एयरटेल च्या या नव्या प्लान मध्ये मिळत आहे रोज 2GB हाईस्पीड डाटा, वैधता आहे 70 दिवस

HIGHLIGHTS

एयरटेल ने आपला नवीन प्रीपेड प्लान लॉन्च केला आहे. या प्लान मध्ये कंपनी कडून तुम्हाला 2GB डाटा प्रतिदिन 70 दिवसांच्या वैधते सह मिळत आहे आणि या प्लान ची किंमत Rs 449 आहे.

एयरटेल च्या या नव्या प्लान मध्ये मिळत आहे रोज 2GB हाईस्पीड डाटा, वैधता आहे 70 दिवस

एयरटेल ने आपल्या प्रीपेड यूजर्स साठी एक नवीन प्लान सादर करून त्यांना एक भेट दिली आहे. कंपनी ने Rs 449 च्या किंमतीत एक नवीन प्रीपेड प्लान सादर केला आहे, या प्लान मध्ये तुम्हाला कंपनी कडून 2GB डाटा मिळत आहे, विशेष म्हणजे हा 2GB डाटा वाल्या लाइनअप मध्ये कंपनी चा नवीन प्लान आहे, याआधी पण कंपनी ने आपला Rs 499 वाला एक प्लान मागच्या महिन्यात लॉन्च केला आहे. Rs 449 च्या किंमतीत येणार्‍या प्लान बद्दल बोलायचे तर तुम्हाला या प्लान मध्ये रोज 2GB डाटा 70 दिवसांच्या वैधते सह मिळत आहे. 
एवढेच नाही तर कंपनी कडे त्यांचा Rs 448 मध्ये येणारा प्लान पण अजूनपर्यंत उपलब्ध आहे, जो कंपनी ने 1.4GB डाटा सह लॉन्च केला आहे. या प्लान सोबत नवीन प्लान ची तुलना केल्यास तुम्हाला 0.6GB डाटा अतिरिक्त मिळत आहे. डाटा व्यतिरिक्त या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, यात रोमिंग पण आहे, तसेच रोज या प्लान मध्ये तुम्हाला 100 SMS पण मिळत आहेत. 
या प्लान मध्ये एकूण तुम्हाला 140GB डाटा संपूर्ण 70 दिवसांसाठी मिळत आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला एक GB डाटा या प्लान मध्ये फक्त Rs 3.2 च्या किंमतीत मिळत आहे. कंपनी ने याआधी सादर केलेल्या प्लान मध्ये म्हणजे Rs 499 च्या प्लान मध्ये तुम्हाला 2GB प्रतिदिन डाटा ऐकून 82 दिवसांसाठी मिळत आहे. तसेच प्लान मध्ये पण कॉलिंग साठी कोणतीही लिमिट नाही. या प्लान मध्ये पण तुम्हाला 100 एसएमएस प्रतिदिन साठी मिळत आहेत. 
2GB डाटा वाल्या एयरटेल चे काही प्लान्स पाहता या की लिस्ट मध्ये Rs 249, Rs 449, Rs 499 सारखे प्लान आहेत, त्याचप्रमाणे आपण थोडा डाटा कमी केल्यास कंपनी कडे 1.4GB डाटा वाले जवळपास 4 अन्य प्लान पण आहेत. जे तुम्हाला Rs 199, Rs 399, Rs 448 आणि Rs 509 च्या किंमतीत येतात. तसेच 3GB प्रतिदिन डाटा देणार्‍या काही प्लान्स बद्दल बोलायचे तर या श्रेणी मध्ये कंपनी कडे Rs 349 आणि Rs 558 वाले प्लान्स आहेत. याचा अर्थ असा की 70 दिवसांच्या वैधते सह Rs 449 वाला हा प्लान चांगला बोलू शकतो. 
 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo