मागच्या काही दिवसांत भारतात लाँच झाले आहेत हे 20 स्मार्टफोंस

ने Siddhesh Jadhav | अपडेट Mar 21 2018
Slide 1 - मागच्या काही दिवसांत भारतात लाँच झाले आहेत हे 20 स्मार्टफोंस

भारतीय बाजार आता जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोंस बाजारांमधील एक ठरला आहे. यामुळे भारतीय स्मार्टफोन बाजारात रोज नवीन फोन येत असतात. आता भारतीय बाजारात खूप नवीन स्मार्टफोन निर्माता कंपन्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे आता भारतीय बाजारात आधीपेक्षा कित्येक नवीन स्मार्टफोंस विक्री साठी उपलब्ध आहेत. इथे आम्ही तुम्हाला त्या स्मार्टफोंस बद्दल माहिती देत आहोत ज्यानी मागच्या काही दिवसांत भारतात प्रवेश केला आहे.

Slide 2 - मागच्या काही दिवसांत भारतात लाँच झाले आहेत हे 20 स्मार्टफोंस

Invens Diamond D2

ह्या फोनची किंमत Rs. 7,490 आहे. काही दिवसांपूर्वी हा भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. Invens Diamond D2 मध्ये कंपनी ने 5-इंचाचा HD डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रेजोल्यूशन 1280 x 720 पिक्सल आहे. ह्या फोन मध्ये 1.3GHz क्वाड कोर प्रोसेसर आणि 2GB रॅम आहे. हा फोन एंड्राइड 7.0 नूगा ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो. यात 8MP चा रियर कॅमरा LED फ्लॅश सह देण्यात आला आहे. सोबत ह्या फोन मध्ये 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. यात 4G VoLTE चा सपोर्ट उपलब्ध आहे. फोन मध्ये 2800mAh ची बॅटरी पण मिळते.
 

Slide 3 - मागच्या काही दिवसांत भारतात लाँच झाले आहेत हे 20 स्मार्टफोंस

Invens Fighter F1

हा एक 5-इंचाचा HD डिस्प्ले असणारा फोन आहे. यात यूजरला 1280 x 720 पिक्सल रेजोल्यूशन मिळतो. फोन मध्ये 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर, 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज आहे, स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 128GB पर्यंत वाढवली जाऊ शकते. यात 13MP चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे, जो LED फ्लॅश सह येतो. यात 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा पण देण्यात आला आहे. फोन मध्ये 4G VoLTE, वाई-फाई 802.11 b/g/n, ब्लूटूथ 4.0 आणि GPS सारखे फीचर्स आहेत. यात एक फिंगरप्रिंट सेंसर आहे. हा एक एंड्राइड नूगा वर चालणारा फोन आहे. कंपनी ने पॉवर बॅकअप साठी 3200mAh ची बॅटरी दिली आहे. 
 

Slide 4 - मागच्या काही दिवसांत भारतात लाँच झाले आहेत हे 20 स्मार्टफोंस

Invens Fighter F2


हा कंपनीचा तीसरा फोन आहे जो भारतात लाँच केला गेला आहे. यात 5-इंचाचा HD डिस्प्ले आहे, ज्याचा रेजोल्यूशन 1280 x 720 पिक्सल आहे. यात 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर आहे. सोबत या फोन मध्ये 3GB रॅम आणि 32GB ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, जी माइक्रोएसडी कार्ड ने 128GB पर्यंत वाढवली जाऊ शकते. फोन मध्ये 13MP च्या रियर कॅमेरा सह LED फ्लॅश देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 8MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा पण आहे. एंड्राइड नूगा वर चालणार्‍या या फोन मध्ये 3200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 
 

Slide 5 - मागच्या काही दिवसांत भारतात लाँच झाले आहेत हे 20 स्मार्टफोंस

HTC U11 Plus

याला 6GB रॅम आणि अमेजिंग सिल्वरंगासह भारतात लाँच करण्यात आले आहे. भारतात याची किंमत Rs. 56,990 आहे. या फोन मध्ये यूजरला 128GB ची स्टोरेज मिळते. HTC U11+ मध्ये 6-इंचाचा 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यात एक क्वाड HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा सुपर LCD 6, कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने सुरक्षित आहे. या डिस्प्ले चा रेजोल्यूशन 2880 x 1440 पिक्सल आहे. या सोबत या फोन मध्ये 3930mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोन मध्ये 12MP चा रियर आणि 8MP चा फ्रंट फेसिंग कॅमरा पण आहे. हा एक ड्यूअल सिम वाला फोन आहे ज्यातील एक सिम स्लॉट हाइब्रिड स्लिम स्लॉट आहे. फोन OTG आणि क्विक चार्जिंग ला पण सपोर्ट करतो. IP68 सर्टिफिकेशन मिळालेल्या मुळे हा फोन वाटर एंड डस्ट रेजिस्टेंट आहे.
 

Slide 6 - मागच्या काही दिवसांत भारतात लाँच झाले आहेत हे 20 स्मार्टफोंस

 Sony Xperia L2


भारतीय बाजारात Sony Xperia L2 ची किंमत Rs. 19,990 ठेवण्यात आली आहे. Sony Xperia L2 मध्ये कंपनी ने 5.5-इंचाचा एक HD रेजोल्यूशन वाला डिस्प्ले दिला आहे. ह्या डिस्प्ले चे रेजोल्यूशन 1280x720 पिक्सल आहे. या फोन मध्ये कंपनीने मीडियाटेक MT6737 चिपसेट दिला आहे. हा एक क्वाड-कोर प्रोसेसर आहे ज्याची क्लॉक स्पीड 1.5GHz आहे. ग्राफिक्स साठी कंपनी ने यात माली T720-MP2 GPU दिला आहे. सोबतच या फोन मध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256GB पर्यंत वाढवली जाऊ शकते. Xperia L2 मध्ये एंड्राइड 7.1.1 नूगा ऑपरेटिंग सिस्टम आहे. या सोबत फोन मध्ये 3300mAh ची बॅटरी आहे. फोन मध्ये 13MP f/2.0 अपर्चर चा रियर कॅमेरा आहे. तसेच यात 8MP चा 120-डिग्री सुपर-वाइड अँगल वाला कॅमेरा समोर दिला गेला आहे.
 

Slide 7 - मागच्या काही दिवसांत भारतात लाँच झाले आहेत हे 20 स्मार्टफोंस

Infinix Hot S3

Infinix Hot S3 चे दो वेरियंट आज भारतात लाँच करण्यात आले आहेत. याच्या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरियंट ची किंमत Rs. 8,999 आहे, तसेच याच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरियंट ची किंमत Rs. 10,999 आहे. Infinix Hot S3 मध्ये 20MP चा लो लाइट सेल्फी कॅमेरा मिळतो. फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ओक्टा कोर प्रोसेसर आहे. या फोन मध्ये 4000mAh ची बॅटरी पण देण्यात आली आहे. फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले आहे. हा एक 5.7-इंचाचा डिस्प्ले आहे. हा एक फुल व्यू डिस्प्ले आहे. फुल व्यू डिस्प्ले वाला हा कंपनी चा पहिला स्मार्टफोन आहे.
 

Slide 8 - मागच्या काही दिवसांत भारतात लाँच झाले आहेत हे 20 स्मार्टफोंस

Oppo F5 Sidharth Edition 

Oppo F5 Sidharth Edition स्मार्टफोन ला भारतात लाँच करण्यात आले आहे. याची किंमत Rs. 19,990 ठेवण्यात आली आहे. हा फोन ब्लू रंगात सादर करण्यात आला आहे. Oppo F5 Sidharth Edition मध्ये 4GB रॅम सह 32GB ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, जी माइक्रोएसडी कार्ड ने 256GB पर्यंत वाढवता येऊ शकते. फोन मध्ये कंपनी ने ओक्टा-कोर MT6763T प्रोसेसर दिला आहे. 3200mAh ची बॅटरी फोन ला पॉवर देते. यासोबत यात 6.0-इंचाचा डिस्प्ले आहे. हा एक FHD+ (2160 × 1080 पिक्सल) डिस्प्ले आहे. फोन मध्ये 16MP चा रियर कॅमेरा आहे. तसेच रियर कॅमेरा सोबत LED फ्लॅश पण आहे. फोन मध्ये 20MP का फ्रंट फेसिंग कॅमेरा पण आहे. हा फोन एंड्राइड 7.1 ऑपरेटिंग सिस्टम वर आधारित कलरओएस 3.2 वर चालतो. या फोनची जाडी 7.5mm आहे आणि वजन 156.5mm आहे. 
 

Slide 9 - मागच्या काही दिवसांत भारतात लाँच झाले आहेत हे 20 स्मार्टफोंस

Vivo V7 Plus इन्फाइनाइट लव लिमिटेड एडिशन


स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने फॅशन डिजाइनर मनीष मल्होत्रा ला सोबत घेऊन भारतीय बाजारात Vivo V7 Plus इन्फाइनाइट लव लिमिटेड एडिशन सादर केला आहे. हा स्पेशल एडिशन स्मार्टफोन रेड कलर वेरिएंट मध्ये तयार केला गेला आहे आणि याच्या बॉर्डर्स वर गोल्ड फिनिशिंग आहे. हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अमेजॉन वर सेल साठी उपलब्ध आहे. हा फोन Rs. 22,990 मध्ये विकत घेतला जाऊ शकतो. यूजर याला EMI ऑप्शन वर पण विकत घेऊ शकतात. Vivo V7 Plus स्मार्टफोन मध्ये 5.99-इंचाचा 18:9 फुल व्यू डिस्प्ले आहे. या स्मार्टफोन मध्ये यूनीबॉडी डिजाइन दिली गेली आहे. या फोन मध्ये यूजर्सना 24 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा मिळत आहे आणि 16 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा आहे. यात फेस ब्यूटी 7.0 आणि पोर्टरेड मोड फीचर चा सामवेश आहे. फोन अनलॉक करण्यासाठी यात फेस एक्सेस पण आहे आणि सोबतच यात फिंगरप्रिंट एक्सेस पण आहे. Vivo V7 Plus मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 450 ओक्टा-कोर 64 बिट प्रोसेसर, 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या फोन मध्ये 3225 mah ची बॅटरी देण्यात आली आहे. Vivo V7 Plus स्मार्टफोन फनटच OS 3.2 वर चालतो.
 

Slide 10 - मागच्या काही दिवसांत भारतात लाँच झाले आहेत हे 20 स्मार्टफोंस

Honor 7X Red Edition

ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट वर Honor 7X Red Edition ला सादर केले गेले आहे. Honor 7X मध्ये 5.93 इंचाचा LCD डिस्प्ले आहे जो 2160 x 1080p च्या रेज्ल्यूशन सह येतो. ह्या फोन मध्ये किरिन 659 चिपसेट, 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा हँडसेट माइक्रो SD कार्ड स्लॉट ला पण सपोर्ट करतो. Honor 7X मध्ये 16MP+2MP चा डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे आणि यात 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा हँडसेट EMUI 5.1 सह एंड्राइड 7.0 नूगा वर चालतो. यात एक रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे. फोन मध्ये 3340 mAh बॅटरी आहे आणि चार्जिंग साठी हा फोन माइक्रो USB पोर्ट चा वापर करतो.
 

Slide 11 - मागच्या काही दिवसांत भारतात लाँच झाले आहेत हे 20 स्मार्टफोंस

Infocus A2

Infocus A2 ला भारतात लाँच करण्यात आले आहे. भारतीय बाजारात याची किंमत Rs. 5199 ठेवण्यात आली आहे. हा फोन ब्लॅक आणि शॅम्पेन गोल्ड रंगात लाँच करण्यात आला आहे. हा फोन रिटेल स्टोर्स मध्ये उपलब्ध होईल. Infocus A2 मध्ये 5-इंचाचा HD डिस्प्ले मिळत आहे, ज्याचा रेजोल्यूशन 1280 x 720 पिक्सल आहे. यावर 2.5D कर्व्ड ग्लास पण देण्यात आली आहे. या फोन मध्ये 1.30GHz स्प्रेडट्रम SC9832 क्वाड-कोर प्रोसेसर माली 400 MP2 GPU सोबत देण्यात आला आहे. फोन मध्ये 2GB रॅम आणि 16GB इंटरनल स्टोरेज आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 64GB पर्यंत वाढवता येते. या फोन मध्ये 5MP चा फ्रंट आणि रियर कॅमेरा आहे. दोन्ही कॅमेरे LED फ्लॅश सह येतात. फोन मध्ये एंड्राइड 7.0 वर आधारित 360UI मिळतो. यात 2400mAh ची बॅटरी आहे. कनेक्टिविटी साठी फोन मध्ये डुअल सिम सपोर्ट, 4G LTE, वाई-फाई, ब्लूटूथ, FM रेडियो, GPS, माइक्रो USB पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. या फोन चा आकार 143.9 x 71.7 x 8.9 mm आहे. 
 

Slide 12 - मागच्या काही दिवसांत भारतात लाँच झाले आहेत हे 20 स्मार्टफोंस

 Xiaomi Redmi 5A रोज गोल्ड

Xiaomi Redmi 5A चा रोज गोल्ड वर्जन भारतात आला आहे. भारतात या वेरियंट ची किंमत Rs. 4,999 ठेवण्यात आली आहे. Xiaomi Redmi 5A मध्ये 5-इंचाचा फुल-लॅमिनेटेड HD डिस्प्ले आहे. यात यूजर्सना रीडिंग मोड पण मिळतो. फोन मध्ये 3000mAh ची बॅटरी आहे. कंपनी ने यात MIUI सिस्टम-लेवल पॉवर ऑप्टिमाइजेशन दिला आहे आणि कंपनी चा दावा आहे की हा फोन पॉवर खूप एफिशिएंसी ने वापरतो. 
 

Slide 13 - मागच्या काही दिवसांत भारतात लाँच झाले आहेत हे 20 स्मार्टफोंस

Moto X4

नवीन Moto X4 ला 6GB रॅम सह भारतात Rs. 24,999 रुपयांना लाँच करण्यात आले आहे. फोन मध्ये एंड्राइड 8.0 ओरियो आहे. 6GB रॅम आणि एंड्राइड ओरियो व्यतिरिक्त नवीन Moto X4 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 630 प्रोसेसर आहे. सोबतच यात 5.2-इंचाचा फुल HD डिस्प्ले आहे जो गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. फोन मध्ये 3000mAh ची बॅटरी आहे, जी फास्ट चार्जिंग सिस्टम सह येते. Moto X4 मध्ये एक डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यातील एक सेंसर 12MP चा तर, दूसरा सेंसर 8MP चा आहे. याचा 12MP सेंसर डुअल ऑटोफोकस पिक्सल सेंसर आणि f/2.0 अपर्चर लेंस सह येतो, तसेच 8MP यूनिट एक अल्ट्रा वाइड अँगल लेंस आहे, जिचा फील्ड ऑफ व्यू 120 डिग्री आहे. या फोन मध्ये एक 16MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा पण आहे. सध्यातरी Moto X4 चे भारतात 3GB रैम/32GB स्टोरेज आणि 4GB रैम/64GB स्टोरेज असे दोन वेरिएंट उपलब्ध आहेत. 
 

Slide 14 - मागच्या काही दिवसांत भारतात लाँच झाले आहेत हे 20 स्मार्टफोंस

Honor 9 Lite

ह्या फोन मध्ये 13MP + 2MP क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. या स्मार्टफोन चा रियर पॅनल ग्लास चा असेल. या फोनच्या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरियंट ची किंमत 11,999 रुपये आहे, पण, लाँच ऑफर अंतर्गत कंपनी 1,000 रूपयांची सूट देत आहे. म्हणजेच तुम्ही हा फोन 10,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. पण हा डिसकाउंट किती वेळ चालेल याची काहीच माहिती उपलब्ध नाही. तसेच 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरियंट ची किंमत 14,999 रुपये आहे. ह्या Honor 9 Lite 5.65 इंचाचा फुल HD+ IPS डिस्प्ले आणि 18:9 एस्पेक्ट रेशिओ आहे. यात Kirin 659 चिपसेट आहे. फोन मध्ये 3000mAh ची बॅटरी आणि एंड्रॉयड 8.0 Oreo आहे. हा डुअल सिम डिवाइस आहे आणि यात फिंगरप्रिंट सेंसर बॅक साइडला आहे. 

Honor 9 Lite स्मार्टफोन मध्ये 13MP + 2MP चा डुअल फ्रंट कॅमेरा आणि रियर कॅमेरा सेटअप आहे. कनेक्टिविटी साठी फोन मध्ये GPS, A-GPS, VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ, माइक्रो USB पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक आहे. 
 

Slide 15 - मागच्या काही दिवसांत भारतात लाँच झाले आहेत हे 20 स्मार्टफोंस

Samsung Galaxy On7 Prime 

याला दोन वेरियंट मध्ये सादर करण्यात आले आहे - 3GB रॅम सह 32GB स्टोरेज आणि 4GB रॅम सह 64GB स्टोरेज. Samsung Galaxy On7 Prime च्या 3GB रॅम वेरियंट ची किंमत Rs. 12,990 आहे, तसेच याच्या 4GB रॅम वेरियंट ची किंमत Rs. 14,990 आहे. Samsung Galaxy On7 Prime मध्ये 5.5-इंचाचा फुल HD TFT डिस्प्ले आहे. सोबत कंपनी ने यात 1.6GHz ओक्टा-कोर Exynos 7870 प्रोसेसर दिला आहे. वर सांगितल्याप्रमाणे, Samsung Galaxy On7 Prime दो वेरियंट मध्ये सादर करण्यात आला आहे. पाहिल्या वेरियंट मध्ये 4GB रॅम सह 64GB इंटरनल स्टोरेज आहे, तर दुसर्‍या मध्ये 3GB रॅम सह 32GB की इंटरनल स्टोरेज आहे. Samsung Galaxy On7 Prime मध्ये 13MP चा फ्रंट आणि 13MP चा रियर कॅमरा देण्यात आला आहे. रियर कॅमेरा सह LED फ्लॅश देण्यात आला आहे. दोन्ही कॅमेरे f/1.9 अपर्चर चे आहेत. ह्या फोनची जाडी फक्त 8mm स्लिम आहे आणि यात मेटल यूनिबॉडी डिजाइन देण्यात आली आहे. Samsung Galaxy On7 Prime ला पॉवर देण्यासाठी कंपनी ने यात 3300mAh ची बॅटरी दिली आहे. Samsung Galaxy On7 Prime डुअल सिम आणि 4G VoLTE च्या सपोर्ट सह येतो. 
 

Slide 16 - मागच्या काही दिवसांत भारतात लाँच झाले आहेत हे 20 स्मार्टफोंस

Oppo A83

हा एक मिड-रेंज स्मार्टफोन आहे आणि यात फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे याची किंमत Rs. 13,990 आहे. Oppo A83 मध्ये डुअल सिम स्लॉट दिला गेला आहे. हा फोन एंड्राइड 7.1 नूगा वर आधारित कलर ओएस 3.2 वर चालतो. यात 2.5GHz ओक्टा कोर प्रोसेसर सोबत 4GB चा रॅम देण्यात आला आहे. यात 5.7-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले आहे. या डिस्प्ले चा रेजोल्यूशन 720x1440 पिक्सल आहे आणि हा 18:9 एस्पेक्ट रेश्यो सह येतो. याव्यतिरिक्त Oppo A83 मध्ये 13MP चा रियर कॅमेरा LED फ्लॅश सह देण्यात आला आहे, फोन मध्ये 8MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा पण आहे. फोन मध्ये 16GB स्टोरेज आहे. जी माइक्रोएसडी कार्ड ने 256GB पर्यंत वाढवली जाऊ शकते.
 

Slide 17 - मागच्या काही दिवसांत भारतात लाँच झाले आहेत हे 20 स्मार्टफोंस

Titanium Frames S7

हा फोन एंड्रॉयड 7.0 नूगा ऑपरेटिंग सिस्टम (ओएस) वर चालतो आणि यात 1.45 Ghz क्वॉड कोर प्रोसेसर 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज आहे, इंटरनल स्टोरेज ला माइक्रो एसडी कार्ड ने 128 GB पर्यंत वाढवता येते. 
कंपनी च्या मते हा स्मार्टफोन आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) च्या पर्सनल असिस्टेंट "Niki.AI" सोबत येतो, जो ग्राहकांना आपल्या चॅनल पार्टनर च्या माध्यमातून रिचार्ज, मूवी टिकटिंग, स्वास्थ्य आणि घरगुती सेवा वापरण्याची सोय करून देतो. फोन मध्ये 2.5D कर्व्ड ग्लास सह 5.5 इंचाचा HD डिस्प्ले आहे. यात 3,000mAh ची बॅटरी आहे, जी एका चार्ज मध्ये पूर्ण दिवस चालू शकते.
 

Slide 18 - मागच्या काही दिवसांत भारतात लाँच झाले आहेत हे 20 स्मार्टफोंस

Smartron tphone P

Smartron tphone P ची विशेषता म्हणजे याची बॅटरी. कंपनी ने आपल्या या फोन मध्ये 5000 mAh ची बॅटरी दिली आहे. फोन मध्ये 5.2-इंचाचा HD IPS डिस्प्ले आहे. या डिस्प्ले चा रेजोल्यूशन 1280x720 पिक्सल आहे. जो 2.5D कर्व्ड डिस्प्ले सह येतो. फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 435 MSM8940 ओक्टा कोर प्रोसेसर आहे. सोबत यामध्ये एड्रेनो 505 GPU पण देण्यात आला आहे. हा एक डुअल सिम फोन आहे. हा फोन OTG रिवर्स चार्जिंग सपोर्ट सह येतो. फोन फुल मेटल बॉडी मध्ये येतो. या फोन मध्ये 13MP चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. जो LED फ्लॅश, PDAF फीचर ने युक्त आहे. फोन मध्ये 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमरा पण आहे. फ्रंट कॅमेरा सोबत पण LED फ्लॅश आहे. यात फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. हा फोन 3GB रॅम आणि 32GB च्या इंटरनल स्टोरेज सह येतो, जी माइक्रोएसडी कार्ड ने 128GB पर्यंत वाढवली जाऊ शकते.
 

Slide 19 - मागच्या काही दिवसांत भारतात लाँच झाले आहेत हे 20 स्मार्टफोंस

OnePlus 5T Lava Red

OnePlus 5T Lava Red एडिशन ला भारतात लाँच केले गेले आहे. याची किंमत Rs. 37,999 आहे. या फोन मध्ये फक्त 8GB रॅम आहे आणि यात 128GB ची इंटरनल स्टोरेज पण आहे. OnePlus 5T Lava Red वेरियंट मध्ये पण फुल HD रिजॉल्यूशन सह 6 इंचाचा ऑप्टिक AMOLED डिस्प्ले असू शकतो. फोनचे अन्य सर्व स्पेसिफिकेशन पण सारखेच आहेत पण अंदाज आहे की OnePlus 5T लावा रेड वेरियंट फक्त 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज ऑप्शन मध्ये उपलब्ध होईल. OnePlus 5T Lava Red वेरियंट मध्ये पण 20+16MP रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 16MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा पण देण्यात आला आहे.
 

Slide 20 - मागच्या काही दिवसांत भारतात लाँच झाले आहेत हे 20 स्मार्टफोंस

Samsung Galaxy A8+ 2018

Samsung Galaxy A8+ 2018 ला कंपनी ने भारतात लाँच केले आहे. याची किंमत Rs 32,999 आहे. Samsung Galaxy A8+ 2018 मध्ये 16MP+8MP डुअल फ्रंट फेसिंग कॅमेरा सेटअप आहे. दोन्ही कॅमेर्‍यामध्ये f/1.9 अपर्चर लेंस आहे. फोन मध्ये 16MP ची f/1.7 अपर्चर लेंस मागच्या बाजूला आहे. फोन मध्ये USB टाइप-C पोर्ट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे. ह्या फोन मध्ये ब्लूटूथ 5.0 (LE), वाई-फाई, GPS आणि NFC सारखे फीचर्स आहेत. फोन मध्ये 3500mAh ची बॅटरी आहे. हा एक IP68 सर्टिफाइड डिवाइस आहे, ज्यामुळे हा एक वाटर आणि डस्ट-रेसिस्टेंट फोन आहे.
 

Slide 21 - मागच्या काही दिवसांत भारतात लाँच झाले आहेत हे 20 स्मार्टफोंस

Samsung Galaxy J2 Pro

Samsung Galaxy J2 Pro मध्ये क्वाड कोर प्रोसेसर आणि 16GB ची इंटरनल स्टोरेज आहे. सोबतच यात माइक्रोएसडी कार्ड चा वापर पण करता येईल. Samsung Galaxy J2 Pro मध्ये 5-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्ले चा रेजोल्यूशन QHD आहे. यात 1.5GB च्या रॅम सह 1.4GHz वाला प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोन मध्ये दोन माइक्रो-सिम कार्ड स्लॉट मिळतात. हा फोन 8MP च्या रियर कॅमेरा सह येतो, ज्याच्या सोबत LED फ्लॅश पण देण्यात आला आहे. या फोन मध्ये 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. हा फोन एंड्राइड 7.0 नूगा ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो. यात 2,600 mAh ची बॅटरी आहे. 
 

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status