CES 2019: Panasonic ने GZ2000 65-इंच आणि 55-इंच OLED TVs ची घोषणा केली

CES 2019: Panasonic ने GZ2000 65-इंच आणि 55-इंच OLED TVs ची घोषणा केली
HIGHLIGHTS

Panasonic चे हे OLED TV HDR 10+ आणि HDR कन्टेंट साठी Dolby Vision ला पण सपोर्ट करतात, तसेच हे टीवी 4K ला पण सपोर्ट करतात.

CES 2019 मध्ये पॅनासोनिक ने आपल्या GZ2000 4K OLED टीवी लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. टीवी 55-इंच आणि 65-इंच स्क्रीन साइज मध्ये उपलब्ध होतील. पॅनासोनिक म्हणते कि या टीवीज एका “professional edition” पॅनलचा वापर करत आहेत. हा पॅनल हॉलीवुड मध्ये रंगकर्मी स्टीफन सोननफेल्ड द्वारा ट्यून करण्यात आला आहे. पॅनासोनिकचा दावा आहे कि GZ2000 जगातील पहिला टीवी आहे ज्यात बिल्ट-इन-अप-फायरिंग स्पीकर आहेत जे डॉल्बी एटमॉस ऑडियो देण्यास सक्षम आहेत. टीवी ची ऑडियो सिस्टम पण टेकनीक इंजिनियरांनी ट्यून केली आहे. डॉल्बी एटमॉस साउंड असलेला टीवी आंम्ही पहिल्यांदाच बघत आहोत. 
GZ2000 चा HDR OLED पॅनल पॅनासोनिक च्या HCX PRO इंटेलिजेंट प्रोसेसर द्वारा संचालित आहे. स्मार्ट यूआई बद्दल बोलायचे तर टीवी कंपनीच्या होम स्क्रीन 4.0 सह येत आहे. आम्ही नुकतीच पॅनासोनिक एफएक्स -800 डी ची समीक्षा केली हाये जी एक 4K एलईडी टीवी आहे. 

पॅनासोनिक द्वारा आम्हाला पाठवण्यात आलेल्या प्रेस रिलीज मध्ये टीवी नवीन एचडीएमआई 2.1 स्टॅन्डर्ड ला सपोर्ट करतात कि नाही हे सांगण्यात आलेले नाही. टेक रडार अनुसार, टीवी एचडीएमआई 2.1 ला सपोर्ट करत नाहीत.

कंपनी ने पण 8K केलेला नाही. दुसरीकडे Sony, Samsung आणि LG यांनी CES 2019 मध्ये आपले 8K संचालित प्रोडक्ट्स प्रदर्शित केले आहेत. पॅनासोनिक एफएक्स -800 डी ची आम्ही केलेली समीक्षेवरून असे वाटते कि पॅनासोनिक बेस्ट पिक्चर क्वालिटी कायम ठेवील. पण जर तुम्ही एका टीवी साठी 1,00,000 रुपये खर्च करता तेव्हा काही टेक्नॉलॉजी जसे कि एचडीएमआई 2.1 आणि बरेच काही नसल्याने हिरमोड होऊ शकतो. भारतात टीवीच्या किंमतीची किंवा उपलब्दतेची कोणतीही माहिती मिळालेली नाही.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo