रक्षाबंधन साजरा करण्यासाठी डीटल ने आपल्या ग्राहकांसाठी कॉम्बो ऑफर ची घोषणा केली आहे

रक्षाबंधन साजरा करण्यासाठी डीटल ने आपल्या ग्राहकांसाठी कॉम्बो ऑफर ची घोषणा केली आहे
HIGHLIGHTS

वर्षातून एकदा साजरा होणाऱ्या रक्षाबंधनाची सर्वचजण आतुरतेने वाट बघत असतात.

वर्षातून एकदा साजरा होणाऱ्या रक्षाबंधनाची सर्वचजण आतुरतेने वाट बघत असतात. त्यामुळे बहिणी व्यस्त असतात सर्वात स्टाइलिश, सर्वात खास राखी आणि रक्षाबंधन कार्ड विकत घेण्यात, तर भाऊ आपल्या बहिणीला कशी खास भेट देता येईल याची योजना बनवत असतात. त्यांच्या याच भावनेचा विचार करून डीटल ने 24 ऑगस्ट पासून 26 ऑगस्ट 2018 दरम्यान आपल्या मोबाईल आणि एक्सेसरीज वर आकर्षक कॉम्बो ऑफरची घोषणा केली आहे, जी खासकरून डीटल च्या अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध आहे.

कंपनी ने आपल्या सर्वोत्तम फीचर फोन- डी1 टॉकी, डी1 गोल्ड, डी1 बूम आणि डी1 स्लीक वर आकर्षक ऑफरची घोषणा केली आहे. डीटल डी1 टॉकी चा ‘टॉकिंग फीचर’ सर्वात लोकप्रिय फीचर आहे, तर डी1 गोल्ड आणि डी1 स्लीक कंपनी चे प्रीमियम कॅटेगरीमधील फीचर फोन आहेत. यात दोन कॉम्बो ऑफर आहेत ज्यांची किंमत 899 रुपये आहे तर तिसऱ्या ऑफर ची किंमत 1,947 रुपये आहे.

आपल्या शानदार आणि अद्वितीय रेंज मधील उत्पादनां सोबत या ऑफर्स च्या माध्यमातून डीटल सर्व भाऊ बहिणींसाठी रक्षाबंधनाचा सण अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या व्यापक आणि जलद डिलेवरी नेटवर्क ने समृद्ध हे पोर्टल अशा प्रकारच्या आर्डर मेट्रो शहरांमध्ये दुसऱ्या दिवशी दिलेल्या पत्त्यावर पोहचवण्याचे आश्वासन देत आहे.

यावेळी डीटल चे एमडी योगेश भाटिया बोलले कि, “आपल्या भाऊ किना बहिणी बद्दल आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी रक्षाबंधनापेक्षा चांगली संधी असूच शकत नाही. यावर्षी डीटल आपल्या या आकर्षक तसेच किफायती कॉम्बो भेट वस्तूंच्या माध्यमातून हा सण अविस्मरणीय बनवण्यासाठी तुमची मदत करत आहे. डीटल चे फोन साधे पण नाविन्याने भरलेले आहेत, ज्यातून तुम्हाला आपल्या कुटुंबाशी नेहमीच संपर्कात राहता येईल.”

ते म्हणाले, “तुम्ही तुमच्या बहिणी सोबत नेहमीच राहू शकत नाही, पण त्यांच्यासोबत नेहिमीच असल्याचा दिलासा देऊ शकता. रक्षाबंधनाच सण  खऱ्या अर्थाने साकार करत डीटल तुम्हाला तुमच्या बहिणीच्या ‘सुरक्षीची’ भेट देत आहे. आमच्या सर्व फीचर फोन मध्ये पॅनिक बटन आहे, जो महिलेच्या सुरक्षेची काळजी घेतो.”

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo