Reliance JioGIgaFiber ब्रॉडबँड साठी नोंदणीची सुरवात 15 ऑगस्ट पासून होईल, जाणून घ्या सर्व काही

Reliance JioGIgaFiber ब्रॉडबँड साठी नोंदणीची सुरवात 15 ऑगस्ट पासून होईल, जाणून घ्या सर्व काही
HIGHLIGHTS

रिलायंस आपल्या या ब्रॉडबँड सर्विस मधून घरांमध्ये आणि ऑफिसेस मध्ये इंटरनेटची सुविधा देणार आहे.

Reliance JioGigaFiber च्या ब्रॉडबँड सेवे साठी नोंदणी प्रक्रिया 15 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. चला तर जाणून घेऊया कि तुम्ही या सेवेसाठी कशी नोंदणी करू शकाल. 

तुम्हाला तर माहितीच आहे की रिलायंस आपला JioPhone 2 15 ऑगस्ट ला लॉन्च करणार आहे, त्याचदिवशी कंपनी आपल्या ब्रॉडबँड सेवेसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. या दोन्ही गोष्टींची घोषणा कंपनी ने आपल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या AGM मध्ये केली आहे. या ब्रॉडबँड सेवेतून मिळणार्‍या स्पीड बद्दल बोलायचे तर असे बोलले जात आहे की यातून तुम्हाला 1Gbps चा स्पीड मिळणार आहे. 

असे सांगण्यात आले आहे की 15 ऑगस्ट पासून रिलायंस च्या या सेवेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. पण अजूनही ही सेवा कधी लॉन्च केली जाणार आहे याची काहीच माहिती देण्यात आली नाही. ही सेवा देशातील जवळपास 1100 शहरांमध्ये सादर करण्यात येईल. कंपनी ही सेवा जवळपास 2 वर्षांपासून टेस्ट करत आहे, आणि याकाळात या सेवेने 700Mbps चा सरासरी स्पीड दिला आहे. 

आपण समोर आलेले लीक पाहिले तर, समोर येत आहे की या प्लान्स ची सुरवात Rs 500 पासून होईल. तसेच पॅक्सची सुरवात Rs 500 पासून होऊन Rs 750, Rs 999, Rs 1,299 आणि Rs 1,500 पर्यंत असेल. असे पण समोर येत आहे की Rs 500 मध्ये तुम्हाला 300GB डेटा जवळपास 30 दिवस 50Mbps च्या स्पीड सह मिळेल. 

तसेच Rs 750 वाला प्लान पाहता यात तुम्हाला 450GB डेटा मिळू शकतो आणि हा एक महिना म्हणजे 30 दिवसांसाठी असेल. या पॅक मध्ये तुम्हाला 50Mbps स्पीड मिळेल. त्याचबरोबर Rs 999 वाले प्लान बद्दल बोलायचे तर यात तुम्हाला 600GB डेटा मिळेल, या प्लान ची वैधता पण 30 दिवस आहे, त्याचबरोबर यात तुम्हाला 100Mbps चा स्पीड मिळेल. 

तसेच Rs 1,299 वाला प्लान पाहता यात तुम्हाला 750GB डेटा मिळणार आहे, जो जवळपास 100Mbps च्या स्पीड सह तुम्हाला मिळेल. या प्लान ची वैधता पण जवळपास 30 दिवस असेल. अखेरीस Rs 1,500 वाल्या प्लान बद्दल बोलायचे तर या प्लान मध्ये तुम्हाला 1000GB डेटा मिळण्याची शक्यता आहे, जो जवळपास एक महिन्यासाठी असेल आणि यात तुम्हाला चांगला स्पीड पण मिळेल. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo