Bharti Airtel ने आपला एक नवीन प्लान मात्र Rs 289 मध्ये भारतीय बाजारात लॉन्च केला आहे, हा एयरटेलचा नवीन प्रीपेड रिचार्ज प्लान एकूण 48 दिवसांच्या वैधतेसह लॉन्च केला गेला आहे, चला जाणून घेऊया या प्लानची काही माहिती.
भारतीय टेलीकॉम बाजारात गेल्या काही काळात प्लान्सची चढाओढ सुरु झाली आहे, सर्व टेलीकॉम कंपन्या आपले नवनवीन प्लान्स सतत लॉन्च करत आहेत. त्यामुळे एयरटेल ने पण एक नवीन प्रीपेड रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे. हा प्लान Rs 289 मध्ये लॉन्च केला गेला आहे आणि हा प्लान वोडाफोनच्या Rs 279 मध्ये येणाऱ्या प्रीपेड प्लानला टक्कर देण्यासाठी लॉन्च केला गेला आहे. त्याचबरोबर हा एयरटेलचा नवीन रिचार्ज प्लान कुठेना कुठेतरी रिलायंस जियोला पण टक्कर देण्याच्या उद्देशाने सादर केला गेला आहे. विशेष म्हणजे एयरटेलच्या या नवीन प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉयस कॉलिंग, हाई-स्पीड डेटा आणि अजून खूप काही मिळत आहे, चला आता याबद्दल जाणून घेऊया.
Survey
✅ Thank you for completing the survey!
एयरटेलच्या या नवीन प्लान बद्दल बोलायचे झाले तर हा प्लान वोडाफोनच्या Rs 279 मध्ये येणाऱ्या प्लानला टक्कर देण्यासाठी सादर केला गेला आहे. महत्वाचे म्हणजे एयरटेलचा हा प्रीपेड रिचार्ज प्लान अनलिमिटेड लोकल, STD, आणि रोमिंग कॉल्स सोबत येत आहे. त्याचबरोबर यात तुम्हाला 1GB डेटा संपूर्ण वैधतेसाठी मिळत आहे. तसेच तुम्हाला या प्लान मध्ये 100 SMS पण रोज मिळत आहेत. विशेष म्हणजे या प्लान मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची FUP लिमिट मिळत नाही. तसेच या प्लानची वैधता एकूण 48 दिवस आहे.
वोडाफोनचा Rs 279 मध्ये येणार प्लान पाहता हा प्लान 84 दिवसांच्या वैधतेसह लॉन्च केला गेला आहे. तसेच या प्रीपेड प्लान मध्ये पण तुम्हाला अनलिमिटेड लोकल, STD आणि रोमिंग कॉल्स मिळत आहे. त्याचबरोबर तुम्हाला यात मोफत SMS पण मिळत आहेत, पण या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग वर FUP लिमिट मिळत आहे. तुम्हाला तर माहितीच आहे कि तुम्हाला डेली 250 मिनिटे आणि आठवड्याला 1000 मिनिटांची कॉलिंग मिळते.