BSNL ची नवीन आणि सर्वात धमाकेदार ऑफर, कमी किंमतीत सादर केला नवीन प्लान
BSNL ने आपला एक नवीन प्रीपेड प्लान फक्त Rs 39 च्या किंमतीत भारतभरात सादर केला आहे, हा प्लान खासकरून वॉयस कॉलिंग आवडणाऱ्या लोकांसाठी सादर करण्यात आला आहे.
BSNL ने आपला एक नवीन प्रीपेड प्लान फक्त Rs 39 च्या किंमतीत भारतभरात सादर केला आहे, हा प्लान खासकरून वॉयस कॉलिंग आवडणाऱ्या लोकांसाठी सादर करण्यात आला आहे. या प्लान ची वैधता 10 दिवसांची आहे. हा प्लान कंपनी ने रिलायंस जियो च्या Rs 49 वाल्या प्लानला टक्कर देण्यासाठी सादर केला आहे.
या नवीन प्लान मध्ये तुम्हाला कंपनी कडून कोणत्याही नेटवर्क वर अनलिमिटेड वॉयस कॉलिंग चा लाभ मिळत आहे. पण मुंबई आणि दिल्ली च्या यूजर्स सोडून या प्लान मध्ये कोणतीही लिमिटेशन नाही. या प्लान मध्ये तुम्हाला फ्री कॉलर ट्यून सह 100 SMS पण या वैधते पर्यंत मिळत आहेत. याचा अर्थ असा की तुम्ही 10 दिवसांपर्यंत हे अतिरिक्त लाभ घेऊ शकता. हा प्लान भारतभर उपलब्ध झाला आहे, हा तुम्ही BSNL च्या कोणत्याही सर्कल मध्ये मिळवू शकता.
या नवीन प्लान सोबत कंपनी कडे अजूनही काही असेच वॉयस कॉलिंग पॅक्स आहेत, यात Rs 99 आणि Rs 319 वाला वॉयस कॉलिंग प्लान आहेत. Rs 99 वाल्या प्लान बद्दल बोलायचे झाले तर या प्लान सह तुम्हाला अनलिमिटेड वॉयस कॉलिंग जी सर्व नेटवर्क्स वर मिळत आहे, या प्लान ची वैधता 26 दिवसांची आहे आणि यात तुम्हाला फ्री PRBT पण मिळत आहे. त्याचबरोबर Rs 319 वाला प्लान पाहता यात तुम्हाला 90 दिवसांसाठी फ्री PRBT सह अनलिमिटेड वॉयस कॉलिंग मिळत आहे, कोणत्याही SMS इत्यादी वीना.
तसे पाहता Rs 39 वाला प्लान एक बेस्ट वॉयस कॉलिंग प्लान आहे असे आपण म्हणू शकतो पण रिलायंस जियो कडे एक Rs 49 वाला प्लान आहे, ज्यात तुम्हाला 1GB डाटा सह अनलिमिटेड फ्री वॉयस कॉलिंग एक महिन्यासाठी मिळत आहे, ही सेवा तुम्हाला जियोफोन सोबत मिळणार आहे.
SurveyContent Writer - Marathi View Full Profile