मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो 4: फर्स्ट इम्रेशन

ने Siddharth Parwatay | अपडेट Nov 06 2015
Slide 1 - मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो 4: फर्स्ट इम्रेशन

खूप चांगले प्रतिभावंत आणि काहीतरी वेगळे करुन दाखवण्याची चिकाटी असलेले पनॉस पिनाय यांनी मागील महिन्यात लाँच केलेल्या सरफेस प्रो 4 आणि इतर उत्कृष्ट गॅझेटीमुळे त्यांच्या ह्या सरफेस प्रो 4 बद्दल आम्ही खूप उत्सुक होतो. महत्त्वाचे सांगायचे म्हणजे आम्हाला ह्याच सरफेस प्रो 4 ला तपासण्याची संधी मिळाली, ती ही गुरुवारी मुंबईत झालेल्या #FutureUnleashed या कार्यक्रमामुळे. आणि एकूणच त्याच्या कामगिरीवर आम्ही प्रभावित झालो. चला तर मग आम्ही तुम्हालाही सांगतो नक्की काय वाटलं आम्हाला ह्या सरफेस प्रो 4 टॅबलेटबद्दल.

Slide 2 - मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो 4: फर्स्ट इम्रेशन

त्याला असलेले किकस्टॅड तुम्ही स्क्रीनच्या कोनाप्रमाणे हवे तसे अॅडजस्ट करु शकता. हे जवळपास मागील सर्व बाजूस फिरवता येते. माझा असा अंदाज आहे की, तो १६० अंशात असू शकतो. (त्याच खरे मोजमाप जेव्हा हा प्रॉडक्ट आमच्याकडे रिव्ह्यूसाठी येईल तेव्हा सांगू). हा टॅबलेेट डेस्कवर ठेवून वापरण्यास अगदी सोयीस्कर आहे, पण मांडीवर ठेवून वापरण्यास हा सोयीस्कर नाही. अद्याप तरी आम्ही तसा प्रयत्न केला नाही. मात्र त्यात वापरलेली पिक्सेल C चुंबकीय पद्धतीमुळे कदाचित असे होत असावे.

Slide 3 - मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो 4: फर्स्ट इम्रेशन

चिकलेट स्टाइल टाइप कव्हर कीबोर्ड हा थोडा चांगला आणि वेगळा वाटतो. त्यामुळे टाइप करत असताना त्याचा कीजचा स्पर्श तुम्हाला एक वेगळा आणि चांगला अनुुभव देतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा कीबोर्ड बॅकलिटसुद्धा आहे.

Slide 4 - मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो 4: फर्स्ट इम्रेशन

सरफेस प्रो 4 ची बांधणी उत्कृष्ट असल्याचे वाटते. त्याला असलेले मॅग्नेशियम कव्हर हे दिसायला चांगले आणि त्याचप्रमाणे त्याचा स्पर्श सुद्धा चांगला वाटतो. ह्यात कोणत्या प्रकारचे हार्डवेअर वापरण्यात आले आहे? हे सहाव्या जेन कोअर m3, i5 किंवा i7 CPU ने शक्तीशाली बनविण्यात आले असून तुम्हाला हवा तो पर्याय निवडल्यानंतर त्याचे रॅम 4GB पासून 16GB पर्यंत वाढवता येते. हे सर्वकाही ७६६ ते ७८६ ग्रॅममध्ये एकत्रित करण्यात आले आहे, जे इतरांपेक्षा काहीतरी वेगळे असल्याचे वाटते.

Slide 5 - मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो 4: फर्स्ट इम्रेशन

ह्या सरफेस पेन लॅचेसच्या कडा चुंबकीय बनविण्यात आल्या आहेत, त्यामुळे तो हलत नाही, जी चांगली गोष्ट आहे. स्क्रीनवर काम करताना सरफेस पेन आपल्याला १०२४ पातळीपर्यंत संवेदनशीलता निर्माण करतो.  ह्याचाच अर्थ असा की, जर तुम्ही स्क्रीनवर जोरात शाई दाबली, तर ते एकदम जाड वाहते.

Slide 6 - मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो 4: फर्स्ट इम्रेशन

बिजागरासाठी असलेले चुंबकीय लॉकिंग यंत्रणा खूप चांगल्या पद्धतीने काम करते. त्यासाठी तुम्हाला विशेष कोन पाहण्याची किंवा त्यांना सरळ रेषेत ठेवण्याची काही विशेष काळजी घेण्याची गरज नाही. फक्त एका क्लिकवर तुम्ही हे सहजपणे करु शकता.

Slide 7 - मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो 4: फर्स्ट इम्रेशन

ह्याला १२.३ इंचाचा पिक्सेल सेन्स टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. जो अतिशय उठावदार दिसतो. पण तो थोडा परावर्तितसुद्धा आहे. ह्याचे रिझोल्युशन 2736x1824 आहे, ज्याची 267ppi इतकी पिक्सेल तीव्रता मिळते. आम्ही ह्यावर 4K व्हिडियो खेळलो पण त्यात आम्हाला कोणतीच अडचण आली नाही. आणि त्याचा व्हिडियोही चांगला दिसतो. ह्याच्या स्पीकरचा आवाज खूप मोठा आहे.

Slide 8 - मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो 4: फर्स्ट इम्रेशन

महत्त्वाचे म्हणजे, जेव्हा आम्ही कीबोर्डपासून स्क्रीन वेगळी केली तेव्हा ती टॅबलेट मोडमध्ये बदलली गेली, ज्यामुळे ह्याचे UI टच खूप चांगले असल्याचे दिसते. थोडक्यात सांगायचे म्हणजे, हा एक टॅबलेटप्रमाणे काम करतो. मात्र जेव्हा हा आमच्याकडे रिव्ह्यूसाठी येईल तेव्हा आम्ही ह्याविषयी सविस्तर सांगू. तोपर्यंत आमच्यासोबत जोडलेले राहा.

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status