BSNL RS. 1,098 PREPAID PLAN मध्ये वैधता आणि डेटा संबंधित झाला हा मोठा बदल

HIGHLIGHTS

BSNL Rs.1,098 प्लानची वैधता झाली कमी

आता डेटा पण मिळेल कमी

BSNL RS. 1,098 PREPAID PLAN मध्ये वैधता आणि डेटा संबंधित झाला हा मोठा बदल

टेलीकॉम कंपनी Bharat Sanchar Nigam Limited म्हणजे BSNL ने अलीकडेच आपला Rs. 1,098 prepaid plan रिवाइज केला आहे. या प्लान मध्ये झालेले बदल यूजर्सना निराश करू शकतात. पण फक्त काही सर्कल्स मध्ये हा प्लान सध्या रिवाइज केला गेला आहे. BSNL Rs. 1,098 Prepaid Plan मध्ये आधी यूजर्सना 84 दिवसांची वैधता मिळत होती तर आता ती कमी करून 75 दिवस करण्यात आली आहे. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

त्याचबरोबर डेटा मध्ये पण मोठा बदल झाला आहे. आधी भारत संचार निगम लिमिटेड कंपनी प्लान मध्ये अनलिमिटेड डेटा देत होती त्या जागी आता 75 दिवसांसाठी फक्त 375 जीबी उपलब्ध केला गेला जाईल. विशेष म्हणजे या प्लान मध्ये झालेला बदल BSNL long-term validity plan आल्यानंतर झाला ज्याची किंमत Rs. 1,699 आहे. या प्लान मध्ये तुम्हाला 455 दिवसांची वैधता मिळते, पण फक्त मर्यादित काळासाठी हि ऑफर देण्यात आली आहे. 

या 1,098 रुपयांच्या BSNL प्रीपेड प्लान मध्ये यूजर्सना अनलिमिटेड वॉयस कॉलची सुविधा मिळेल. सोबतच प्लान मध्ये 375 जीबी डेटा पण मिळेल जो संपल्यावर बीएसएनएल सब्सक्राइबर्सना 40kbps च्या स्पीडने डेटा मिळेल. त्याचप्रमाणे यूजर्स रोजाना 100 फ्री SMS पण वापरू शकतील. 

हा रिवाईज्ड प्लान बीएसएनएल वेबसाइट वर अपडेट केला गेला आहे. रिवाइज केला गेलेला प्लान हरियाणा, बिहार आणि कर्नाटक मध्ये लाइव करण्यात आला आहे. 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo