२०१६ मधील ”बहूप्रतिक्षीत” स्मार्टफोन्स, जे देतील तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का

ने Team Digit | अपडेट Dec 29 2015
Slide 1 - २०१६ मधील ”बहूप्रतिक्षीत” स्मार्टफोन्स, जे देतील तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का

तंत्रज्ञानाने भरलेले २०१५ हे वर्ष आता अगदी आपल्या अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसातच आपण सर्व २०१६ चे स्वागत करु. २०१५ मधील आलेल्या स्मार्टफोन्सचा विचार केला तर, ह्या वर्षात अनेक आकर्षक आणि उत्कृष्ट स्मार्टफोन्स आले. अॅप्पलपासून सॅमसंगपर्यंत सर्व स्मार्टफोन्सनी जगभरात धुमाकूळ घातला. पण तुम्हाल हे माहित आहे का, की येणा-या २०१६ वर्षात आधीच्या स्मार्टफोन्सपेक्षा अधिक हायटेक आणि आकर्षक फीचर असलेले स्मार्टफोन्स लाँच होणार आहे. ह्या सर्व स्मार्टफोन्सची आमच्यासोबत तुम्हीही आतुरतेने वाट पाहात आहात. चला तर मग माहित करुन घेऊयात, अशा स्मार्टफोन्सविषयी ज्यांची चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे.

Slide 2 - २०१६ मधील ”बहूप्रतिक्षीत” स्मार्टफोन्स, जे देतील तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का

आयफोन 7, आयफोन 7 प्लस, आयफोन 7c

ह्यावर्षी २०१५ मध्ये अॅप्पल आपले नवीन आयफोन्समुळे चर्चेत होता. ह्या स्मार्टफोन्समध्ये सर्वात खास ह्याचा 3D टच होता, ज्याने लोकांना एक वेगळाच अनुभव मिळाला. त्याचबरोबर २०१६ मध्येही अजून काही आकर्षक फीचर्स जोडून आपले नवीन आयफोन्स बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. आयफोन 7, आयफोन 7 प्लस, आयफोन 7c ह्या तिन्ही स्मार्टफोन्सला २०१६ मध्ये लाँच करु शकते. ह्या स्मार्टफोन्स बरेच काही नवीन करण्याच्या अॅप्पल तयारित आहे आणि आता लवकरच हे आयफोन्स तुमच्या हातात असतील.

Slide 3 - २०१६ मधील ”बहूप्रतिक्षीत” स्मार्टफोन्स, जे देतील तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का

सॅमसंग गॅलेक्सी S7 फॅमिली

जशी सॅमसंगने ह्या वर्षी आपल्या दोन नवीन स्मार्टफोन्सनी लोकांची भरभरुन दाद मिळवली, त्याचप्रमाणे आता २०१६ मध्येही आपला नवीन स्मार्टफोन्स S7 नेही लोकांना वेड लावण्याच्या तयारीत आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, 3D टच असण्याची शक्यता आहे. मात्र अॅप्पलमध्ये हे फीचर आधीच असल्यामुळे ते आपल्या स्मार्टफोन्समध्ये काहीतरी नवीन करणार असल्याची आशा आहे. ह्या स्मार्टफोनला मार्च २०१६ मध्ये लाँच केले जाईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Slide 4 - २०१६ मधील ”बहूप्रतिक्षीत” स्मार्टफोन्स, जे देतील तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का

एक्सपिरिया Z6

 

सोनी आपल्या स्मार्टफोन्सचा कॅमेरा, उत्कृष्ट कामगिरी आणि स्पष्टता ह्या वैशिष्ट्यांमुळे ओळखला जातो. खासकरुन सर्वांची नजर सोनीच्या वॉटरप्रुफ फोन्सवरसुद्धा असते. जसे की सोनीने आता काही काळापूर्वी आपला एक्सपिरिया Z5 लाँच केला होता. जो सर्वोत्कृष्ट अशा फीचर्ससह आला होता. तसाच २०१६ मध्येही ही कंपनी आपला नवीन स्मार्टफोन एक्सपिरिया Z6 लाँच करु शकते. कंपनीने ह्या डिवाइसवर काम करणेही सुरु केले आहे.

Slide 5 - २०१६ मधील ”बहूप्रतिक्षीत” स्मार्टफोन्स, जे देतील तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का

LG G5

मोबाईल निर्माता कंपनी एलजी लवकरच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन G5 लाँच करु शकते. आतापर्यंत ह्या स्मार्टफोनशी संबंधित सर्व माहिती आपल्या समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन ड्यूल रियर कॅमे-याने सुसज्ज असेल. ह्यावेळी एका रेडईट यूजरद्वारा ह्या फोनची माहिती लीक झाली आहे. ह्या माहितीत एलजी G5 च्या हार्डवेअरविषयी बोलले गेले आहे. रेडईटवर जो फोटो पोस्ट केला आहे, त्यात फोनमध्ये ड्यूल कॅमेरा दाखवला गेला आहे. फोनमध्ये एक १६ मेगापिक्सेलचा आणि एक ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला गेला आहे. ह्या लीकमध्ये असेही सांगितले आहे की, एलजी G5 मध्ये 5.3 इंचाचा डिस्प्ले पाहायला मिळेल.

Slide 6 - २०१६ मधील ”बहूप्रतिक्षीत” स्मार्टफोन्स, जे देतील तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का

HTC One M10

आपल्या खास स्मार्टफोन्सला बाजारात आणल्यानंतर आता कंपनी २०१६ मध्ये आपला एक नवीन स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे.हा स्मार्टफोन कदाचित 27MP च्या आकर्षक कॅमे-यासह बाजारात आणला जाईल. त्याचबरोबर ह्यात खास स्पेक्स असण्याची शक्यता आहे.

Slide 7 - २०१६ मधील ”बहूप्रतिक्षीत” स्मार्टफोन्स, जे देतील तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का

वनप्लस 3

कंपनीने आपले दोन स्मार्टफोन्स बाजारात आणले आहे आणि त्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता कंपनी आपला नवीन स्मार्टफोन वनप्लस 3 बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. ह्या स्मार्टफोन्समध्येही आपल्याला दमदार हार्डवेअर पाहायला मिळू शकतो.

Slide 8 - २०१६ मधील ”बहूप्रतिक्षीत” स्मार्टफोन्स, जे देतील तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का

हुआवे P9

मोबाईल निर्माता कंपनी हुआवे लवकरच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन सादर करेल. सध्यातरी कंपनी आपल्या ह्या स्मार्टफोनवर काम करत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने बाजारात मॅट 8 आणि P8 सारखे स्मार्टफोन्स आणले होते. हुआवेचे हे स्मार्टफोन्स खूपच उत्कृष्ट कॅमे-याने सुसज्ज आहे. हुआवे P9 मध्ये कॅमेरा सेटअपवर बरेच लक्ष देण्यात आले आहे. शाओमी टूडे रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा फोन ड्यूल कॅमेरा सेटअपसहित ड्यूल LED फ्लॅश आणि लेजर ऑटोफोकससह उपलब्ध होईल.

Slide 9 - २०१६ मधील ”बहूप्रतिक्षीत” स्मार्टफोन्स, जे देतील तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का

नेक्सस (Next Device)

मागील दोन्हीही नेक्सस स्मार्टफोन्सला बराच चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता गुगल आपला स्वत:चा वेगळा असा नेक्सस डिवाइस २०१६ मध्ये लाँच करेल. ह्या पुढील सीरिजमध्ये उत्कृष्ट हार्डवेअर आणि कॅमेरा असेल, अशी आशा करुया.

Slide 10 - २०१६ मधील ”बहूप्रतिक्षीत” स्मार्टफोन्स, जे देतील तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का

शाओमी Mi5

ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसर असेल, त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची QHD डिस्प्ले 1440x2560 पिक्सेल रिझोल्युशनसह असू शकते. गोरिल्ला ग्लास 4 ने संरक्षित आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 4GB रॅम मिळू शकते. ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 16GB आणि 64GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा मिळू शकते. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 16 मेगापिक्सेलचा रियर आणि 6 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा असू शकतो.

Slide 11 - २०१६ मधील ”बहूप्रतिक्षीत” स्मार्टफोन्स, जे देतील तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का

सॅमसंग गॅलेक्सी नोट 6

नोट 5 ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर सॅमसंग आपला नवीन नोट 6 स्मार्टफोन 2016 मध्ये बाजारात आणेल. कंपनीच्या ह्या स्मार्टफोनकडून ब-याच अपेक्षा आहेत.

Slide 12 - २०१६ मधील ”बहूप्रतिक्षीत” स्मार्टफोन्स, जे देतील तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का

Nokia C1

नोकियाच्या चाहत्यांसाठी हा स्मार्टफोन म्हणजे एक खास भेटच असणार आहे. ह्या स्मार्टफोनविषयी येणा-या बातम्या लोकांना अजून प्रभावित करत आहे. तर मग ह्याच्या लाँचवेळी काय स्थिती याचा आपण अंदाज लावू शकणार नाही. २०१६ मध्ये ह्या स्मार्टफोनच्या माध्यमातूून बाजारात पुन्हा एकदा आपला पाय रोवण्याचा नोकियाचा पुरेपूर प्रयत्न असणार आहे.

संबंधित/लेटेस्ट फोटो स्टोरीज

सर्व पहा
Advertisements

हॉट डील्स

सर्व पहा
Advertisements

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status