ह्यावर्षी काय काय लाँच करणार सोनी

ने Ashvani Kumar | अपडेट Jan 14 2016
Slide 1 - ह्यावर्षी काय काय लाँच करणार सोनी

सोनी ह्यावर्षी केवळ स्मार्टफोन्स नाही तर इतर अनेक गोष्टी लाँच करण्याची योजना बनवत आहे. अमेरिकेच्या लास वेगसमध्ये झालेल्या CES 2016 मध्ये सोनीने आपल्या अनेक प्रोडक्ट्सवरुन पडदा उठवला, जे ती ह्या वर्षी लाँच करणार आहे. ह्यावेळेस सोनी आपल्या ऑडियो प्रोडक्ट्स,टीव्ही, कॅमेरा आणि घरगुती सामानावर जास्त लक्ष केंद्रित करणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात, ह्यावर्षी सोनी बाजारात काय काय आणणार आहे. येथे आम्ही सोनीचे ह्यावर्षी लाँच होणारे सर्वात खास प्रोडक्टची यादी बनवली आहे. पुढील स्लाइडशो च्या माध्यमातून आपण ह्याविषयी सविस्तर माहिती करुन घेऊ शकता.

Slide 2 - ह्यावर्षी काय काय लाँच करणार सोनी

सोनी वॉकमेन A26

मागील वर्षापेक्षा ह्यावर्षी सोनी काही स्वस्त वॉकमेन बाजारात आणणार आहे, जे अॅनड्रॉईडवर काम करणार नाही. सोनी ह्यांच्या ऑडियो क्वालिटीवर जास्त लक्ष देणार आहे. ह्या वॉकमेनमध्ये ही आणि इतर खास वैशिष्ट्ये असण्याची शक्यता आहे.

Slide 3 - ह्यावर्षी काय काय लाँच करणार सोनी

सोनी H. एयर सीरीज़

ह्यावर्षी सोनी आपली H. एयर सीरिजचे अनेक हेडफोन्स बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर हा जगातील सर्वात छोटा हेडफोनसुद्धा आणण्याच्या तयारीत आहे.

Slide 4 - ह्यावर्षी काय काय लाँच करणार सोनी

4K HDR टीवी

CES ह्या वर्षी हाय डायनॅमिक रेंज (HDR) वर जास्त फोकस करत आहे. आणि सोनीही आपले काही टीव्ही ह्या सेगमेंटमध्ये लाँच करणार आहे, ज्यांची घोषणाही त्यांनी केली आहे.ब्राव्हिया XBR-X930D, X940D आणि X850D सोनीद्वारा लाँच केले गेले आहेत. ही खरच कौतुकास्पद गोष्ट आहे.

Slide 5 - ह्यावर्षी काय काय लाँच करणार सोनी

सोनी ‘अल्ट्रा’ 4K स्ट्रीमिंग सेवा

4K टीव्हीच्या खरेदीदारांसाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे टीव्हीवर अल्ट्रा हाय रिझोल्युशन कंटेंटला पाहणे आहे. ह्या सेवेच्या माध्यमातून ते ह्या समस्येचे निराकरण करु शकतात. ही सेवा अशा टीव्हींसाठी सर्वात खास सेवा आहे, असे म्हणता येईल.

Slide 6 - ह्यावर्षी काय काय लाँच करणार सोनी

सोनी PS-HX500 Vinyl turntable

सोनी आता आपल्यापर्यंत अनेक जुन्या तसेच नवीन गाण्यांचा संग्रह ह्या यंत्राच्या माध्यमातून पोहचवू शकतो. हा स्वत:तच वेगळा असा अनुभव आहे.

Slide 7 - ह्यावर्षी काय काय लाँच करणार सोनी

सोनी FDR-AXP55 4K हँडीकॅम (प्रोजेक्टरसह)

प्रोजेक्टरसह सोनी आपला हा नवीन कॅमेरा लाँच करणार आहे. ह्यावर्षी आता आपल्याला कॅमे-यासह प्रोजेक्टरही मिळेल, जो आपल्यातच एक महत्त्वपुर्ण असा हँडीकॅम आहे.

Slide 8 - ह्यावर्षी काय काय लाँच करणार सोनी

सोनी AS50R अॅक्शन कॅमेरा

सोनीच्या कटियन सीरिजमध्ये कॅमे-याला सर्वोत्कृृष्ट असे अपग्रेड मिळाले आहे आणि आपल्या ह्या कॅमे-यासह सोनी आपल्याला रिझवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.

Slide 9 - ह्यावर्षी काय काय लाँच करणार सोनी

सोनी A7R mark II मिररलेस कॅमेरा  

२०१५ मध्ये लाँच झालेल्या ह्या कॅमे-यामध्ये CMOS BSI पुर्ण फ्रेम सेंसर आहे. हा मिररलेस मॅकेनिजमवर काम करेल आणि हा कमी प्रकाशातसुद्धा जास्त चांगले काम करतो. तसेच हा उत्कृष्टरित्या 4K रेकॉर्डिंगसुद्धा घेतो.

Slide 10 - ह्यावर्षी काय काय लाँच करणार सोनी

सोनी GTK-XB7 एक्स्ट्रा बास होम ऑडियो

एक्स्ट्रा बास सीरिज आता हाय पॉवर होम ऑडियो सिस्टमसह येत आहे. सोनी ह्याला ह्याच वर्षी लाँच करणार आहे.

Slide 11 - ह्यावर्षी काय काय लाँच करणार सोनी

सोनी ग्लास साउंड स्पीकर

सोनी पुन्हा एकदा काहीतरी वेगळे असे लाँच कऱण्याच्या प्रयत्नात आहे. कारण फोटोमध्ये दिसत असलेल्या ह्या प्रोडक्टला लाँच करुन सोनी सर्वांना आश्चर्याचा धक्का देणार आहे.

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status