RELIANCE JIO चे पाच सर्वात धमाकेदार प्रीपेड प्लान्स ज्यात मिळतो जास्त डेटा…

RELIANCE JIO चे पाच सर्वात धमाकेदार प्रीपेड प्लान्स ज्यात मिळतो जास्त डेटा…
HIGHLIGHTS

जेव्हा Reliance Jio समोर येते तेव्हा समोर येते कि तुम्हाला जास्त डेटा आणि कॉलिंग आपोआप मिळणार आहे

आता आम्ही तुम्हाला कंपनीच्या इतर प्रीपेड प्लान्स व्यतिरिक्त पाच सर्वोत्तम प्रीपेड रिचार्ज प्लान्स बद्दल सांगणार आहोत

ज्यात तुम्हाला फक्त जास्त डेटाच नाही तर नॉन-जियो कॉलिंग पण मिळत आहे

जेव्हा स्वस्तात सर्वात जास्त डेटा मिळवण्याचा विषय निघतो तेव्हा रिलायंस जियो एकफक्त असा दूरसंचार ऑपरेटर आहे जो लोकांच्या डोक्यात येतो. रिलायंस जियो कडे पण प्रीपेड पोर्टफोलियो मध्ये काही प्लान आहेत जे इतरांच्या तुलनेत जास्त डेटा देतात. रिलायंस जियो सोबत काही आठवड्यांपूर्वी गोष्टी सोप्प्या होत्या, कारण लोकांना मोठ्या रिलायंस जियो प्रीपेड पोर्टफोलियोची समज येऊ लागलेली आणि त्यांना आपल्या सर्वात चांगल्या प्रीपेड प्लान्स बद्दल समजत होते. पण नवीन आईयूसी चार्जमुळे (जो आवश्यक आहे) प्रकरण सोप्पं राहिलं नाही, जितकं ते आधी होतं. कारण आता तुम्हाला इतर ऑपरेटर्स वर आउटगोइंग कॉल करण्यासाठी पैसे द्यावे लागतील, सोबत रिलायंस जियोच्या ऑल इन-वन प्लान्स ची सुरवात केल्यामुळे ग्राहकांचा गोंधळ वाढला आहे.  

आता ग्राहकांनाच सरळ सोप्पा प्रश्न आहे कि त्यांनी आता कोणता प्लान घ्यावा, ज्यात त्यांना फक्त डेटाच नाही तर त्यांना नॉन जियो कॉल्सचा पण लाभ मिळू शकेल. याचे उत्तर पण रिलायंस जियो कडे आहे, विशेष म्हणजे कंपनी कडे असे अनेक प्लान्स आहेत जे तुम्हाला फक्त डेटाच नाही तर नॉन-जियो कॉल्स पण देतात. चला जाणून घेऊया तुम्हाला या श्रेणीत कोणते प्रीपेड रिचार्ज प्लान मिळतात.

RS 444 चा रिलायंस जियो ऑल-इन-वन प्रीपेड प्लान  

रिलायंस जियो द्वारा 444 रुपयांचा प्रीपेड प्लान बाजारात सर्वात नवीन प्लान पैकी एक आहे, जो नवीन IUC रिचार्जची सुरवात केल्यानंतर लॉन्च केला गेला होता. टेलीकॉम ऑपरेटरचा 444 रुपयांच्या प्रीपेड प्लान सर्वसमावेशक प्रीपेड प्लान्स पैकी एक आहे आणि याचे फायदे वाचून तुम्ही हा घेण्याचा विचार पण करू शकता. हा प्लान 84 दिवसांची वैधता देतो आणि 168GB एकूण डेटा सह प्रति दिन 2GB डेटा रिलायंस जियो नेटवर्क वर अनलिमिटेड कॉल तसेच इतर नेटवर्क वर 1,000 IUC मिनिटांचे कॉल देण्यात आले आहेत आणि सोबत ग्राहकांना प्रति दिन 100 एसएमएस मिळतात. ग्राहक या प्लान वर काही काळासाठी 44 रुपयांचा पेटीएम डिस्काउंट पण मिळू शकतात.

RS 399 चा RELIANCE JIO प्रीपेड प्लान

हा प्रीपेड प्लान Reliance Jio सब्सक्राइबर्स साठी अत्यंत योग्य असेल जो प्रतिदिन 1.5GB डेटा सह सर्वात धमाकेदार आहे. त्याचबरोबर सब्सक्राइबर्सना रिलायंस जियो नेटवर्क वर अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळेल, पण इतर नेटवर्क वर कॉल करता येणार नाहीत. सब्सक्राइबरला प्रति दिन 100 एसएमएस पण मिळतात आणि इस प्रीपेड प्लानची वैधता पण 84 दिवसांची आहे. सब्सक्राइबर्सना या प्लान सह IUC टॉक टाइम वाउचर घ्यावा लागेल जो 10 रुपयांच्या बेस किंमतीत उपलब्ध आहे.

RS 1,699 चा रिलायंस जियो प्लान  

आता त्या ग्राहकांसाठी जे वर्षभर वारंवार आपला नंबर रिचार्ज करू इच्छित नाहीत. त्यांच्यासाठी काय आहे बाजारात याबद्दल बोलूया, विशेष म्हणजे हे लोक रिचार्ज रिमाइंडर एसएमएसना कंटाळतात. अश्या प्रसंगी त्यांच्याकडे रिलायंस जियोचा 1,699 रुपयांचा प्रीपेड प्लान चांगला पर्याय म्हणून समोर येतो. 1,699 रुपयांचा प्रीपेड प्लान 365 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि यह रिलायंस जियो नेटवर्क वर अमर्यादित कॉल सोबत प्रति दिन 1.5GB डेटा देतो, पण इतर नेटवर्क वर कोई कॉल करता येत नाही. प्रति दिन 100 एसएमएस चा अतिरिक्त लाभ पण आहे.

RS 299 चा प्रीपेड जियो प्लान  

299 रुपयांचा प्रीपेड प्लान थोडी वेगळी ऑफर आहे आणि ज्या लोकांना मूवी किंवा टीवी सीरीज बघण्यासाठी जास्त दैनिक डेटा हवा आहे त्यांच्यासाठी हा योग्य प्लान आहे. 299 रुपयांच्या प्रीपेड प्लान मध्ये प्रतिदिन 3GB डेटा मिळतो आणि हा 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. हा प्लान प्रति दिन 100 एसएमएस आणि रिलायंस जियो नेटवर्क वर असीमित कॉल पण देतो.

RS 498 चा रिलायंस जियो प्रीपेड प्लान  

498 रुपयांचा प्रीपेड प्लान काही अश्या लोकांसाठी आहे जे एक दीर्घ अवधीचा प्लान शोधत आहेत. हा प्लान 91 दिवसांची वैधतेसह येतो, आणि हा प्रति दिन 2GB डेटा देतो. प्लान मध्ये प्रति दिन 100 एसएमएस आणि रिलायंस जियो नेटवर्क वर अमर्याद कॉलची सुविधा आहे, पण इतर नेटवर्क वर कॉलसाठी ग्राहकांना आईयूसी टॉक टाइम वाउचरचा वापर करावा लागेल. 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo