HIGHLIGHTS
BSNL च्या Rs 999 मध्ये येणाऱ्या प्लान मध्ये तुम्हाला 561.1GB डेटा 181 दिवसांसाठी देत आहे. चला तर जणू घेऊया या प्लान मध्ये मिळणाऱ्या इतर ऑफर्स बद्दल...
तुम्हाला तर माहितीच आहे की काही खाजगी टेलीकॉम कंपन्या आणि बीएसएनएल मध्ये डेटा आणि प्लान्स इत्यादींची चढाओढ आहे. आपण गेल्या काही काळात बघत आहोत की कंपनीने आपले अनेक प्लान्स खाजगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी लॉन्च केले जात आहेत. पण BSNL ने आपली बंपर ऑफर पुन्हा एकदा रिवाइज केली आहे. आता या प्लान मध्ये तुम्हाला 2.1GB डेली डेटा अतिरिक्त दिला जात आहे. बीएसएनएल च्या या प्लान बद्दल बोलायचे झाले तर बीएसएनएल ची बंपर ऑफर याच वर्षी सप्टेंबर मध्ये लॉन्च केली गेली होती. या प्लान मध्ये तुम्हाला 2.2GB डेटा रोज मिळत होता.
Surveyपण आता या प्लान मध्ये काही बदल केले गेले आहेत, या प्लान मध्ये तुम्हाला तर माहितीच आहे की तुम्हाला 2.2GB डेली डेटा दिला जात होता, आता या प्लान मध्ये तुम्हाला 2.1GB डेली डेटा दिल जात आहे. या प्लानची किंमत Rs 999 आहे, आणि तुम्ही याची वैधता ऐकून थक्क व्हाल. विशेष म्हणजे या प्लान मध्ये तुम्हाला 181 दिवसांची वैधता मिळत आहे. याचा अर्थ असा की आता तुम्हाला या प्लान मध्ये 3.1GB रोज डेटा मिळत आहे. या प्लान मध्ये आता एकूण 561.1GB डेटा एकूण 181 दिवसांसाठी मिळत आहे.
हा प्लान देशातील जवळपास 19 टेलीकॉम सर्कल्स मध्ये उपलब्ध आहे, पण या सर्कल्स मध्ये केरळ नाही. केरळ बद्दल बोलायचे तर तिथे Rs 999 मध्ये येणाऱ्या प्लान मध्ये काही इतर सुविधा मिळत आहेत. तसेच नुकतेच बीएसएनएल ने दोन नवीन वार्षिक प्लान लॉन्च केले आहेत, जे Rs 1,699 आणि Rs 2,099 मध्ये लॉन्च केले गेले आहेत, आणि यात पण तुम्हाला सर्वात चांगल्या ऑफर्स मिळत आहेत.