AIRTEL च्या RS 599 च्या प्लान मध्ये मिळत आहे 2GB डेली डेटा आणि 84 दिवसांच्या वैधतेसह 4 लाखांचा INSURANCE COVER

AIRTEL च्या RS 599 च्या प्लान मध्ये मिळत आहे 2GB डेली डेटा आणि 84 दिवसांच्या वैधतेसह 4 लाखांचा INSURANCE COVER
HIGHLIGHTS

यूजर्सना हे माहिती आहे कि Airtel कडे एक Rs 499 चा प्रीपेड रिचार्ज प्लान आहे

या प्लान मध्ये तुम्हाला 2GB डेली डेटा सह 82 दिवसांची वैधता मिळत आहे

Rs 599 वाल्या प्रीपेड प्लान मध्ये तुम्हाला Insurance Cover चा लाभ वेगळा मिळतो

Airtel ने एक नवीन प्लान म्हणून त्यांचा Rs 599 मध्ये येणारा प्रीपेड प्लान सादर केला आहे या प्लानची वैधता 84 दिवसांची आहे. एयरटेलचा हा प्लान कंपनीच्या Rs 249 मध्ये येणाऱ्या प्रीपेड प्लानच्या श्रेणीत सामील झाला आहे. तुम्हाला सांगू इच्छितो कि या प्लान मध्ये पण तुम्हाला Rs 4 लाखांचा Insurance Cover मिळत आहे. त्याचबरोबर या प्लान मध्ये तुम्हाला 2GB डेली डेटा अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि 100 SMS पण रोज समोरून वैधतेसाठी मिळत आहेत.  

आता तुम्ही म्हणाल कि Rs 499 मध्ये येणाऱ्या प्लान मध्ये पण तुम्हाला सर्वकाही मिळत आहे, पण त्यात तुम्हाला Insurance Cover मिळत नाही, आणि त्या प्लानची वैधता 82 दिवसांची आहे. त्याउलट Rs 599 मध्ये येणाऱ्या प्रीपेड प्लान बद्दल बोलायचे तर हा अतिरिक्त Life Insurance Cover सह सादर केला गेला आहे. यासाठी कंपनीने Bharti AXA Life सह भागेदारी केली आहे. याचा अर्थ असा कि या प्लान मध्ये तुम्हाला खरंच खूपकाही मिळत आहे.  

RS 599 मध्ये येणारा एयरटेल प्रीपेड रिचार्ज प्लान  

तुम्हाला सांगू इच्छितो कि एयरटेलच्या जवळपास सर्व 22 सर्कल्स मध्ये हा Rs 599 मध्ये येणारा प्रीपेड एयरटेल रिचार्ज प्लान उपलब्ध होणार आहे. सुरवातीला हा प्लान फक्त तामिळनाडू आणि पॉंडुचेरी मधेच उपलब्ध झाला होता. या प्लान मध्ये तुम्हाला 2GB डेली डेटा मिळत आहे, सोबतच यात तुम्हाला रोज 100 SMS पण मिळत आहेत. इतकेच नव्हे तर या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग पण मिळत आहे. एयरटेलच्या या रिचार्ज प्रीपेड प्लान मध्ये तुम्हाला 84 दिवसांची वैधता मिळते. इतकेच नव्हे तर या प्लानची प्रमुख खासियत यात मिळणारा Rs 4 लाखांचा Life Insurance Cover.  

कशाप्रकारे मिळेल हा AIRTEL INSURANCE COVER

Airtel ने अशाप्रकारे हा Insurance बनवला आहे कि हा काही मिनिटांत तुमच्यापर्यंत डिजिटली पोहचू शकतो. पण या Insurance साठी तुम्हाला आधी एनरोल करावे लागेल, त्यामुळे तुम्हाला पहिल्या रिचार्ज नंतर SMS किंवा एयरटेल थँक्स ऍप किंवा एयरटेल रिटेलर कडे जावे लागेल. हा कवर 18-54 वर्षांच्या यूजर्स साठी वैध आहे. तसेच या Insurance साठी तुम्हाला कोणत्याही पेपरवर्कची गरज नाही. त्यानंतर तुमच्यापर्यंत हा Insurance एक तर डिजिटली पोचवला जाईल किंवा हा तुम्हाला लगेच दिला जाईल. तसेच जर तुम्हाला याची फिजिकल कॉपी हवी असले तर तुम्ही ती मागितली तर तुमच्या पर्यंत तुमच्या घरी पण एयरटेल पोचवेल.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo