6GB रॅम आणि डुअल कॅमेरा सह Xiaomi Redmi Note 5 Pro झाला भारतात लाँच

HIGHLIGHTS

याच्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरियंट ची किंमत Rs. 16,999 आहे, तर याच्या 4Gb रॅम आणि 64GB स्टोरेज वेरियंट ची किंमत Rs. 13,999 ठेवण्यात आली आहे.

6GB रॅम आणि डुअल कॅमेरा सह Xiaomi Redmi Note 5 Pro झाला भारतात लाँच

शाओमी ने आज भारतात आपले दोन फोंस सादर केले आहेत. शाओमी ने Xiaomi Redmi Note 5 सोबतच Xiaomi Redmi Note 5 Pro ला पण लाँच केले आहे. या फोनला दोन वेरियंट मध्ये सादर करण्यात आले आहे. 
याच्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरियंट ची किंमत Rs. 16,999 आहे, तर याच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरियंट ची किंमत Rs. 13,999 ठेवण्यात आली आहे. हा गोल्ड, रोज गोल्ड, ब्लू आणि ब्लॅक रंगात सादर करण्यात आला आहे. 
Xiaomi Redmi Note 5 Pro मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर आहे. यात 6GB रॅम पण आहे. 
या फोन मध्ये 20MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा सह LED लाइट पण मिळणार आहे. यात पोर्ट्रेट सेल्फी फीचर पण आहे, जो बोकेह इफेक्ट देतो. सोबतच फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप पण आहे. यात 12MP+5MP चा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 
 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Kulveer Sharma
Digit.in
Logo
Digit.in
Logo