Airtel ने भारतीय बाजारात आपला नवीन प्रीपेड रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे, या प्लान मध्ये कंपनी तुम्हाला 3GB डेली डेटा देत आहे, याव्यतिरिक्त या प्लान मध्ये तुम्हाला 14 दिवसांची वैधता मिळत आहे, त्याचबरोबर लक्षात घ्या की याची किंमत फक्त Rs 181 आहे.
काही खास ऑफर्स आणि ऑफरिंग्स सह एयरटेल ने फक्त Rs 181 मध्ये आपला लेटेस्ट रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे. या प्लान मध्ये तुम्हाला एक प्रीपेड ग्राहक म्हणून खुप काही मिळत आहे, पण या प्लानची वैधता मात्र खुप कमी आहे. कारण एयरटेल ने Rs 181 मध्ये येणारा लेटेस्ट रिचार्ज प्लान फक्त 14 दिवसांच्या वैधते सह लॉन्च केला आहे आणि या काळात तुम्हाला 3GB डेटा रोज देण्यात येईल. चला एक नजर एयरटेलच्या प्रीपेड रिचार्ज प्लान मध्ये मिळणार्या फायद्यांवर टाकूया. तसेच लेटेस्ट एयरटेल प्रीपेड रिचार्ज प्लान इतर कोणत्या रिचार्ज प्लान्सना बाजारात टक्कर देण्यास योग्य आहे याची पण माहिती घेऊया.
Survey
✅ Thank you for completing the survey!
Rs 181 मध्ये येणारा लेटेस्ट एयरटेल प्रीपेड रिचार्ज प्लान या लेटेस्ट एयरटेल प्रीपेड रिचार्ज प्लान मध्ये तुम्हाला एकूण 42GB डेटा देण्यात येत आहे. याचा अर्थ असा की आम्ही वर सांगितल्याप्रमाणे या प्लान मध्ये तुम्हाला 3GB डेटा रोज मिळत आहे. तसेच लेटेस्ट एयरटेल प्रीपेड रिचार्ज प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहे. यात तुम्हाला लोकल, STD आणि नेशनल रोमिंग पण मिळत आहे. त्याचबरोबर तुम्हाला या लेटेस्ट एयरटेल रिचार्ज प्लान मध्ये मिळणारे SMS 100 SMS प्रतिदिन या हिशोबाने मिळतील. आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे की एयरटेल प्रीपेड रिचार्ज प्लान मध्ये तुम्हाला फक्त 14 दिवसांची वैधता मिळत आहे.
आम्ही तुम्हाला वर पण सांगितले आहे की एयरटेल चा लेटेस्ट रिचार्ज प्लान चांगल्या वैधते सह लॉन्च करण्यात आला नाही. पण इतर ऑफर्स च्या तुलनेत तुम्हाला या प्लान मध्ये जास्त डेटा आणि कॉलिंग चे चांगले फायदे मिळत आहेत. या प्लान मध्ये तुम्हाला प्रति GB डेटा साठी फक्त Rs 4.3 एवढेच द्यावे लागतील. याचा अर्थ असा की एकंदरीत हा प्लान खुप चांगला आहे.