पाहूयात CES 2016 मध्ये सादर झालेले अदभूत गॅजेक्ट्स

ने Adamya Sharma | अपडेट Jan 08 2016
Slide 1 - पाहूयात CES 2016 मध्ये सादर झालेले अदभूत गॅजेक्ट्स

CES हा एक असा जबरदस्त टेक शो आहे, ज्यात असे काही  टेक्नॉलॉजीस पाहायला मिळाले, ज्या आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही पाहायला मिळाल्या नसतील, ज्या अदभूत पण हास्यास्पद होत्या. आणि हे असे काही प्रोडक्ट्स होते, जे तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात कधीच पाहिले नसतील. पण त्यांच्या ह्या वेडेपणामुळे आणि वेगळेपणामुळे आपल्याला नक्कीच आवडतील. चला तर मग नजर टाकूया, ह्या प्रोडक्ट्सवर………

Slide 2 - पाहूयात CES 2016 मध्ये सादर झालेले अदभूत गॅजेक्ट्स

Hoverbutler

ह्या यादीतील Hoverbutler हे अत्यंत वेगळे असे तंत्रज्ञान आहे. इंटेल आणि सेगवे यांच्या सहयोगाने ह्या hoverboard अॅक्चुअल रोबोटमध्ये बनविण्यात आले. हा स्वयंचलित रोबोट डिस्प्लेसह येतो ज्यात तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आणि व्हिडियोज बनवू शकता. हा एक खूपच सुंदर असा छोटासा रोबोट आहे, जो तुमच्या हातात घट्ट बसवून तुम्हाला दरवाजा उघडण्यासारख्या इतर अनेक कामांत मदत करतो. म्हणजे आता तुम्ही तुमच्या नोकराला हवे तसे फिरवू शकता.

Slide 3 - पाहूयात CES 2016 मध्ये सादर झालेले अदभूत गॅजेक्ट्स

Somabar Robotic Bartender

Somabar Robotic Bartender हे रोबोटच्या यादीतील आणखी एक प्रोडक्ट आहे. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात कोकटेल्स मिक्सिंग करायची असतील, तर हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. Somabar हा वायफायवर काम करतो आणि ह्याला सहा सोप्या Somapods रिफिल आहेत, ज्यात ६ वेगेवेगळे अल्कोहोलचे प्रकार आहेत. यूजर अॅपच्या माध्यमातून अॅपशी कनेक्ट होऊ शकतो आणि रोबोटिक मिक्सोलॉजिस्ट आपल्या पार्ट्यांसाठी स्वादिष्ट असे मिश्रण तयार करुन देतो.

Slide 4 - पाहूयात CES 2016 मध्ये सादर झालेले अदभूत गॅजेक्ट्स

रिलिफबँड अँटी-सिकनेस ब्रेसलेट

रात्रभर दारु प्यायल्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल किंवा प्रवासादरम्यान तुम्हाला त्रास होत असेल किंवा सकाळचा थोडा अशक्तपणा जाणवत असेल, तर रिलिफबँड अँटी-सिकनेस ब्रेसलेट हा एक उत्तम पर्याय आहे. हा ब्रेसलेट अक्षरश: तुम्हाला मळमळीशिवाय सुटका होण्यासाठी थोडे विजेचे  इलेक्ट्रॉक्युट्स देतो. ज्याने तुम्हाला थोडे बरे वाटते.

Slide 5 - पाहूयात CES 2016 मध्ये सादर झालेले अदभूत गॅजेक्ट्स

स्टार वॉरर्स फोर्स बँड

CES 2016 मध्ये फोर्स हा सर्वोत्कृष्ट असा हिरो ठरला. BB-8 रोबोट टॉयच्या मागे असणारी फर्म आता रिस्टबँडसह येतेय, ज्यात फोर्सला जास्तीत जास्त पॉवर देण्याची क्षमता आहे. हा बँड यूजरला त्याच्या BB-8 droid ला आपल्या हाताच्या हालचालींवरुन त्या टॉय रोबोटला नियंत्रित करतो.

Slide 6 - पाहूयात CES 2016 मध्ये सादर झालेले अदभूत गॅजेक्ट्स

हेअरमॅक्स

जर तुम्हाला तुमच्या डोक्यावर लवकरच टक्कल पडणार आहे, अशी लक्षणे दिसत असतील, आणि तुम्हाला लवकरच केस गळण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागेल, असे वाटत असेल तर  तुम्ही त्वरित $799 चे डिवाइस घेऊन त्यापासून सुटका करु शकता. हेअरमॅक्स हे लेजर ट्रीटमेंट देणारे हेडबँज आहे. जे केवळ ९० सेकंद घातल्यास तुम्हाल तुमच्या डोक्यावरची रिकामी जागा भरत जातेय असेदिसेल. आणि टक्कलपणा जाऊन तुमच्या केसांची वाढ होईल.

Slide 7 - पाहूयात CES 2016 मध्ये सादर झालेले अदभूत गॅजेक्ट्स

स्लिप नंबर

हा बेड तुमच्या झोपेला ट्रॅक करतो आणि तुमच्या आरामदायी झोपेसाठी तुम्हाला तुमच्या शरीरातील तापमानापासून डाएटपर्यंतची सर्व माहिती देऊन काय काळजी घ्यावी याबाबत माहिती देतो.

Slide 8 - पाहूयात CES 2016 मध्ये सादर झालेले अदभूत गॅजेक्ट्स

डिजिसोल स्मार्ट शूज

हे शूज स्वत:चे स्वत: घट्ट होतात, आणि त्यातील सोल तुमच्या मोबाईलमधील अॅपद्वारा तुमच्या फुटवेअरमधील तापमान गरम आणि थंड करु शकतो.

Slide 9 - पाहूयात CES 2016 मध्ये सादर झालेले अदभूत गॅजेक्ट्स

डर्मा फेशियल ब्युटीफिकेशन सिस्टम

तुमच्या चेह-यावर पुरळ आले आहेत? तर ते घालवण्यासाठी हे मास्क नक्की घाला. हेच डर्मा फेशियल ब्युटीफिकेशन सिस्टम काम करत असल्याचा दावा करतो.

Slide 10 - पाहूयात CES 2016 मध्ये सादर झालेले अदभूत गॅजेक्ट्स

कोलीब्री किड्स स्मार्ट टूथब्रश

तुमची मुले दात घासत नाही? तर मग काळजी करु नका. हे टूथब्रश तुमच्या खूप फायद्याचे आहे. हे तुमच्या स्मार्टफोन किंवा टॅबलेटशी कनेक्ट होते आणि त्यामुळे त्यांच्या डिवाइसमध्ये गेम्स दिसतात आणि त्याच्या मदतीने तुमची मुले ते गेम्स पाहून दात घासतील. ह्यापेक्षा अजून काय हवय आपल्याला, नाही का?

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status