Fitbit च्या नवीन Charge 3 ट्रॅकर मध्ये देण्यात आलेल्या बॅकलाइट, टच-इनेबल OLED डिस्प्लेच्या माधमातून तुम्ही स्टेप काउंट्स, हार्ट रेट इत्यादी सहज बघू शकता. या नवीन ट्रॅकरची किंमत Rs 13,999 ठेवण्यात आली आहे.
अमेझॉन इंडिया, Croma आणि रिलायंस डिजिटल स्टोर्स वर झाला उपलब्ध
सिंगल चार्ज मध्ये सात दिवस चालू शकते बॅटरी
Survey
✅ Thank you for completing the survey!
Fitbit ने भारतात आपला नवीन Charge 3 फिटनेस ट्रॅकर लॉन्च केला आहे. नवीन फिटनेस ट्रॅकर Rs 13,999 मध्ये लॉन्च केला गेला आहे. फिटबिटचा हा फ्लॅगशिप एक्टिविटी ट्रॅकर नवीन फीचर्स आणि सुधारांसह येतो.
Fitbit Charge 3 24×7 हार्ट-रेट मॉनिटरिंग सारख्या फीचर्स सह येतो आणि आपोआप वेगवेगळे व्यायाम जसे कि धावणे, पोहणे इत्यादी ओळखतो. हा ट्रॅकर फिटनेस संबंधित अनेक पॅरामीटर्स सह येतो, ज्यात कॅलोरीज जाळणे इत्यादींचा समावेश आहे. या ट्रॅकर मध्ये GPS फंक्शनालिटी पण देण्यात आली आहे ज्याने तुम्ही आउटडोर एक्टिविटी म्हणेज रनिंग किंवा जॉगिंग चालू असताना रियल-टाइम स्टेटची माहिती मिळवू शकता.
ऍप बद्दल बोलायचे तर तुम्ही यात तुमचे फिटनेस गोल्स सेट करू शकता, इतर Fitbit युजर्स सोबत चॅलेंज सेटअप करू शकता तसेच फिटनेस-केन्द्रित युजर्सच्या कम्युनिटी मधून व्यायामासंबंधित आवश्यक गोष्टी जाणून घेऊ शकता. तसेच मिरर्ड नोटिफिकेशंसने पेयर केल्या गेलेल्या स्मार्टफोन्सच्या नोटिफिकेशन पण मिळवू शकता. तुम्ही ट्रॅकर वरुनच एखाद्या टेक्स्ट मेसेजचा रिप्लाई पण करू शकता.
नवीन Fitbit Charge 3 मध्ये देण्यात आलेल्या बॅकलाइट, टच-इनेबल OLED डिस्प्लेच्या माधमातून तुम्ही स्टेप काउंट्स, हार्ट रेट इत्यादी सहज बघू शकता. नवीन सील डिजाइनमुळे Charge 3 ट्रॅकर 50m पर्यंतच्या खोलीत पण वॉटर-रेसिस्टेंट राहतो. हा सिक्योर पेमेंट फंक्शनालिटी (फिटबिट पे) सह येतो जी NFC टेक्नोलॉजीचा वापर करून चालते. कंपनीचा दावा आहे कि Charge 3 ची बॅटरी सिंगल चार्ज मध्ये सात दिवस चालू शकते.
Fitbit Charge 3 अमेझॉन इंडिया आणि मोठ्या ऑफलाइन रिटेलर्स जसे कि Croma आणि रिलायंस डिजिटल इत्यादींवर उपलब्ध झाली आहे.