Xiaomi Redmi S2 स्मार्टफोन चे हाई रेजोल्यूशन फोटो आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल माहिती लीक

Xiaomi Redmi S2 स्मार्टफोन चे हाई रेजोल्यूशन फोटो आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल माहिती लीक
HIGHLIGHTS

Xiaomi Redmi S2 डिवाइस च्या लीक झालेल्या फोटो मध्ये हा स्मार्टफोन रोज गोल्ड वेरिएंट व्यतिरिक्त, फिंगरप्रिंट सेंसर आणि ड्यूल वर्टीकल कॅमेरा सह दिसत आहे.

आताच, XDADevelopers ने Xiaomi Redmi S2 डिवाइस बद्दल माहिती दिली होती. या रिपोर्ट मध्ये असे पण सांगण्यात आले होते की हा एक बजेट डिवाइस असणार आहे, पण यात काही दमदार फीचर जसे की फेस अनलॉक आणि ड्यूल कॅमेरा इत्यादी असणार आहेत. ही बातमी विशेष यासाठी वाटते कारण आता पर्यंत Xiaomi च्या पोर्टफोलियो मध्ये फक्त दोन असे फोन आहेत जे फेस अनलॉक फीचर सह लॉन्च करण्यात आले आहेत. या स्मार्टफोंस मध्ये Xiaomi Redmi Note 5 Pro आणि Xiaomi Mi Mix 2S स्मार्टफोन्स आहेत. 
पण ही माहिती थोडी जुनी झाली आहे. जी नवीन माहिती समोर येत आहे, ती Czech website Svetandroida च्या माध्यमातून समोर येत आहे. या वेबसाइट ने डिवाइस चे काही हाई रेजोल्यूशन फोटो ऑनलाइन सादर केले आहेत. या फोटो मधून डिवाइस ची बॉडी, रियर पॅनल आणि याचा फ्रंट पॅनल पण समोर आला आहे. Xiaomi Redmi S2 डिवाइस च्या लीक झालेल्या फोटो मध्ये हा स्मार्टफोन रोज गोल्ड वेरिएंट व्यतिरिक्त, फिंगरप्रिंट सेंसर आणि ड्यूल वर्टीकल कॅमेरा सह दिसत आहे. 
Xiaomi Redmi S2 डिवाइस चे लीक झाले स्पेक्स 
या डिवाइस च्या लीक झालेल्या स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर TENAA वर याचे काही स्पेक्स लीक झाले आहेत. ते स्पेक्स पाहता हा डिवाइस एका 3,080mAh क्षमता असलेल्या बॅटरी सह लॉन्च केला जाईल. पण नवीन माहितीनुसार हा डिवाइस 4,205mAh क्षमता असलेल्या बॅटरी सह लॉन्च केला जाऊ शकतो. 
असे पण समोर येत आहे की हा डिवाइस कंपनी एंड्राइड Oreo सह लॉन्च करू शकते. सोबतच यात एक 3.5mm चा ऑडियो जॅक पण मिळू शकतो, सोबतच कंपनी ने यात एक Micro USB पोर्ट पण देऊ शकते. फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट मिळेल, याव्यतिरिक्त यात तुम्हाला 3GB चा रॅम पण मिळणार आहे. फोन मध्ये 32GB ची इन्टरनल स्टोरेज असण्याची शक्यता आहे. 
याव्यतिरिक्त डिवाइस मध्ये तुम्हाला एक 5.99-इंचाचा HD+ डिस्प्ले मिळू शकतो, जो 720X1440 पिक्सल रेजोल्यूशन सह येईल. जसे की आपण बघीतले आहे की डिवाइस मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप असणार आहे, यात तुम्हाला एक 12-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा मिळणार आहे. फोन मध्ये फ्रंट कॅमेरा च्या रुपात एक 16-मेगापिक्सल चा सेंसर असण्याची शक्यता आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo