जिओ चा मार्ग अवलंबत आहे ‘Bharti Airtel’, लवकरच 3G बंद करून अनु शकते 4G नेटवर्क

HIGHLIGHTS

4G ची वाढती मागणी पाहता टेलीकॉम कंपनी Bharti Airtel ने हा निर्णय घेतला आहे कि लवकरच आता 3G नेटवर्क पूर्णपणे सोडून 4G नेटवर्क वर शिफ्ट करण्यात येईल. त्यामुळे कंपनी ने पण जिओ चा मार्ग अवलंबला आहे हे बोलणे चुकीचे ठरणार नाही.

जिओ चा मार्ग अवलंबत आहे ‘Bharti Airtel’, लवकरच 3G बंद करून अनु शकते 4G नेटवर्क

लोकांमध्ये 5G चे वेड चालू आहे त्यामुळे लोक 3G नेटवर्क बद्दल इतके उत्साही राहिले नाहीत. 3G नेटवर्क वापरणारे यूजर्स आता 4G नेटवर्क कडे वाळू लागले आहेत. त्यामुळे 4G नेटवर्कची वाढती मागणी पाहता टेलीकॉम कंपनी Bharti Airtel ने एक खास निर्णय घेतला आहे. कंपनी लवकरच येत्या काळात 3G नेटवर्कची देवा पूर्णपणे बंद करून आपल्या कस्टमर्स साठी 4G नेटवर्कची सुविधा घेऊन येत आहे. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Bharti Airtel चे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) गोपाळ विट्टल यांचे असे म्हणणे आहे कि, “बऱ्याच काळापासून कंपनी 4G ची वाढती माफगणि बघत आहे त्यामुळे 900 Mhz बंद आमच्या युजर्ससाठी 4G ची सर्विस घेऊन येईल.“ 4G नेटवर्क उपलब्ध करावणाऱ्या दुसऱ्या टेलीकॉम कंपनी Reliance Jio कडे बघितल्यानंतर आता Bharti Airtel पण आपला 3G सेट-अप बदलत आहे ज्यामुळे ते फक्त 4G उपलब्ध करणारी भारतातील दूसरी कंपनी बनेल. 

गोपाळ विट्टल यांनी सांगितले कि 4G साठी 900 Mhz बँड मध्ये फक्त 'फोर्थ जनरेशन एयरवेव्स' (4G airwaves) आणण्यासाठी एयरटेल जोरदार तयारी करत आहे. आता पर्यंत 900 Mhz बँड फक्त 2G वॉइस सर्विसेज साठी वापरला जात होता. 16 सर्कल्सच्या 900 MHz बँड मध्ये एयरटेल कडे एयरवेव्सचे 116 युनिट्स आहेत. एयरटेल ने 'डिजिट' कडे बोलताना याची पुष्टि केली कि कंपनी 3G नेटवर्क बंद करण्याचा विचार करत आहे. कंपनी कडून मिळणारी 2G सर्विस तशीच राहील, त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. 

कर्नाटक मध्ये 4G सर्विसेज साठी 900 MHz बँड मध्ये एयरटेल ने आपले एयरवेव्स रिफार्म केले आहेत. हीच प्रोसेस बाकी ठिकाणी पण सुरु केली जाणार आहे ज्यामुळे 4G युजर्सना हि अगदी सहज उपलब्द होईल. CEO नुसार कंपनी 'शाओमी' सोबत काम करत आहे ज्यामुळे 900 MHz बँडला सपोर्ट करणारे 4G  स्मार्टफोन्स आणता येतील. काही दिवसांपूर्वी Bharti Airtel 398 रुपयांचा प्रीपेड प्लान लॉन्च केला आहे. या प्लान अंतर्गत युजरला रोज 1.5GB 4G डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि रोज 90 SMS 70 दिवस मिळतील. असे बोलले जात आहे कि हा प्लान जिओ च्या 398 रुपयांच्या प्रीपेड प्लानला टक्कर देण्यासाठी आणला गेला आहे. पण जिओ च्या प्लान मध्ये रोज 2GB डेटा मिळत आहे.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo