Idea Cellular ने लॉन्च केला आपला नवीन प्लान; किंमत आहे फक्त…

HIGHLIGHTS

आयडिया सेलुलर आपल्या मर्जर प्रक्रिया मध्ये आहे. यादरम्यान कंपनी ने त्यांचा नवीन प्लान चुपचाप लॉन्च केला आहे, या प्लान ची किंमत Rs 295 आहे, यात तुम्हाला कॉलिंग सोबत डेटा साठी पण चांगल्या ऑफर मिळत आहेत.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हा प्लान एयरटेल च्या Rs 299 मध्ये येणार्‍या प्रीपेड प्लान मध्ये फिट होतो. जर तुम्हाला एक किंमतीच्या आसपास दोन प्लान मिळाले तर तुम्ही कोणता प्लान घ्याल? साहजिकच तुम्ही जो प्लान वापरत असाल तोच वापराल. पण इथे तसे होणार नाही. 

आयडिया ने आपल्या प्लान मध्ये काही बदल केले आहेत आणि याची वैधता 42 दिवस आहे. तसेच यात तुम्हाला कॉलिंग, डेटा आणि SMS चे फायदे पण मिळत आहेत. याचा अर्थ असा की हा प्लान या किंमतीच्या आसपास येणार्‍या प्लान पेक्षा वेगळा वाटावा यासाठी आयडिया ने याची वैधता वाढवली आहे. 

या प्लान मध्ये तुम्हाला 5GB 2G/3G/4G डेटा 42 दिवसांसाठी देण्यात येत आहे, तसेच यात तुम्हाला कॉलिंगची सुविधा पण मिळत आहे. पण कॉलिंग मध्ये काही कॅच तुम्हाला दिसेलच. 

या प्लान मध्ये तुम्हाला 250 मिनिट डे लिमिट मिळत आहे, तसेच या प्लान ची वीकली लिमिट 1000 मिनिट आहे. जो पर्यंत ही मर्यादा संपत नाही, यूजर्स या प्लान मधून सर्व प्रकारचे कॉल्स करू शकतात. त्याचप्रमाणे या प्लान ची वैधता 42 दिवस आहे. 
 
Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo