AIRTEL चा RS 148 वाला प्रीपेड रिचार्ज प्लान 3GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सह सादर

Updated on 11-Jul-2019

Bharti Airtel ने एक नवीन Rs 148 मध्ये येणारा प्रीपेड रिचार्ज प्लान सादर केला आहे. या प्लान मध्ये तुम्हाला 3GB डेटा सोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि 28 दिवसांची वैधता मिळत आहे. हा नवीन प्रीपेड प्लान Rs 145 वाल्या प्लान मध्ये एक नवीन प्लान म्हणून आला आहे. 

या रिचार्ज प्लान मध्ये तुम्हाला 1GB डेटा सह 42 दिवसांची वैधता मिळत आहे. पण जर Rs 148 मध्ये येणारा प्रीपेड रिचार्ज प्लान पहिला तर यात तुम्हाला संपूर्ण वैधतेसाठी 100 SMS पण मिळत आहेत. इतकेच नाही तर या प्लान मध्ये तुम्हाला एयरटेल टीवी ऍप आणि विंक म्यूजिकचा एक्सेस पण मिळत आहे. 

विशेष म्हणजे लिस्टिंग असे दाखवत आहे कि Airtel चा हा Rs 148 मध्ये येणारा प्रीपेड रिचार्ज प्लान सध्या फक्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणा व्यतिरिक्त कर्नाटक सर्कल मध्ये पण उपलब्ध आहे. असे पण बोलले जात आहे कि आगामी काही दिवसांत हा प्रीपेड रिचार्ज प्लान तुम्हाला इतर सर्कल्स मध्ये पण दिसेल. 

आधी सांगितल्याप्रमाणे Airtel च्या Rs 148 मध्ये येणारा एयरटेल प्रीपेड रिचार्ज प्लान तुम्हाला 3GB डेटा सह 28 दिवसांच्या वैधतेसह मिळतो. तसेच या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड लोकल, STD आणि रोमिंग कॉल्स मिळतात त्याचबरोबर तुम्हाला 100 SMS पण मिळतील. 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :