Xiaomi Redmi Y2 च्या किंमतीती झाली मोठी कपात…आता घ्या विकत Rs. 8,999 मध्ये

Xiaomi Redmi Y2 च्या किंमतीती झाली मोठी कपात…आता घ्या विकत Rs. 8,999 मध्ये
HIGHLIGHTS

Xiaomi ने आपला Redmi Y2 स्मार्टफोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला होता आणि आता डिवाइसच्या लॉन्च किंमतीच्या च्या तुलनेत दोन्ही वेरिएंट्सची किंमत Rs. 2000 ते Rs. 3000 दरम्यान कमी करण्यात आली आहे.

महत्वाचे मुद्दे

  • Xiaomi Mi A2 आणि Xiaomi Redmi Note 5 Pro ची किंमत आधीच झाली आहे कमी
  • उद्या लॉन्च होईल Xiaomi Mi LED TV 4 65 इंच वेरिएंट
  • मिळत आहे 3000 रुपयांपर्यंतची सूट

Xiaomi Redmi Y2 स्मार्टफोन शाओमीचा तिसरा स्मार्टफोन झाला आहे ज्याची किंमत कमी करण्यात आली आहे. याआधी Xiaomi Mi A2 आणि Xiaomi Redmi Note 5 Pro च्या किंमती कमी करण्यात आली आहेत. शाओमी देशात आपला पाचवा वाढदिवस साजरा करत आहे आणि कंपनी ने घोषणा केली आहे कि 7 जानेवारी ते 11 जानेवारी 2019 दरम्यान कंपनी अनेक चांगल्या घोषणा करेल. पण शाओमी ने Xiaomi Redmi Y2 नंतर कोणत्या डिवाइसची किंमत कमी केली जाईल याची घोषणा केलेली नाही, तसेच Xiaomi Mi LED TV 4 चा 65 इंच वेरिएंट उद्या लॉन्च केला जाऊ शकतो.

Xiaomi Redmi Y2 च्या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंटची किंमत आता Rs. 8,999 झाली आहे, तर 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट Rs. 10,999 मध्ये विकत घेता येईल. Xiaomi Redmi Y2 को क्रमश: Rs. 10,999 आणि Rs. 13,999 मध्ये लॉन्च केला गेला होता. Xiaomi Redmi Y2 च्या 3GB रॅम वेरिएंटच्या किंमतीती Rs. 2000 ची कपात झाली आहे, तर 4GB रॅम वेरिएंटची किंमत Rs. 3000 ने कमी करण्यात आली आहे. या नवीन किंमती मी.कॉम, अमेझॉन इंडिया, मी होम स्टोर्स आणि सर्व ऑफलाइन चॅनेल्स वर उपलब्ध आहेत.

Xiaomi Redmi Y2 चे स्पेसिफिकेशंस

स्पेसिफिकेशंस बद्दल बोलायचे तर Redmi Y2 मध्ये 5.99 इंचाचा डिस्प्ले आहे ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे आणि हा 720 x 1440 पिक्सल रेजोल्यूशन असलेला डिस्प्ले आहे. डिवाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 625 चिपसेट सह येतो. डिवाइस एंड्राइड 8.1 ओरियो वर आधारित MIUI 9.5 वर चालतो आणि डिवाइस मध्ये 3080mAh ची बॅटरी आहे.

ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर डिवाइसच्या बॅकला 12MP आणि 5MP चा कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, सेकेंडरी कॅमेरा डेप्थ सेंसर आहे. रियर कॅमेरा इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलाइजेशन (EIS) आणि पोर्ट्रेट मोडला सपोर्ट करतो. डिवाइसच्या फ्रंटला AI 16MP चा सेल्फी शूटर आहे, जो फेस रेकोग्निशनचे काम करतो. सेल्फी कॅमेरा सोबत एक सेल्फी लाइट पण आहे.

कनेक्टिविटी साठी हा फोन 4G LTE, VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n, ब्लूटूथ 4.2 आणि GPS ऑफर करतो. या स्मार्टफोनचे मेजरमेंट 160.73 × 77.26 × 8.1mm आणि वजन 170 ग्राम आहे. डिवाइस मध्ये इन्फ्रारेड सेंसर पण आहे. हा डिवाइस तीन कलर मध्ये उपलब्ध आहे ज्यात एलेगेंट गोल्ड, रोज गोल्ड आणि डार्क ग्रे रंगांचा समावेश आहे.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo