स्लॉट्स देण्यात आले आहेत.

Slide 6 - XIAOMI POCO F1: 10 बेस्ट अल्टरनेटिव, तुम्हाला माहिती आहे का यांच्या बद्दल

Honor Play

Honor Play मध्ये 6.3 इंचाचा फुल HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रेजोल्यूशन 1080×2340 पिक्सल आहे आणि याचा एस्पेक्ट रेश्यो 19.5:9 आहे. डिवाइस च्या डिस्प्ले मध्ये नॉच आहे, ज्यात फ्रंट कॅमेरा, इयरपीस आणि सेंसर्सना जागा देण्यात आली आहे. फोन च्या रियर पॅनल वर डुअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 16 मेगापिक्सल चा प्राइमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच डिवाइसच्या फ्रंटला एक 16 मेगापिक्सल चा कॅमेरा देण्यात आला आहे. तुम्हाला यात फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेंसर मिळेल.

Slide 7 - XIAOMI POCO F1: 10 बेस्ट अल्टरनेटिव, तुम्हाला माहिती आहे का यांच्या बद्दल

Oppo F7

हा डिवाइस वेगवेगळ्या दोन रॅम आणि स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला होता. याचा बेस वेरिएंट कंपनी ने 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज सह लॉन्च केला आहे. तसेच याचा हाई-एंड वेरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट सह लॉन्च करण्यात आला आहे. या दोन्ही स्मार्टफोंस ची किंमत क्रमश: Rs 19,990 आणि Rs 23,990 आहे. हे दोन्ही वेरिएंट्स को सोलर रेड आणि मूनलाइट सिल्वर रंगांमध्ये विकत घेता येतील, हा स्मार्टफोन तुम्ही फ्लिपकार्ट तसेच अमेजॉन इंडिया वरून घेऊ शकता. Oppo F7 एका गोष्टी मुळे खास आहे आणि तो आहे याचा 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा, पण या स्मार्टफोन ची खासियत फक्त हीच नाही, यात AI क्षमाता देण्यात आली आहे. यात 16MP चा रियर कॅमेरा आहे जो f/1.8 सह येतो जो नव्या कॅमेरा अॅल्गोरिथम सह पेयर्ड आहे आणि वेगवेगळे सीन्स ओळखतो.

Slide 8 - XIAOMI POCO F1: 10 बेस्ट अल्टरनेटिव, तुम्हाला माहिती आहे का यांच्या बद्दल

Vivo V9 Youth

या डिवाइस मध्ये 6.3-इंचाची FHD+ स्क्रीन देण्यात आली आहे. हा एक IPS पॅनल आहे आणि हा गोरिला ग्लास 3 ने सुरक्षित करण्यात आला आहे. फोन एक 2.5D कर्व sah आला आहे. यात एक 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले आहे. तसेच याच्या डिस्प्ले वर नॉच पण आहे. फोन मध्ये एक 1.8GHz चा ओक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट देण्यात आला आहे. फोन मध्ये एक 4GB ची रॅम सह 32GB ची इंटरनल स्टोरेज पण देण्यात आली आहे, जी तुम्ही माइक्रोएसडी कार्ड च्या मदतीने वाढवू शकता. पण फोन मध्ये 6GB चा रॅम देण्यात आला नाही आणि याचा मोठा रॅम वेरिएंट लॉन्च केला जाईल की नाही या बद्दल माहिती पण समोर आलेली नाही.

Slide 9 - XIAOMI POCO F1: 10 बेस्ट अल्टरनेटिव, तुम्हाला माहिती आहे का यांच्या बद्दल

Huawei Nova 3

या डिवाइस च्या काही स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर हा तुम्हाला 6.3-इंचाच्या एका FHD+ नॉच डिस्प्ले सह मिळत आहे, ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 19.5:9 आहे. सोबत यात एक 3D कर्व्ड ग्लास पॅनल आहे. डिवाइस हीसिलिकॉन किरिन 970 प्रोसेसर वर चालतो, तसेच यात तुम्हाला GPU टर्बो टेक्नोलॉजी पण मिळत आहे. फोन मध्ये तुम्हाला 6GB च्या रॅम सोबत 128GB ची इंटरनल स्टोरेज मिळत आहे, जी तुम्ही माइक्रोएसडी कार्ड च्या मदतीने 256GB पर्यंत वाढवू शकतो.

Slide 10 - XIAOMI POCO F1: 10 बेस्ट अल्टरनेटिव, तुम्हाला माहिती आहे का यांच्या बद्दल

फोन चा कॅमेरा पाहता यात तुम्हाला ड्यूल कॅमेरा सेटअप याच्या रियर पॅनल वर आणि ड्यूल कॅमेरा सेटअप याच्या फ्रंटला पण मिळेल. फोन मध्ये तुम्हाला एक 16-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि 24-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा रियर पॅनल वर मिळत आहे, तसेच यात तुम्हाला एक 24-मेगापिक्सलचा आणि 2-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर याच्या फ्रंटला मिळेल. फोन मध्ये एक 3,750mAh क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे. तसेच डिवाइस मध्ये तुम्हाला USB Type C, ड्यूल VoLTE सिम सपोर्ट मिळत आहे, तसेच स्मार्टफोन एंड्राइड 8.1 Oreo वर चालतो.

Slide 11 - XIAOMI POCO F1: 10 बेस्ट अल्टरनेटिव, तुम्हाला माहिती आहे का यांच्या बद्दल

Huawei Nova 3i

Nova 3 बद्दल बोलायचे तर या डिवाइस मध्ये तुम्हाला एक 6.3-इंचाचा FHD+ 3D कर्व्ड ग्लास डिस्प्ले देण्यात आला आहे, तसेच यात नॉच पण आहे. सोबत Nova 3i मध्ये तुम्हाला एक 6.3-इंचाचा डिस्प्ले मिळत आहे, पण हा 2.5D कर्व्ड ग्लास डिस्प्ले आहे. Nova 3 मध्ये तुम्हाला किरिन 970 प्रोसेसर मिळत आहे, GPU टर्बो टेक्नोलॉजी मिळत आहे, 6GB रॅम सोबत 64GB स्टोरेज आणि 128GB स्टोरेज मिळत आहे, जी तुम्ही माइक्रोएसडी कार्ड च्या मदतीने 256GB पर्यंत वाढवू शकता. तर Nova 3i मध्ये तुम्हाला किरिन 710 चिपसेट मिळेल. तसेच हा 4GB आणि 6GB रॅम ऑप्शन्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तसेच हा पण 64GB आणि 128GB स्टोरेज वेरिएंट्स मध्ये घेता येईल, ही स्टोरेज पण तुम्ही 256GB पर्यंत वाढवू शकता.

Slide 12 - XIAOMI POCO F1: 10 बेस्ट अल्टरनेटिव, तुम्हाला माहिती आहे का यांच्या बद्दल

Samsung Galaxy A6

सॅमसंग गॅलेक्सी A6 पाहता हा एका 5.6-इंचाच्या सुपर AMOLED HD+ डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे, तसेच जर Galaxy A6+ बद्दल बोलायचे तर या डिवाइस मध्ये तुम्हाला एक 6-इंचाचा Super AMOLED डिस्प्ले मिळत आहे. हा पॅनल एक FHD+ पॅनल आहे. तसेच सॅमसंग गॅलेक्सी A6 स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 1.6GHz चा ओक्टा-कोर प्रोसेसर, 3GB चा रॅम आणि 32GB ची स्टोरेज मिळेल. ही स्टोरेज तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही अगदी सहज ही 256GB पर्यंत वाढवू शकता. त्याचबरोबर सॅमसंग गॅलेक्सी A6+ बद्दल बोलायचे झाले तर हा 1.8GHz च्या ओक्टा-कोर प्रोसेसर आणि 4GB च्या रॅम सोबत 32GB च्या स्टोरेज सह सादर करण्यात आला आहे, ही स्टोरेज 400GB पर्यंत वाढवता येते. या स्मार्टफोन्स मध्ये क्रमश: 3000mAh आणि 3500mAh क्षमता असलेली बॅटरी आहे.

Slide 13 - XIAOMI POCO F1: 10 बेस्ट अल्टरनेटिव, तुम्हाला माहिती आहे का यांच्या बद्दल

Nokia 7 Plus

Nokia 7 Plus स्मार्टफोन बद्दल चर्चा करायची झाल्यास हा स्मार्टफोन भारतात एका 6-इंचाच्या 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. सोबतच हा स्मार्टफोन पण 6000 सीरीज च्या एल्युमीनियम ने बनवण्यात आला आहे. स्मार्टफोन मध्ये तुम्हाला ड्यूल कॅमेरा सेटअप सोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट मिळत आहे. हा स्मार्टफोन कार्ल झिस लेंस सह लॉन्च करण्यात आला आहे. तसेच कंपनी ने हा स्मार्टफोन लॉन्च करताना असा दावा केला आहे की नोकियाचा हा स्मार्टफोन 2 दिवसांची बॅटरी लाइफ देईल. हा स्मार्टफोन तुम्ही ब्लॅक कॉपर आणि वाइट कॉपर रंगात विकत घेऊ शकता.

Slide 14 - XIAOMI POCO F1: 10 बेस्ट अल्टरनेटिव, तुम्हाला माहिती आहे का यांच्या बद्दल

Honor 10 बद्दल बोलायचे तर या डिवाइस मध्ये असे भरपुर काही आहे जे आपण इतर स्मार्टफोन्स मध्ये पाहिले आहे. या डिवाइस मध्ये एका एल्युमीनियम फ्रेम सोबत ग्लास बॅक देण्यात आली आहे. तसेच हा स्मार्टफोन तुम्ही दोन वेगवेगळ्या रंगात विकत घेऊ शकता, हा तुम्ही फँटम ब्लू आणि मिडनाइट ब्लॅक रंगात विकत घेऊ शकता. फोन मध्ये तुम्हाला एक 5.84-इंचाचा IPS LCD डिस्प्ले मिळेल जो FHD+ पॅनल सह 2280x1080 पिक्सल च्या रेजोल्यूशन सह येईल. या स्मार्टफोन मध्ये डिस्प्ले च्या टॉप ला एक कटआउट देण्यात आली आहे, ज्यामुळे फ्रंट फेसिंग कॅमेरा आणि माइक्रोफोन तुम्हाला दिसत नाही. पण या डिवाइस मध्ये एक ऑल-ग्लास डिस्प्ले नाही जो आपण iPhone X मध्ये बघितला होता. फोन मध्ये एक फ्रंट माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. 

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status