भारतातही उपलब्ध झाले पेबल स्मार्टवॉच, किंमत ५,९९९ रुपये

भारतातही उपलब्ध झाले पेबल स्मार्टवॉच, किंमत ५,९९९ रुपये
HIGHLIGHTS

पेबलने भारतात आपल्या स्मार्टवॉचला सर्वात स्वस्त किंमतीत ५,९९९ रुपयात विकत आहे. हे वॉच वॉटरप्रुफ आहे.

स्मार्टवॉच बनवणारी कंपनी पेबल आता भारतातसुद्धा आपले स्मार्टवॉच विकत आहे. पहिली पेबल स्मार्टवॉच ज्याला पेबल क्लासिक, जी सर्वात स्वस्त स्मार्टवॉच आहे. ज्याची किंमत ५,९९९ रुपये आहे. भारतीय बाजारात पेबल टाइम, पेबल टाइम राउंड आणि पेबल टाइं स्टीलसुद्धा उपलब्ध आहे, ज्याची किंमत क्रमश: ९,९९९, १३,५९९ आणि १५,९९९ रुपयांपर्यंत आहे. हे डिवाइस भारतात विशेषकरुन ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनवर उपलब्ध होईल.
 

त्यानंतर पेबल आपल्या पेबल हेल्थ इकोसिस्टमसुद्धा भारतात लाँच करेल. पेबलचे संस्थापक आणि सीईओ Eric Migicovsdky ने सांगितले की, “आम्ही पेबलला भारतात लाँच करुन खूप खुश आहोत. भारतीय यूजरने नेहमी नवीन तंत्रज्ञान आपलेसे केले आहे. खास करुन मोबाईलच्या बाबतीत” त्यांनी पुढे असेही सांगितले की, “ह्यासाठी आम्हाला आशा आहे की, भारतात पेबलचे भविष्य उज्ज्वल आहे. आमचे खास प्रोडक्ट स्वस्त किंमतीत उत्कृष्ट अनुभव देतात.”

अॅमेझॉनवर खरेदी करा पेबल क्लासिक 301BL स्मार्टवॉच केवळ ५,९९९ रुपयांत

अॅमेझॉनवर खरेदी करा पेबल टाइम 501-00020 स्मार्टवॉच ९,९९९ रुपयात

अॅमेझॉनवर खरेदी करा पेबल टाइम राउंड 601-00046 स्मार्टवॉच १३,५९९ रुपयात

अॅमेझॉनवर खरेदी करा Smartwatch पेबल टाइम स्टील 511-00023 स्मार्टवॉच १५,९९९ रुपयांत

पेबल स्मार्टवॉचची तुलना अॅनड्रॉईड आणि iOS सह केली जाते. ह्यात 13,000 पेक्षा जास्त अॅप आहेत. पेबल क्लासिक 144×168 पिक्सेल रिझोल्युशनसह 1.26 इंच ई-पेपर डिस्प्लेसुद्धा आहे. डिवाइसमध्ये मोशन-सेंसिंग accelerometer आणि एम्बिल्ट लाइट सेंसरसुद्धा आहे. ही स्मार्टवॉच वॉटरप्रुफसह ७ दिवसांची बॅटरी बॅकअप देते. क्लासिक मॉडल चेरी रेड, जेट ब्लॅक आणि व्हाइट रंगात उपलब्ध आहे. पेबलने दावा केला आहे की, पेबल टाइम राउंड ७ दिवसांची बॅटरी लाइफ देतो. आणि पेबल टाइम स्टील 10 दिवसांच्या बॅटरी लाइफसह येतो. ह्याला आपण क्विक चार्जसुद्धा करु शकता. ह्याचे वजन क्रमश: 14mm, 20mm आणि 28mm आहे.

हेदेखील वाचा – भारतात लाँच झाला मिजू M3 नोट, किंमत ९,९९९ रुपये
हेदेखील वाचा – 
आयबॉलने लाँच केले दोन नवीन स्वस्त लॅपटॉप्स, किंमत १०,००० रुपयांपासून सुरु

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo