भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…

ने Team Digit | अपडेट Jul 06 2016
Slide 1 - भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…

नवीन स्मार्टफोन घ्यायच्या विचारात आहात? तर मग थांबा. कोणताही स्मार्टफोन घ्यायच्या आधी हा स्लाइडशो अवश्य पाहा. ह्या स्लाइडशो मध्ये आम्ही सांगणार आहोत भारतात लाँच झालेल्या आणि लॉच होण्याच्या मार्गावर असलेल्या आकर्षक स्मार्टफोन्सविषयी…चला तर मग माहिती करुन घेऊया कोणते आहेत हे स्मार्टफोन्स....

Slide 2 - भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…

शाओमी Mi मॅक्स
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी शाओमीने काही दिवसांपूर्वी भारतात आपला नवीन स्मार्टफोन Mi मॅक्स लाँच केला. भारतात ह्या स्मार्टफोनची किंमत १४,९९९ रुपयांपासून सुरु होते. डिस्प्लेच्या बाबतीत हा कंपनीचा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा स्मार्टफोन आहे. हा दोन व्हर्जनमध्ये लाँच केला गेला आहे. स्नॅपड्रॅगन 650 प्रोसेसर, 3GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेज आणि दुस-या व्हर्जनमध्ये स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसर, 4GB रॅम आणि 128GB चे अंतर्गत स्टोरेज आहे. स्नॅपड्रॅगन 650 प्रोसेसरने सुसज्ज असलेल्या 3GB रॅम व्हर्जनची किंमत १४,९९९ रुपये आहे. तर स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसरने सुसज्ज असलेल्या 4GB व्हर्जनची किंमत १९,९९९ रुपये आहे. ह्या फोनचा पहिला फ्लॅश सेल ६ जुलैला Mi.com वर आयोजित करण्यात आला आहे. हा फोन १३ जुलैपासून ओपन सेलमध्ये उपलब्ध होईल.

Slide 3 - भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…

LeEco Le 2
Le 2 स्मार्टफोनची किंमत आहे ११,९९९ रुपये. ह्यात 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले देण्यात आली आहे. हा फोन 1.8GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 3GB ची रॅम देण्यात आली आहे. ह्या फोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आले आहे. हा फोन 3000mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा ड्यूल-टोन LED फ्लॅशने सुसज्ज आहे. स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. रियर पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये USB टाइप-C पोर्टसुद्धा दिले आहे.

Slide 4 - भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…

LG G5
LG हा पहिला असा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे, ज्यात मेटल बॉडी आणि फिंगरप्रिंट स्कॅनर दिले गेले आहे. ह्यात आपल्याला 5.3 इंचाची IPS LCD डिस्प्ले 2560x1440p रिझोल्युशनसह मिळत आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर देण्यात आले आहे. हा भारतात मिळणारा दुसरा असा स्मार्टफोन आहे जो स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरसह लाँच केला गेला आहे. ह्याआधी शाओमी MI 5 स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसर देण्यात आले होते. त्याशिवाय LG च्या ह्या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 200GB पर्यंत वाढवू शकतो.

Slide 5 - भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…

मोटोरोला मोटो G4 प्लस
ह्यात आपल्याला 5.5 इंचाची FHD 1080x1920 पिक्सेलची डिस्प्ले मिळत आहे, ज्याची पिक्सेल तीव्रता 401 ppi आहे. ह्याची डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह लाँच केली आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 1.5GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅनग 617 MSM8952 प्रोसेसर दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्यात आपल्याला एड्रेनो 405 GPU सुद्धा मिळत आहे. त्याशिवाय ह्यात 2GB आणि 3GB ची रॅम दिली गेली आहे.मोटो G4 प्लस स्मार्टफोनला 16MP चा रियर कॅमेरा f/2.0, अॅपर्चर, फेज डिटेक्शन ऑटोफोकस आणि लेझर ऑटोफोकससह ड्यूल-LED कलर बॅलेसिंग फ्लॅश दिला गेला आहे त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिगं कॅमेरासुद्धा गेला आहे. ह्यात 3000mAh क्षमतेची बॅटरी मिळत आहे.

Slide 6 - भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…

LeEco Le मॅक्स 2
Le मॅक्स 2 कंपनीचा फ्लॅगशिप डिवाइस आहे आणि हा दोन व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. ह्याचा एक व्हर्जन 4GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, तर दुसरा व्हर्जन 6GB रॅम आणि 64GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. ह्याची किंमत २२,९९९ रुपये आणि २९,९९९ रुपये आहे. Le मॅक्स 2 मध्ये 5.7 इंचाची QHD डिस्प्ले दिली आहे. ह्यात 2.15GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरसुद्धा दिला गेला आहे. हा फोन 21 मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलच्या फ्रंट फेसिंग कॅमे-याने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 3100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Slide 7 - भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…

मोटोरोला मोटो G4
हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0.1 मार्शमॅलोवर चालतो. त्याचबरोबर ह्यात आपल्याला ड्यूल सिम सपोर्टसह फिंगरप्रिंट स्कॅनरसुद्धा मिळत आहे. ह्यात आपल्याला 5.5 इंचाची FHD 1080x1920 पिक्सेलची डिस्प्ले मिळत आहे, ज्याची पिक्सेल तीव्रता 401 ppi आहे. ह्याची डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह लाँच केली आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 1.5GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅनग 617 MSM8952 प्रोसेसर दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्यात आपल्याला एड्रेनो 405 GPU सुद्धा मिळत आहे. त्याशिवाय ह्यात 2GB आणि 3GB ची रॅम दिली गेली आहे. मोटो G4 मध्ये आपल्याला 13MP चा कॅमेरा मिळत आहे. हा स्मार्टफोन आपल्याला केवळ 2GB/ 16GB च्या व्हर्जनमध्येच मिळत आहे. ह्याच्या किंमतीविषयी कंपनीने अजून काहीच माहिती दिलेली नाही.

Slide 8 - भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…

ऑनर 5C

ह्या स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली आहे. ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 1920x1080 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन किरिन 650 64-बिट ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात 2GB ची रॅम देण्यात आली आहे. हा फोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. ह्या फोनला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवले जाऊ शकते. हा फोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे आणि ह्यावर हुआवे EMUI 4.1 दिला आहे. फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्यासह LED फ्लॅशसुद्धा देण्यात आली आहे. ह्याचे अॅपर्चर f/2.0 आहे. हा 8 मेगापिक्सेलच्या फ्रंट फेसिंग कॅमे-यासह येतो. हा 77 डिग्री वाइड अँगल्स लेन्ससह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 4G LTE सह VoLTE सपोर्टसुद्धा देण्यात आला आहे. ह्यात वायफाय, ब्लूटुथ 4.1, GPS/A-GPS आणि मायक्रो-USB 2.0 पोर्ट देण्यात आले आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये एक फिंगरप्रिंट सेंसर 2.0 सुद्धा दिला गेला आहे.

Slide 9 - भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…

HTC 10
ह्या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. ह्या कॅमे-यामध्ये सोनी Exmor R IMX377 इमेज सेंसर आहे. हा कॅमेरा OIS आणि लेजर असिस्टेड ऑटोफोकस आणि f/1.8 लेन्सने सुसज्ज आहे. ह्याचा रियर कॅमेरा 4K व्हिडियोसुद्धा रेकॉर्ड करतो. फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा देण्यात आला आहे. HTC 10 स्मार्टफोनमध्ये आपल्याला 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आली आहे. ह्या स्टोरेजला आपण 2TB पर्यंत वाढवू शकतो. ह्या फोनमध्ये होम बटन फिंगरप्रिंट स्कॅनरसारखे वापरू शकतो. फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा क्विक चार्ज 3.0 सपोर्टसह येतो. हा फोन अॅनड्रॉईड मार्शमॅलोवर काम करतो. ह्या फोनला 5 जूनला शिप केले जाईल आणि पहिल्या 500 ग्राहकांना HTC चे डॉट व्यू केज मोफत दिली जाईल.

Slide 10 - भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…

वनप्लस 3
हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित ऑक्सिजन OS वर चालतो. ह्यात 5.5 इंचाची ऑप्टिक AMOLED पुर्ण HD डिस्प्ले देण्यात आली आहे. ही डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 4 ने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर आणि 6GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात एड्रेनो 530 GPU दिला गेला आहे. ह्यात 64GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आले आहे. ह्या स्टोरेजला आपण वाढवूही शकतो. ह्या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. ह्या रियर कॅमे-यासह LED फ्लॅशसुद्धा देण्यात आली आहे. ह्या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा देण्यात आला आहे. ह्या फोनमध्ये एक फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा देण्यात आले आहे. कनेक्टिव्हीटीसाठी ह्यात NFC सपोर्ट, USB टाइप-C, वायफाय, ब्लूटुथ आणि GPS सारखे फीचर्स देण्यात आले आहे. हा फोन 3000mAh  बॅटरीने सुसज्ज आहे.

Slide 11 - भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…

सोनी एक्सपिरिया X

सोनी एक्सपिरिया X स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 650 प्रोसेसर आहे. ह्यात 3GB रॅमसुद्धा दिली गेली आहे. ह्यात 23 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. ह्यात 64GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेल आहे. हा फोन 2620mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे. कंपनीचा दावा आहे की, ह्याची बॅटरी दोन दिवसांचा बॅकअप देईल.

Slide 12 - भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…


कूलपॅड मॅक्स

ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची FHD 1080x1920 पिक्सेलची डिस्प्ले मिळत आहे, जी 401ppi पिक्सेल तीव्रतेसह मिळत आहे, त्याशिवाय ह्यात आपल्याला गोरिल्ला ग्लास 4 चे प्रोटेक्शन मिळत आहे. ह्यात आपल्याला 64 बिट 1.5GHz ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 617 प्रोसेसर मिळत आहे. चीनमध्ये हा स्नॅपड्रॅगन 615 सह लाँच केला गेला होता. ह्या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर , ह्यात आपल्याला 13MP चा रियर कॅमेरा Isocell सेंसर, f/2.0 अॅपर्चर, फेज डिटेक्शन ऑटोफोकस आणि ड्यूल टोन LED फ्लॅशसह दिला गेला आहे, त्याशिवाय ह्यात आपल्याला 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. ह्यात आपल्याला 2800mAh क्षमतेची बॅटरी मिळत आहे. जी कंपनीनुसार, 310 तासांचा स्टँडबाय टाइम आणि 17 तासांचा टॉक टाइम देण्यास सक्षम आहे. त्याशिवाय ह्यात आपल्याला 4G LTE, वायफाय आणि ब्लूटुथ सारखे बेसिक फीचर सुद्धा मिळत आहे.

Slide 13 - भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…

शाओमी रेडमी 3

हा स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन भारताबाहेर लाँच झाला आहे.

Slide 14 - भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…

आसूस झेनफोन 3

मोबाईल निर्माता कंपनी आसूसने आपल्या स्मार्टफोन रेंजमध्ये झेनफोन 3 ला जूनमध्ये लाँच करेल. असे कंपनीचे सीईओ Jerry Shen यांनी सांगितलय. एका टेक साइटच्या रिपोर्टनुसार, Shen चे म्हणणे आहे की, झेनफोन 3 स्मार्टफोनचा मुख्य उद्देश बाजारात मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच करणे आहे. मात्र आसूसने त्यांच्या नवीन डिवाइसच्या हार्डवेयर स्पेसिफिकेशनविषयी कोणताही खुलासा केलेला नाही. त्यांनी असेही सांगितले आहे होते की, झेनफोन 3 सीरिज ऑगस्टमध्ये 6 देशांत उपलब्ध होईल. त्याचबरोबर Shen ने झेनफोन 3 मॅक्सविषयी सुद्धा खुलासा करताना असे सांगितले आहे की, झेनफोन 3 मॅक्स झेनफोन 3 शिपमेंटच्या २ ते ३ टप्प्यांत कवर करेल. त्याशिवाय झेनफोन 3 च्या दुस-या प्रकारात झेनफोन 3 डिलक्स आणि झेनफोन 3 विषयी सुद्धा अनेक खुलासे केले गेले आहे.

Slide 15 - भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…

मोटो Z
मोटो Z स्मार्टफोन 5.2mm इतका पातळ आहे आणि ह्याला एयरक्राफ्ट-ग्रेड अॅल्युमिनियम आणि स्टेनलेस स्टीलने बनवले गेले आहे. ह्यात 5.5 इंचाची QHD AMOLED डिस्प्ले दिली गेली आहे. ह्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर आणि 4GB रॅमसुद्धा देण्यात आली आहे. हा फोन 32GB आणि 64GB च्या एक्सपांडेबल स्टोरेजसह येतो. ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. हा रियर कॅमेरा लेजर ऑटोफोकस, OIS आणि ड्यूल-टोन LED फ्लॅशने सुसज्ज आहे. फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्यात एक फिंगरप्रिंट स्कॅनरसुद्धा आहे. हा डिवाइस 2600mAh बॅटरीने सुसज्ज आहे. ह्यात USB टाइप-C कनेक्टर दिला गेला आहे आणि हा अॅनड्रॉईड 6.0.1 मार्शमॅलोवर चालतो.

Slide 16 - भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…

लेनोवो फॅब प्रो

Slide 17 - भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…

सोनी एक्सिपिरिया XA
सोनी एक्सपिरिया XA स्मार्टफोनमध्ये ह्यात 5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720x1280 पिक्सेल आहे. ह्या फोनमध्ये मिडियाटेक MT6755 प्रोसेसर आणि 2GB ची रॅम देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 200GB पर्यंत वाढवू शकतो. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड मार्शमॅलो 6.0 वर चालतो ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा 2300mAh ची बॅटरी दिली गेली आहे. फोनचे परिमाण 143.6x66.8x7.9mm आणि वजन 138 ग्रॅम आहे.

Slide 18 - भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…

आसूस झेनफोन 3 अल्ट्रा
 

Slide 19 - भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…

आसूस झेनफोन 3 डिलक्स

Slide 20 - भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…

सॅमसंग गॅलेक्सी C7

Slide 21 - भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…

लेनोवो ZUK Z2

ह्या फोनमध्ये ५ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे. ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 1920x1080 पिक्सेल आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 441ppi आहे. ह्या फोनमध्ये 2.15GHz स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर दिले आहे. ह्यात 4GB रॅमसुद्धा दिली गेली आहे आणि हा एड्रेनो 530 GPU ने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. ह्यात 64GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. हा फोन 3500mAh बॅटरीने सुसज्ज आहे. ह्या फोनचा आकार 141x68.88x8.45mm आणि वजन १४९ ग्रॅम आहे. ह्यात 4G LTE, वायफाय, ब्लूटुथ आणि USB 2.0 टाइप-C पोर्टसारखे फीचर्स देण्यात आले आहे. ह्या फोनमध्ये होम बटनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर सुद्धा देण्यात आला आहे.

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status