भारतात लाँच झाला हुआवे स्मार्टवॉच स्टेनलेस स्टील वेरियंट, किंमत २२,९९९ रुपये

HIGHLIGHTS

हुआवेने फ्लॅगशिप स्मार्टफोन P9 लाँच करण्यासोबतच आपले नवीन स्टेनलेस स्टील वेरियंटमधील स्मार्टवॉचसुद्धा लाँच केले. हे वॉच फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

भारतात लाँच झाला हुआवे स्मार्टवॉच स्टेनलेस स्टील वेरियंट, किंमत २२,९९९ रुपये

फ्लिपकार्टवर खरेदी करा हुआवे स्टेनलेस स्टील वॉच २२,९९९रुपये

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेला हुआवेचा फ्लॅगशिप स्मार्टफोन P9 अखेर भारतात लाँच झाला. त्याचबरोबर हुआवेने आपले स्टेनलेस स्टील स्मार्टवॉचसुद्धा लाँच केले. हुआवेने ह्याआधी ह्याचा लेदर पट्ट्याचा व्हर्जन लाँच केला होता आणि आता ह्याचा नवीन स्टेनलेस स्टील वेरियंट लाँच केला आहे. ह्याची किंमत २२,९९९ रुपये आहे आणि हा फ्लिपकार्टच्या माध्यमातून खरेदी करु शकता.

ह्या स्मार्टवॉचच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 1.4 इंचाची गोल AMOLED डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 400×400 पिक्सेल आहे आणि ह्याची पिक्सेल तीव्रता 286ppi आहे. हा डिस्प्ले सेफियर क्रिस्टल ग्लासने प्रोटेक्टेड आहे. ह्यात 1.2GHz स्नॅपड्रॅगन 400 प्रोसेसर दिले गेले आहे. ह्यात 512MB ची रॅम आणि 4GB चे ऑनबोर्ड स्टोरेज दिले गेले आहे.
 

त्याचबरोबर ह्यात 300mAh ची बॅटरी दिली गेली आहे, जी रोजच्या वापरावर दोन दिवसापर्यंत चालते. त्याचबरोबर हा स्मार्टवॉच IP67 प्रमाणित आहे.

हेदेखील पाहा – [Marathi] LeEco Super 3 TVs – LeEco सुपर 3 टीव्ही फर्स्ट लूक

ह्याच्या कनेक्टिव्हिटीविषयी बोलायचे झाले तर, ह्यात वायफाय, ब्लूटुथ 4.1 LE दिले गेले आहे. हा स्मार्टवॉच मार्शमॅलोने अपडेट केला आहे.

हेदेखील वाचा – BSNL ने आपल्या लँडलाइन यूजर्ससाठी केली मोफत अनलिमिटेड कॉलिंगची घोषणा
हेदेखील वाचा – सॅमसंगने भारतात लाँच केला गॅलेक्सी नोट 7 स्मार्टफोन, किंमत ५९,९९० रुपये

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo