Detel ने मात्र Rs 3,999 मध्ये लॉन्च केला जगातील सर्वात इकॉनोमिक टीवी

Detel ने मात्र Rs 3,999 मध्ये लॉन्च केला जगातील सर्वात इकॉनोमिक टीवी
HIGHLIGHTS

सरकार डिसेंबर 2018 पर्यंत प्रत्येक घरात वीज पोचवण्यासाठी पाऊले टाकत आहे, त्यामुळे टेलीविजन बाजार पण चांगल्यप्रकारे विकसित होण्याची तयारी करत आहे.

भारतीय बाजारात आपली ओळख निर्माण केलेल्या कंपनी डीटल ने आज जगातील सर्वात किफायतीशीर टीवी फक्त 3,999 रुपयांमध्ये लॉन्च केला. हा 19 इंचाचा डी1 टीवी, कंपनीने लॉन्च केलेला पहिला एलसीडी टीवी आहे. नवीन टीवी विक्री साठी डीटलच्या मोबाईल ऍप आणि B2BAdda.com वर वितरक/ भागीदारांसाठी उपलब्ध आहे. 

आश्चर्यकारक बाब म्हणजे इतर अनेक कारणांच्या व्यतिरिक्त केवळ ऐपत नसल्यमुळे आज पण भारतातील 33 टक्क्यांपेक्षा अधिक लोक टेलीविजन पर्यंत पोहचलेले नाहीत. सरकार डिसेंबर 2018 पर्यंत प्रत्येक घरात वीज पोचवण्यासाठी पाऊले टाकत आहे, त्यामुळे टेलीविजन बाजार पण चांगल्यप्रकारे विकसित होण्याची तयारी करत आहे. 

यावेळी डीटल चे एमडी योगेश भाटिया म्हणाले, “ग्राहकांकडून प्रेरणा घेऊन काही तरी नवीन निर्माण  विश्वास आहे. टीवी च्या वाढत्या किंमतींमुळे किफायतीशीर टीवी च्या बाजार रिकामाच आहे. डीटल डी1 टीवी सादर करून आम्ही हा रिक्तपणा आमच्या मिशन #HarGharTV केच्या माध्यमातून दूर करण्याची तयारी आम्ही केली आहे. आम्ही इतर एखाद्या ब्रँडच्या पुढे जाण्यासाठी उत्पादन बनवत नाही तर आम्ही तिथे उपस्थिती दर्शवतो जिथे कोणताही ब्रँड जात नाही. आमच्या डी1 टीवी च्या माध्यमातून देशाच्या दुर्गम भागात पोहचण्याचे आमचे लक्ष्य आहे आणि लाखो लोकनाचे जीवन आम्हाला बदलायचे आहे.” 

भारताचा सर्वात स्वस्त टीवी असल्याचा दावा करणाऱ्या डी1 एलसीडी टीवी मध्ये 48.3 सेमी किंवा 19‘‘ चा डिस्प्ले आणि 1366×768 पिक्सेल रिजोल्यूशन आहे. हा ए प्लस ग्रेड पॅनल सह येतो ज्यामुळे एकदम साफ इमेज क्वालिटी मिळते आणि याचा कंट्रास्ट रेशियो 3,00,000:1 आहे. अशाप्रकारे विजुअल सेंस वर याचा दीर्घकाळ प्रभाव कायम राहतो. टीवी मध्ये कनेक्टिविटी साठी एक एचडीएमआई आणि एक यूएसबी पोर्ट आहे. आपल्या डिजाइन मध्ये अनोखी असणाऱ्या या टीवी च्या पॅनलच्या किनाऱ्यांवर दोन स्पीकर आहेत ज्यामुळे याचा डिस्प्ले आकर्षक वाटतो. यातील 12 वॅट चे स्पीकर स्पष्ट आणि स्मूथ ऑडियो आउटपुट देतात ज्यामुळे बघणाऱ्यांना एक अद्भुत अनुभव मिळतो. 

आपल्या ‘40 कोटी भारतीयांना जोडण्याच्या #connecting40croreindians मोहिमेअंतर्गत जगातील सर्वात किफायतीशीर फीचर फोन सादर करून डीटल ने आर्थिकदृष्ट्या सर्वात खालच्या स्थरातील लोकांसाठी संचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता आपल्या नवीन सादरीकरणामुळे कंपनी या उद्योगात नवीन कीर्तिमान स्थापित करत आहे. डीटल ने यावर्षीच्या सुरवातीला कन्ज्युमर इलेक्ट्रॉनिक बाजारात प्रवेश केला होता आणि आता पर्यंत या ब्रँड ने वेगवेगळ्या वर्गातील लोकांना सेवा देण्यासाठी 24’’ पासून 65’’ पर्यंतचे 7 एलईडी टीवी (ज्यात स्मार्ट टीवी पण सामील आहे) यशस्वीरीत्या सादर केले आहेत.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo