BSNL च्या RS 365 च्या प्लान मध्ये तुम्हाला मिळत आहे 60 दिवसांसाठी रोज 2GB डेटा

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 13 Nov 2019
HIGHLIGHTS
  • BSNL ने अलीकडेच आपला एक Rs 97 चा STV प्लान लॉन्च केला होता

  • याव्यतिरिक्त या प्लान सोबतच कंपनीने आपल्या Rs 365 चा प्रीपेड प्लान पण लॉन्च केला आहे

  • दोन्ही प्लान्स मध्ये तुम्हाला एकसारखे बेनिफिट मिळत आहेत

BSNL च्या RS 365 च्या प्लान मध्ये तुम्हाला मिळत आहे 60 दिवसांसाठी रोज 2GB डेटा
BSNL च्या RS 365 च्या प्लान मध्ये तुम्हाला मिळत आहे 60 दिवसांसाठी रोज 2GB डेटा

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) वापसी करत आहे. काही महिन्यांपूर्वी सरकारी दूरसंचार ऑपरेटरने आपल्या भविष्यावरील प्रशचिन्ह पुसले होते कारण आता टेलीकॉम ऑपरेटरला सरकार कडून बचाव पॅकेज मिळाले आहे, ज्याचा अर्थ अशा कि टेलिकॉम ऑपरेटर आता आपले काम पुनर्जीवित करेल आणि एक चांगला 4 जी नेटवर्क स्थापित करेल. बीएसएनएल कर्मचाऱ्यांची वीआरएस प्रक्रिया पण या निर्धारित करण्यात आली आहे, ज्याचा अर्थ असा आहे कि आर्थिक मदत पण दूरसंचार ऑपरेटरला लवकरच मिळेल.

याचसोबत बीएसएनएल पण आपल्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित करत आहे आणि नवीन ऑफर्स, प्रीपेड वाउचर आणि इतर सुविधा देण्यावर लक्ष देत आहे. बीएसएनएल आपल्या आकर्षक प्रीपेड आणि ब्रॉडबँड प्लान सह नवीन ग्राहकांना पण आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. पण एक नवीन पाऊल टाकत बीएसएनएल ने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन प्रीपेड प्लानची घोषणा केली आहे. हे प्रीपेड प्लान 97 रुपये आणि 365 रुपयांचे आहेत. या योजनांबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला इथे सर्व माहिती देण्यात आली आहे आहे.

विशेष म्हणजे BSNL द्वारा लॉन्च केला गेलेला 97 रुपयांचा प्लान STV आहे. तुमच्या तर लक्षात आले असेल कि कमी किंमतीतील एसटीवी असल्यामुळे, हा प्रीपेड वाउचर काही दिवसांच्या वैधता हवी असणाऱ्या लोकांसाठी चांगला आहे. या एसटीवी च्या फायद्यांसाठी, बीएसएनएल ग्राहक प्रति दिन 2 जीबी डेटा सोबत 250 मिनिट्स प्रति दिन कॉलचा आनंद घेऊ शकतील. या प्लानची वैधता 18 दिवस असेल.

बीएसएनएल ने 97 एसटीवी सह अजून एक प्रीपेड प्लान पण लॉन्च केला आहे, आणि तो आहे 365 रुपयांचा प्रीपेड प्लान. हि प्रीपेड योजना प्रति दिन 2GB डेटा सोबतच प्रति दिन 250 मिनिट्स कॉलचा लाभ देईल. विशेष म्हणजे बीएसएनएल ची हि एक प्रीपेड योजना आहे, त्यामुळे या योजनेत मोफत वैधता 60 दिवसांची असेल, पण योजनेची वैधता एक वर्ष असेल. याचा अर्थ असा कि सब्सक्राइबर 60 दिवसांसाठी प्रतिदिन 2GB डेटा वापरू शकतील. तमिलनाडु, चेन्नई, केरळ आणि इतर सर्कल्स मध्ये बीएसएनएल ग्राहक या दोन्ही योजना वापरू शकतील.

Siddhesh Jadhav
Siddhesh Jadhav

Email Email Siddhesh Jadhav

About Me: Content Writer - Marathi Read More

Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements
DMCA.com Protection Status