Xiaomi Redmi Note 5 Pro ला लवकरच मिळणार फेस-अनलॉक फीचर

Xiaomi Redmi Note 5 Pro ला लवकरच मिळणार फेस-अनलॉक फीचर
HIGHLIGHTS

Xiaomi Redmi Note 5 Pro ला लवकरच OTA अपडेट च्या माध्यमातून फेस-अनलॉक फीचर मिळेल. कंपनी ने या फोनच्या लॉन्च इवेंट मध्ये याची घोषणा केली होती.

Xiaomi Redmi Note 5 Pro ला काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात सादर करण्यात आले होते. भारतीय बाजारात याला दोन वेरियंट मध्ये लॉन्च करण्यात आले आहे, – 6GB रॅम आणि 4GB रॅम. याच्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरियंट ची किंमत Rs. 16,999 आहे, तर याच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरियंट ची किंमत Rs. 13,999 ठेवण्यात आली आहे. हा फोन गोल्ड, रोज गोल्ड, ब्लू आणि ब्लॅक रंगात सादर करण्यात आला आहे. 

आता बातमी अशी आहे की, Xiaomi Redmi Note 5 Pro ला लवकरच OTA अपडेट च्या माध्यमातून फेस-अनलॉक फीचर मिळेल. कंपनी ने या फोनच्या लॉन्च इवेंट मध्ये याची घोषणा केली होती. 
Xiaomi Redmi Note 5 Pro मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर आहे. यात 6GB चा रॅम पण आहे.  
या फोन मध्ये 20MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा सह LED लाइट पण देण्यात आली आहे. यात पोर्ट्रेट सेल्फी फीचर पण आहे, जो बोकेह इफेक्ट देतो. सोबत ह्या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 12MP+5MP चा रियर कॅमरा सेटअप मिळतो.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo