BSNL आपल्या नवीन पोस्टपेड प्लान मध्ये देत आहे प्रतिमाह 45GB डाटा

BSNL आपल्या नवीन पोस्टपेड प्लान मध्ये देत आहे प्रतिमाह 45GB डाटा
HIGHLIGHTS

BSNL च्या या प्लान मध्ये यूजर्सना सर्व नेटवर्क वर अनलिमिटेड वॉइस कॉल्स मिळत आहेत आणि प्लान मध्ये कोणतीही FUP लिमिट नाही.

पोस्टपेड सेगमेंट मध्ये वाढती स्पर्धा बघून BSNL ने पण आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लान सादर केला आहे. कंपनी ने पोस्टपेड यूजर्स साठी नवीन 499 रुपयांचा प्लान सादर केला आहे. या प्लान अंतर्गत प्रतिमाह 45GB डाटा, अनलिमिटेड कॉल्स आणि 100 SMS मिळत आहेत. पण यूजर्सनी लक्षात ठेवावे की या किंमतीत GST सामील नाही त्यामुळे यूजर्सना 499 रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागेल. या प्लान मध्ये यूजर्सना डाटा रोलओवर ची सुविधा पण मिळत नाही, म्हणजे न वापरलेला डाटा पुढील बिलिंग सायकल मध्ये जोडता येणार नाही. 
BSNL च्या या प्लान मध्ये यूजर्सना सर्व नेटवर्क वर अनलिमिटेड वॉइस कॉल्स मिळत आहेत आणि प्लान मध्ये कोणतीही FUP लिमिट नाही. यूजर्सना एक महिन्यासाठी 45GB डाटा मिळत आहे. त्याचबरोबर यूजर्स प्रतिदिन 100 SMS चा लाभ घेऊ शकतील. BSNL लूट लो पोस्टपेड ऑफर अंतर्गत पोस्टपेड प्लान्स वर 60% पर्यंतचा डिस्काउंट पण देत आहे. 
तसेच BSNL ने काही दिवसांपूर्वी आपला नवीन Data Tsunami ऑफर लॉन्च केली आहे, या प्लान मध्ये यूजर्सना Rs 100 मध्ये 1GB रोज पेक्षा जास्त डाटा मिळत आहेत. हा नवीन प्लान फक्त Rs 98 च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे आणि याचे नाव STV-98 आहे. या प्लान मध्ये यूजर्सना रोज 1.5GB डाटा मिळत आहे. या प्लान ची वैधता 26 दिवसांची आहे. BSNL ने आपला हा नवीन प्लान World Telecom Day चा एक भाग म्हणून सादर केला आहे. हा प्लान आता पासून लागू करण्यात आला आहे, याचा अर्थ असा की हा प्लान तुम्ही आता पासून घेऊ शकता आणि हा भारतात कुठेही घेता येईल. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo