22 ऑगस्टला Xiaomi लॉन्च करेल आपला Pocophone F1 स्मार्टफोन

22 ऑगस्टला Xiaomi लॉन्च करेल आपला Pocophone F1 स्मार्टफोन
HIGHLIGHTS

लॉन्च डेट सोबतच Pocophone F1 चा एक हँड्स-ऑन विडियो पण समोर आला आहे ज्यात डिवाइस दिसत आहे.

गेल्या आठवड्यात बातमी आली होती की Xiaomi आपल्या Pocophone F1 वर काम करत आहे जो कंपनी च्या नवीन सब-ब्रांड Poco अंतर्गत येईल. कंपनी च्या काही एग्जीक्यूटिव्स ने ट्विटर वर संकेत दिले होते की हा नवीन डिवाइस भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. आता 'Poco India' ने घोषणा केली आहे की Pocophone F1 22 ऑगस्टला भारतात लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे लॉन्च च्या तारखे सोबतच एक विडियो लीक पण समोर आला आहे ज्यातून डिवाइस बद्दल खुप माहिती मिळाली आहे. तसेच अजून एका विडियो मधून स्पष्ट झाले आहे की Pocophone F1 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट असेल. 

'Poco India' ने ट्वीट मधून इवेंट ची तारीख आणि लॉन्च च्या जागेचा खुलासा करत फोटो पोस्ट केला आहे. बोलले जात आहे की या स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगन 845 SoC, 6GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज असेल. डिवाइस 4000mAh च्या बॅटरी सह येण्याची शक्यता आहे. 

GSM Dome द्वारा शेयर करण्यात आलेल्या Pocophone F1 च्या विडियो अनुसार, डिवाइस चा बॅक पॅनल प्लास्टिक पासून बनलेला आहे. डिवाइस च्या बॅक वर AI डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि कॅमेरा सेटअप च्या खाली एक फिंगरप्रिंट सेंसर आहे. डुअल कॅमेरा सेटअप च्या चारी बाजूंनी लाल रिंग आहे जसा आपण Nubia स्मार्टफोन्स मध्ये बघितला आहे. स्मार्टफोन मध्ये बारीक बेजल्स सह नॉच डिस्प्ले पण आहे आणि डिवाइसच्या टॉपला हेडफोन जॅक देण्यात आला आहे तसेच बॉटम ला USB-C पोर्ट आणि दोन स्पीकर ग्रिल्स देण्यात आले आहेत. 

Pocophone F1 लिक्विड कूलिंग टेक्नोलॉजी सह येऊ शकतो, बॉक्स वर तुम्ही स्टीकर बघू शकता ज्यातून लिक्विड कूलिंग चे संकेत मिळतात. तसेच विडियो मध्ये दिसत आहे की डिवाइस MIUI 9 वर चालत आहे, विशेष म्हणजे कंपनी ने MIUI 10 लॉन्च केला आहे आणि आशा आहे की फोनला MIUI OTA अपडेट मिळेल. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo