BSNL ने IPL 11 ला ध्यानात ठेऊन आपला नवीन आणि दमदार प्लान सादर केला आहे, या प्लान च्या जोरावर BSNL जियो आणि एयरटेल ला टक्कर देऊ शकेल का? या प्लान मध्ये तुम्हाला संपुर्ण 51 दिवसांच्या वैधता सह फक्त Rs 248 च्या किंमतीत 3GB डेटा प्रतिदिन दिला जात आहे.
BSNL ने IPL 11 ला ध्यानात ठेऊन आपला नवीन आणि दमदार प्लान सादर केला आहे, या प्लान मध्ये कंपनी तुम्हाला IPL 2018 चा संपूर्ण आनंद घेण्याची संधी देत आहे. या प्लान बद्दल बोलायचे झाले तर या प्लान मध्ये तुम्हाला पुर्ण 51 दिवसांसाठी फक्त Rs 248 च्या किंमतीत 3GB डेटा प्रतिदिन ऑफर केला जात आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की या प्लान मध्ये तुम्हाला जवळपास 153GB डेटा या वैधतेमध्ये मिळणार आहे. एकूण काय तर तुम्हाला संपुर्ण 51 दिवसांसाठी 153GB डेटा मिळणार आहे. म्हणजे एका दिवसात तुम्हाला 3GB डेटा वापरायला मिळेल.
Survey
✅ Thank you for completing the survey!
हा प्लान यासाठी पण महत्त्वपूर्ण आहे कारण हा Rs 250 च्या आतमधे येणारा असा प्लान आहे, जो तुम्हाला इतका जास्त डेटा देत आहे. पण इथे एक कॅच पण आहे, ही ऑफर फक्त कंपनी च्या प्रीपेड यूजर्स साठी आहे. जर तुम्ही BSNL चे प्रीपेड यूजर नाही तर तुम्हाला या पॅक चा लाभ घेता येणार नाही.
हा प्लान खासकरुन IPL आवडणार्या लोकांसाठी सादर करण्यात आला आहे, जसे की तुम्ही बघू शकता या प्लान ची वैधता पण 51 दिवसांची आहे आणि IPL 11 पण 51 दिवसांपर्यंत चालणार आहे, याचा अर्थ असा की या प्लान ने आजच तुमच्या नंबर ला रीचार्ज केल्यास तुम्ही IPL 11 चा पुरेपुर आनंद घेऊ शकाल. असाच एक प्लान रिलायंस जियो कडे पण आहे. पण या प्लान मध्ये तुम्हाला Rs 251 मध्ये 51 दिवसांच्या वैधते सह फक्त 102GB डेटा मिळत आहे. तर रिलायंस जियो कडून की 4G डेटा मिळत आहे.
रिलायंस जियो च्या या प्लान मध्ये पण एक कॅच आहे, तुम्हाला या प्लान मध्ये रिलायंस जियो च्या इतर सेवा म्हणजे अन्य प्लॅन्स प्रमाणे फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS नाही मिळत. रिलायंस जियो चा हा प्लान 7 एप्रिल पासून MyJio app, Jio.com वेबसाइट आणि जियो च्या जवळपास सर्व ऑफलाइन रिटेल स्टोर्स वर उपलब्ध करण्यात आले आहे.
जर इथे एयरटेल च्या पण एका पॅक बद्दल बोलायचे झाले तर वावगं ठरणार नाही. एयरटेल कडून या IPL 11 चा आनंद घेण्यासाठी तुम्हाला 3GB डेटा प्रतिदिन च्या हिशोबाने संपूर्ण 28 दिवसांसाठी दिला आहे. या प्लान ची किंमत Rs 248 आहे. या प्लान मध्ये तुम्हाला 84GB डेटा दिला जात आहे.