पुढील महिन्यात Mi Band 3 सोबत Xiaomi Mi 8 SE स्मार्टफोन भारतात Mi 8i नावाने केला जाऊ शकतो लॉन्च

पुढील महिन्यात Mi Band 3 सोबत Xiaomi Mi 8 SE स्मार्टफोन भारतात Mi 8i नावाने केला जाऊ शकतो लॉन्च
HIGHLIGHTS

Xiaomi Mi 8 SE स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर सह लॉन्च केलेला गेला पहिला स्मार्टफोन आहे, जो नॉच डिजाईन सह सादर करण्यात आला आहे.

Xiaomi ने मागच्या महिन्यात चीन मध्ये झालेल्या एका मोठ्या इवेंट मध्ये आपल्या Xiaomi Mi 8, Mi 8 Explorer Edition आणि Mi 8 SE सह Xiaomi Mi Band 3 लॉन्च केल्यानंतर आता अशा बातम्या येत आहेत की Xiaomi Mi 8 SE स्मार्टफोन भारतात Xiaomi Mi 8i नावाने लॉन्च केला जाऊ शकतो, त्याचबरोबर कंपनी पुढच्या महिन्यात या डिवाइस सह Xiaomi Mi Band 3 पण लॉन्च करू शकते. ही माहिती Beebom च्या माध्यमातून समोर आली आहे. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की आता भारतात हा डिवाइस एका नवीन नावाने Xiaomi Mi Band 3 सोबत लॉन्च करण्याची योजना आहे. विशेष म्हणजे कंपनी च्या चीनी अधिकृत वेबसाइट च्या लँडिंग पेज वर या डिवाइस बद्दल उल्लेख पण दिसला आहे. 

असे पण बोलले जात आहे की भारतात या डिवाइस ची किंमत Rs 18,000 ते Rs 20,000 पर्यंत असू शकते. Xiaomi Mi 8 SE डिवाइस बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन चीन मध्ये RMB 1,799 म्हणजे जवळपास Rs 19,000 च्या किंमतीत लॉन्च केला गेला आहे. सोबत Mi Band 3 जवळपास Rs 1800 च्या किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. ही किंमत याच्या बेस वेरिएंट ची आहे, त्याचबरोबर याच्या NFC-इनेबल्ड वेरिएंट ची किंमत Rs 2100 असू शकते. 

चीन मध्ये हा डिवाइस आधीच लॉन्च करण्यात आला आहे, या डिवाइस बद्दल बोलायचे झाले तर हा डिवाइस 5.88-इंचाच्या एका FHD+ AMOLED नॉच डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे, हा डिवाइस दिसायला काही प्रमाणात Mi MIX 2s सारखा दिसतो. हा डिवाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर सह लॉन्च केला गेला होता. हा डिवाइस ड्यूल कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला गेला होता. यात तुम्हाला 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चा कॅमेरा मिळत आहे, तसेच यात एक 20-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे, फोन मध्ये एक 3,120mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. 

हा डिवाइस RMB 1,799 म्हणजे जवळपास Rs 19,000 च्या किंमतीत 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे, तसेच याचा 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट RMB 1,999 म्हणजे जवळपास Rs 21,000 मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. 

तसेच Mi 8 स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला एक 6.21-इंचाचा 1080×2248 पिक्सल वाला 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले मिळत आहे. त्याचबरोबर यात सॅमसंग द्वारा निर्मित सुपर AMOLED डिस्प्ले आहे. तसेच या डिस्प्ले मध्ये नॉच डिजाईन तर आहेच. 

कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर हा डिवाइस एका 20-मेगापिक्सल च्या फ्रंट कॅमेरा सह लॉन्च करण्यात आला आहे. जो नौच वर आहे आणि त्याचबरोबर इथे प्रोक्सिमिटी सेंसर, इयरपिस, इन्फ्रारेड लाइटिंग आणि इन्फ्रारेड लेंस पण मिळत आहेत. फोन मध्ये कंपनी ने एक एडवांस इन्फ्रारेड फेस अनलॉक फीचर दिला आहे. असे बोलले जात आहे की हा अॅप्पल च्या iPhone X मधील फेस ID पेक्षा जास्त सिक्योर आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo