Xiaomi Mi Max 4 आणि Mi Max 4 Pro च्या किंमतीचा आणि स्पेसिफिकेशनचा झाला खुलासा

Xiaomi Mi Max 4 आणि Mi Max 4 Pro च्या किंमतीचा आणि स्पेसिफिकेशनचा झाला खुलासा
HIGHLIGHTS

Xiaomi चे Mi Max 4 आणि Mi Max 4 Pro Weibo वर दिसले आहेत, तिथे डिवाइसेजच्या किंमतीचा आणि स्पेक्सची माहिती मिळाली आहे.

Xiaomi ने आपला Redmi Note 7 स्मार्टफोन चीन मध्ये लॉन्च केला आहे पण कंपनी आपल्या नवीन Mi Max फॅब्लेट वर पण काम करत आहे. नवीन लीक अनुसार, Weibo वर Mi Max 4 चे आगामी दोन मॉडेल्सची किंमत आणि स्पेसिफिकेशंस ऑनलाइन दिसली आहे. लीक अनुसार, या दोन डिवाइसेज मध्ये एक स्टॅंडर्ड Mi Max 4 आणि दुसरा जास्त प्रीमियम Mi Max 4 Pro स्मार्टफोन असू शकतो.

रिपोर्ट अनुसार, शाओमीच्या आगामी Mi Max 4 मध्ये 7.2 इंचाचा डिस्प्ले दिला जाईल ज्याच्या वरच्या बाजूला वॉटर ड्रॉप नॉच असेल आणि बॉटम मध्ये नॅरो बेजेल्स दिले जातील. डिवाइसचा रियर आणि फ्रंट पॅनल कोर्निंग गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शन सह येईल. प्रोसेसर बद्दल बोलायचे तर डिवाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 SoC ने सुसज्ज असेल.

असे बोलले जात आहे कि Mi Max 4 मध्ये Redmi Note 7 प्रमाणे रियर कॅमेरा असेल आणि असे पण समोर येत आहे कि हा स्मार्टफोन लेटेस्ट MIUI 11 वर चालेल आणि सुपर नाईट सीन मोड सह येईल. डिवाइस मध्ये 5,800mAh ची बॅटरी सादर केली जाण्याची शक्यता आहे.

लीक अनुसार, Mi Max 4 तीन वेरिएंट्स मध्ये उपलब्ध होईल. किंमत पाहता 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत RMB 1,599 (जवळपास Rs 17,000) असेल, तर 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत RMB 1,799 (जवळपास Rs 19,500) असेल. तसेच डिवाइसचा टॉप-एंड वेरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह येईल ज्याची किंमत RMB 1,999 (जवळपास Rs 21,500) असेल.

Mi Max 4 Pro क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 SoC सह येऊ शकतो आणि डिवाइस मध्ये अंडर-स्क्रीन फिंगरप्रिंट सेंसर पण ऍड केला जाऊ शकतो. डिवाइस मध्ये 48 मेगापिक्सलचा Sony IMX586 सेंसर असू शकतो जो 960 FPS स्लो-मो सह येईल. डिवाइसच्या फ्रंटला 20 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. सध्या तरी या डिवाइसच्या एकाच वेरिएंटची बातमी समोर येत आहे जो 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज येऊ शकतो.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo