Airtel आपल्या ब्रॉडबँड यूजर्सना देत आहे 1000GB पर्यंत चा बोनस डेटा

HIGHLIGHTS

कंपनी ने या ऑफर ची सुरवात मे 2017 मध्ये केली होती आणि याची वैधता 31 मार्च 2018 पर्यंत होती.

Airtel आपल्या ब्रॉडबँड यूजर्सना देत आहे 1000GB पर्यंत चा बोनस डेटा

Bharti Airtel आपल्या ब्रॉडबँड यूजर्सना ‘Airtel Big Byte Offer’ अंतर्गत 1000GB पर्यंतचा बोनस डेटा देत आहे. कंपनी ने या ऑफर ची सुरवात मे 2017 मध्ये केली होती आणि याची वैधता 31 मार्च 2018 पर्यंत होती. आता Airtel ने या ऑफर ची वैधता वाढवून ऑक्टोबर 2018 केली आहे. 
या ऑफर अंतर्गत Airtel ब्रॉडबँड यूजर्सना नवीन कनेक्शन सोबत अतिरिक्त 1000GB डेटा मिळेल. Airtel च्या पोस्टपेड प्लान्स मध्ये डेटा रोलओवर फॅसिलिटी प्रमाणे कंपनी या प्लान मध्ये पण अनयूज्ड डेटा पुढच्या महिन्याच्या डेटा मध्ये अॅड करेल ही ऑफर 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत चालू राहील. 
ही ऑफर मिळवण्यासाठी यूजर्सना Airtel च्या ऑफिशियल वेबसाइट वर जावे लागले आणि तिथे ब्रॉडबँड सेक्शन निवडावे लागेल. तिथे यूजर्सना प्लान निवडावा लागेल आणि आपली माहिती जसे की अॅड्रेस आणि मोबाईल नंबर एंटर करावा लागेल. अधिक माहितीसाठी यूजर्स कस्टमर केयर वर पण कॉल करू शकतात. कनेक्शन अॅक्टिवेट होण्याच्या सात दिवसांनंतर यूजर्स बोनस डेटा वापरू शकतील. 
सध्यातरी दिल्लीत कंपनी Rs 1,099 आणि Rs 1,299 च्या प्लान्स वर बोनस डेटा देत आहे. Rs 1,099 च्या प्लान अंतर्गत यूजर्स 250GB ब्रॉडबँड डेटा सह 1000GB बोनस डेटा मिळेल, याचा अर्थ यूजर्सना एकूण 1,250GB डेटा मिळेल. त्याचप्रमाणे, Rs 1,299 च्या प्लान मध्ये यूजर्सना 350GB ब्रॉडबँड डेटा सह दरमहीन्याला 1000GB डेटा मिळेल. 
दोन्ही प्लान मध्ये यूजर्स 100Mbps स्पीड चा लाभ घेऊ शकतील तसेच एक वर्षासाठी यूजर्सना फ्री Amazon Prime सब्सक्रिप्शन मिळेल. याव्यतिरिक्त यूजर्स आपल्या ब्रॉडबँड अकाउंट ला आपल्या Airtel पोस्टपेड आणि डिजिटल TV कनेक्शन शी जोडून अतिरिक्त 10GB ब्रॉडबँड डेटा आणि 5GB मोबाईल डेटा मिळवू शकतील. सोबतच यूजर्सना फ्री Airtel TV सब्सक्रिप्शन मिळेल आणि यूजर्स संपुर्ण भारतात अनलिमिटेड फ्री कॉल्स चा फायदा पण घेऊ शकतील. 
 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo