Xiaomi Mi Max 3 स्मार्टफोन चा केस झाला लीक, ड्यूल कॅमेरा सेटअप कडे करत आहे इशारा

Xiaomi Mi Max 3 स्मार्टफोन चा केस झाला लीक, ड्यूल कॅमेरा सेटअप कडे करत आहे इशारा
HIGHLIGHTS

या लीक वरून असे समोर येत आहे की Xiaomi चे आगामी स्मार्टफोन म्हणजे Xiaomi Mi Max 3 स्मार्टफोन मध्ये काही बदल केले जाऊ शकतात, जसे की यात ड्यूल कॅमेरा व्यतिरिक्त 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले आणि वायरलेस चार्जिंग फीचर पण असू शकतो.

Xiaomi ने आपल्या Xiaomi Mi Max 2 स्मार्टफोन मे 2017 मध्ये लॉन्च केला होता. पण आता समोर येत आहे की कंपनी या डिवाइस च्या पुढील आवृत्ती लॉन्च करण्याची तयारी करत आहे. या नवीन डिवाइस म्हणजे Xiaomi Mi Max 3 च्या बाबतीत असे समोर येत आहे की हा येणार्‍या काही आठवड्यांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. त्याचबरोबर असेही समोर येत आहे की हा काही बदलांसह सादर केला जाऊ शकतो. म्हणजेच मागच्या डिवाइस च्या तुलनेत या नवीन डिवाइस मध्ये तुम्हाला काही बदल बघायला मिळतील. 
या बदलांबद्दल बोलायचे झाले तर सर्वात आधी असे समोर आले आहे की हा नवीन डिवाइस 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. त्याचबरोबर यात एक ड्यूल कॅमेरा सेटअप सह फास्ट चार्जिंग सपोर्ट पण असणार आहे. ही माहिती याच्या एका TPU केस लीक मधून समोर आली आहे. 
या लीक केस बद्दल बोलायचे झाले तर असे बोलू शकतो की या स्मार्टफोन मध्ये पण आधीच्या डिवाइस प्रमाणेच एक फिंगरप्रिंट सेंसर फोन च्या रियर पॅनल वर दिसत आहे. त्याचबरोबर असे दिसत आहे की फोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप असणार आहे वर्टीकल पोजीशन मधे असेल. LED फ्लॅश या सेटअप च्या मध्ये ठेवला जाऊ शकतो. 
या केस लीक वरून स्मार्टफोन मध्ये एक 3.5mm चा ऑडियो जॅक असल्याचे समजत आहे. तसेच स्पीकर्स ग्रिल च्या मध्ये एक USB type C पोर्ट असण्याची चिन्हे दिसत आहेत. याआधी आलेल्या लीक मध्ये असे समजले होते की या डिवाइस मध्ये वायरलेस चार्जिंग पण असू शकते. 
फोन च्या काही स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप असणार आहे, तसेच यात एक 6.99-इंचाचा FHD+ डिस्प्ले फुल-स्क्रीन सह येऊ शकतो. त्याचबरोबर यात एक 5,000mAh क्षमता असलेली बॅटरी असण्याची शक्यता आहे. जी क्विक चार्ज 3.0 सपोर्ट सह येईल. 
फोन दोन वेगवेगळ्या वेरिएंटस मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. एक मॉडेल मध्ये 3GB रॅम आणि 64GB स्टोरेज सह स्नॅपड्रॅगन 636 सह येऊ शकतो, त्याचबरोबर दुसरा मॉडेल 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट सह लॉन्च केला जाऊ शकतो. 

फीचर्ड इमेज xiaomi mi max 2 ची आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo