भारतात बंद करण्यात येणार आहे का ड्यूल कॅमेरा वाला Xiaomi Mi A1 स्मार्टफोन?

भारतात बंद करण्यात येणार आहे का ड्यूल कॅमेरा वाला Xiaomi Mi A1 स्मार्टफोन?
HIGHLIGHTS

या मागे सर्वात मोठे कारण हे आहे की कंपनी येणार्‍या 25 एप्रिलला आपला Mi A2 डिवाइस लॉन्च करण्याची तयारी करत आहे, हा कंपनी चा दूसरा एंड्राइड वन स्मार्टफोन असेल.

असे समोर येत आहे की चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi भारतात आपल्या Mi A1 स्मार्टफोन बंद करू शकते. हा स्मार्टफोन भारतात मागच्या वर्षी सप्टेंबर मध्ये लॉन्च करण्यात आला होता आणि याला चीन मध्ये Mi 5X नावाने सेल करण्यात येत आहे. आता समोर येत आहे की कंपनी या स्मार्टफोन च्या पिढीचा नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या दिशेने काम करत आहे. ती येणार्‍या 25 एप्रिल ला आपला दुसरा एंड्राइड वन स्मार्टफोन Xiaomi Mi A2 लॉन्च करू शकते आणि त्यामुळे कदाचित Xiaomi Mi A1 कंपनी बंद करू शकते. 
हा एक उत्तम ड्यूल कॅमेरा वाला मिड-रेंज स्मार्टफोन म्हणु शकतो आणि भारतात लॉन्च होऊन फक्त 7 महिन्यांचा खुप कमी काळ गेला आहे. पण आता 91 मोबाईल्स ची एक रिपोर्ट असे सांगत आहे की हा डिवाइस लवकरच बंद केला जाऊ शकतो, कारण कंपनी याचा एक नवीन वर्जन बाजारात आणण्याचा विचार करत आहे. 
Xiaomi ने आपल्या 25 एप्रिलला होणार्‍या इवेंट साठी मीडिया ला निमंत्रण देने सुरू केले आहे, असे म्हटले जात आहे की चीन मध्ये हा स्मार्टफोन Xiaomi Mi 6X नावाने लॉन्च केला जाईल आणि भारतात हा फोन Xiaomi Mi A2 नावाने आणला जाण्याची शक्यता आहे. जर Xiaomi Mi 6X स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर या बद्दल आता पर्यंत अनेक लीक समोर आले आहेत. आणि काही लीक याच्या स्पेक्स पण सांगत आहेत. 
आता काही दिवसांपूर्वी आलेल्या एका लीक नुसार, या डिवाइस मध्ये एक 2.2GHz चा ओक्टा-कोर प्रोसेसर मिळत आहे. पण आता ही बातमी आल्या नंतर असे म्हणू शकतो की हा डिवाइस स्नॅपड्रॅगन 630 किंवा स्नॅपड्रॅगन 660 सह लॉन्च केला जाऊ शकतो. हे दोन्ही प्रोसेसर 2.2GHz वर चालतात. 
तसेच स्मार्टफोन बद्दल असेही समोर येत आहे की हा दोन वेगवेगळ्या वेरिएंटस मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. हा डिवाइस 4GB/6GB रॅम आणि 64GB/128GB स्टोरेज सह सादर केला जाऊ शकतो. तसेच याचा कॅमेरा पाहता हा स्मार्टफोन एका 20-मेगापिक्सल च्या रियर आणि 20-मेगापिक्सल च्या फ्रंट कॅमेरा सह लॉन्च केला जाऊ शकतो. 
याव्यतिरिक्त इतर काही स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोन मध्ये एक 5.99-इंचाचा एक डिस्प्ले असू शकतो. हा एक फुल स्क्रीन डिस्प्ले असू शकतो. तसेच स्मार्टफोन एंड्राइड 8.1 Oreo वर लॉन्च केला जाऊ शकतो. यात एक 2910mAh क्षमता असलेली बॅटरी असण्याची शक्यता आहे.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo