BSNL फक्त Rs 399 मध्ये देत आहे अनलिमिटेड कॉलिंग 74 दिवसांसाठी
BSNL ने एक नवीन पाऊल टाकत आपल्या यूजर्सना एक नवीन भेट दिली आहे. कंपनी ने आपल्या यूजर्स साठी रक्षाबंधन च्या निमित्ताने एक नवीन प्लान लॉन्च केला आहे, जो तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग देत आहे.
BSNL सणासुदीच्या काळात आपल्या यूजर्सना काही ना काही आकर्षक ऑफर्स देत असते, त्याचप्रमाणे यावेळी पण कंपनी ने असेच काहीसे केले आहे. कंपनी ने एक नवीन प्लान रक्षाबंधनाच्या निमित्ताने लॉन्च केला आहे, या प्लान मध्ये तुम्हाला कंपनी कडून अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS याचा फायदा जास्त वैधते सह मिळत आहे. हा STV कंपनी ने फक्त Rs 399 मध्ये लॉन्च केला आहे.
Surveyया प्लान बद्दल बोलायचे तर असे बोलू शकतो की यात तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS चा फायदा तुम्ही जास्त काळासाठी घेऊ शकता. हा प्लान त्यावेळी समोर आला आहे जेव्हा जवळपास सर्वच खाजगी कंपन्या कुठले ना कुठले नवीन प्लान लॉन्च करत आहेत, किंवा आपल्या काही प्लान्स मध्ये बदल करत आहे. पण आता BSNL कडे या सर्व प्लान्सना चांगली टक्कर देण्यासाठी एक प्लान आहे. पण रिलायंस जियो, एयरटेल आणि वोडाफोन कडे पण काही असेच प्लान्स आहेत.
BSNL चा रक्षाबंधन प्लान Rs 399 मध्ये
या प्लान बद्दल सविस्तर बोलायचे तर या प्लान मध्ये तुम्हाला Rs 399 मध्ये 74 दिवसांची वैधता मिळत आहे, तसेच याची वैधता पाहता ती 26 ऑगस्ट पासून सुरू होईल. या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, SMS आणि डेटा मिळत आहे. तसेच कंपनी च्या अनेक STV प्लान्स मध्ये होते, या प्लान मध्ये पण तुम्हाला PRBT ची सुविधा मिळत आहे. पण हे काही कंपनीच्या सर्वच प्लान्स मध्ये मिळत नाही. त्याचबरोबर बर्याचदा असेही होते की कंपनी मुंबई आणि दिल्ली मध्ये कॉलिंग ची सुविधा देत नाही पण या प्लान मध्ये असे झाले नाही. या प्लान मध्ये या दोन्ही सर्कल्स मधून तुम्हाला कॉलिंग ची पण सुविधा मिळेल.
Content Writer - Marathi View Full Profile