Xiaomi Mi 6X स्मार्टफोन मध्ये नसेल हे फीचर, दुसरा एक फीचर असण्याची शक्यता

Xiaomi Mi 6X स्मार्टफोन मध्ये नसेल हे फीचर, दुसरा एक फीचर असण्याची शक्यता
HIGHLIGHTS

Xiaomi Mi 6X स्मार्टफोन च्या बाबतीत आधीच काही लीक आणि रेंडर समोर आले आहेत.

Xiaomi लवकरच आपला नवीन स्मार्टफोन Xiaomi Mi 6X डिवाइस लॉन्च करू शकते. हा स्मार्टफोन Xiaomi Mi 5x ची नवीन आवृत्ती असणार आहे. या स्मार्टफोन चा अंतरराष्ट्रीय वेरिएंट Xiaomi Mi A2 नावाने सादर केला जाऊ शकतो. हा 
स्मार्टफोन Mi A1 एंड्राइड वन ची नवीन आवृत्ती म्हणून अंतरराष्ट्रीय बाजारात लॉन्च केला जाईल. या स्मार्टफोन च्या बाबतीत आता पर्यंत काही लीक आणि रुमर्स समोर आल्या आहेत. या लीक इत्यादी मध्ये याच्या स्पेक्स आणि रेंडर चा समावेश आहे. 
आता काही दिवसांपूर्वी असे समोर आले होते की या डिवाइस में मीडियाटेक चा हेलिओ P60 प्रोसेसर असेल, पण एका नवीन रिपोर्ट चे असे म्हणेन आहे की हा डिवाइस या प्रोसेसर विना लॉन्च केला जाऊ शकतो. 
आता काही दिवसांपूर्वी हा स्मार्टफोन TENAA वर दिसला होता आणि त्यातून याचे काही स्पेक्स समोर आले होते. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की डिवाइस मध्ये एक 2.2Ghz चा ओक्टा-कोर प्रोसेसर मिळणार आहे. पण आता ही बातमी आल्यानंतर असे म्हणू शकतो की हा डिवाइस स्नॅपड्रॅगन 630 किंवा स्नॅपड्रॅगन 660 सह लॉन्च केला जाऊ शकतो. हे दोन्ही प्रोसेसर 2.2Ghz वर चालतात. 

त्याचबरोबर या स्मार्टफोन बद्दल असे पण समोर येत आहे की हा डिवाइस दोन वेगवेगळ्या वेरिएंटस मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो, हा डिवाइस 4GB/6GB रॅम आणि 64GB/128GB स्टोरेज सह सादर केला जाऊ शकतो. तसेच याच्या कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन एका 20-मेगापिक्सल च्या रियर 20-मेगापिक्सल च्याच फ्रंट कॅमेरा सह लॉन्च केला जाऊ शकतो. 
याव्यतिरिक्त याचे इतर स्पेक्स पाहिले तर तुम्हाला या स्मार्टफोन मध्ये एक 5.99-इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. हा एक फुल स्क्रीन डिस्प्ले असू शकतो. तसेच स्मार्टफोन एंड्राइड 8.1 Oreo वर लॉन्च केला जाऊ शकतो. यात एक 2910mAh क्षमता असलेली बॅटरी असण्याची शक्यता आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo