Xiaomi च्या Huami कडून दोन नवीन स्मार्टवॉच 24 जुलै ला केले जाऊ शकतात लॉन्च

Xiaomi च्या Huami कडून दोन नवीन स्मार्टवॉच 24 जुलै ला केले जाऊ शकतात लॉन्च
HIGHLIGHTS

Xiaomi Huami Amazfit Bip आणि Amazfit Stratos भारतात केले जाऊ शकतात लॉन्च.

Xiaomi Huami to launch two Smartwatches in India on 24 July: Xiaomi चा सब्सिडियरी ब्रांड Huami 24 जुलै ला भारतात लॉन्च केला जाऊ शकतो, हा ब्रांड आपल्या फिटनेस ट्रॅकर्स साठी प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर चीन मध्ये हा आपल्या स्मार्टवॉच इत्यादी साठी पण ओळखला जातो. 

तसेच हा ब्रांड आपल्या कमी किंमतीत येणार्‍या जबरदस्त वेयरेबल्स साठी पण प्रसिद्ध आहे, याचा अर्थ असा की हा काही प्रतिस्पर्धी डिवाइस ची किंमत कमी करू शकतो. विशेष म्हणजे Xiaomi ने आधीच वेयरेबल सेगमेंट मध्ये स्वतःला स्थापित केले आहे आणि आपल्या Mi Band fitness ट्रॅकर्स लॉन्च केले आहेत. 

आता Xiaomi च्या सब-ब्रांड बद्दल माहिती समोर आली आहे, असे बोलेल जात आहे की हा भारतात आपले Amazfit Bip आणि Amazfit Stratos स्मार्टवॉचेस लॉन्च करू शकतो, असे समजले आहे की हे डिवाइस लवकरच म्हणजे येत्या काही दिवसांत लॉन्च केले जाऊ शकतात. 

फीचर्स बद्दल बोलायचे तर Amazfit Bip एका 1.28-इंचाच्या रेक्टंगुलर डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो, याचे रेजोल्यूशन 176×176 पिक्सल आहे, त्याचबरोबर याला गोरिला ग्लास 3 चे प्रोटेक्शन पण देण्यात आले आहे. हा तुमच्या स्टेप्स ट्रॅक करू शकतो, तुमची रनिंग पण हा ट्रॅक करतो, तसेच यात साइकिलिंग साठी पण ट्रॅकर आहे आणि यात तुमची हार्ट बीट मोजण्यासाठी पण खुप काही देण्यात आले आहे. हा वॉच ब्लूटूथ 4.0 LE च्या सपोर्ट सह येतो, तसेच हा iOS आणि एंड्राइड ला पण सपोर्ट करतो. 

याला IP68 चे सर्टिफिकेशन मिळाले आहे, याचा अर्थ असा की हा वाटर आणि डस्ट रेसिस्टेंट आहे. या वॉच मध्ये तुम्हाला एक 190mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. ही कंपनी नुसार 30 दिवस चालेल. 

तसेच दुसर्‍या वॉच बद्दल बोलायचे तर Huami Amazfit Stratos मध्ये तुम्हाला एक 1.34-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात तुम्हाला 1.2GHz चा एक ड्यूल-कोर प्रोसेसर मिळत आहे, तसेच यात तुम्हाला 512MB च्या रॅम सह 4GB ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, यात तुम्हाला नोटिफिकेशन जसे की कॉल्स, मेसेज, ईमेल आणि इतर अॅप्स च्या पण नोटिफिकेशन मिळतील. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo